युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

नागरी समस्या सोडवण्यासाठी कार्यालय होणार कार्यान्वित

श्रीकृष्ण मिञमंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्घाटन - राजकुमार डाके



             परळी ( प्रतिनीधी ) शहरातील कृष्णानगर परिसरात नागरी समस्या सोडवण्यासाठी व सामाजीक, सांस्कृतीक,  शैक्षणीक चळवळ वाढीस लागण्यासाठी गेल्या बावीस वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भाऊबीजेच्या शुभमुहुर्तावर रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी अनेक मांन्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकृष्ण मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार डाके यांनी दिली आहे.

     अनेक नागरी समस्यांना वाचा फोडुन वेळप्रसंगी जनआंदोलन उभारुन श्रीकृष्ण मिञ मंडळाच्या माध्यमातून प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यात आल्या आहेत.सामाजीक  सांस्कृतीक व शैक्षणीक चळवळ गतीमान करण्याचे कार्य करत श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमीत्त दहिहंडी सोहळा, विविध शालेय स्पर्धा, आरोग्य शिबीरे, वृक्षारोपन सारखे सामाजीक ऊपक्रम श्रीकृष्ण मीञ मंडळाच्या माध्यमातुन प्रामुख्याने राबवले जातात.परळी पोलीस स्टेशन समोर तीन दिवस उपोषण करुन परिसरातील अवैध धंदे कायमचे बंद करण्याचे कार्य श्रीकृष्ण मीञ मंडळाच्या माध्यमातुन करण्यात आले होते. याचबरोबर प्रभागातील नागरी समस्या सोडवणे व परिसरातील चाळीस फुटी रोड मोकळा करण्याबाबतही परळी न.प. समोर उपोषण करण्यात आले होते. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन यापुढेही या परिसरातील नागरी समस्या जाणुन घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या कार्यालयातुन प्रयत्न केले जाणार असल्याचे राजकुमार डाके यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या