पोस्ट्स

ऑक्टोबर २७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परळीची निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

इमेज
  श्री संताजी महाराजांच्या नावाने नवीन सभागृह बांधून देणार धनंजय मुंडे यांचा तेली समाजाला शब्द परळीची निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, शनी मंदिराच्या उर्वरित बांधकामाचेही काम मीच करणार - मुंडेंचा शब्द परळी वैद्यनाथ (दि. 31) - परळी शहरांमध्ये विविध समाजातील लोक आनंदाने व एकोप्याने राहतात. विविध, सण उत्सव महापुरुषांची जयंती पुण्यतिथी यासारखे कार्यक्रम घेण्यासाठी प्रत्येक समाजाला स्वतःचे स्वतंत्र सभागृह देण्याचा मी आजवर प्रयत्न केला आहे. तेली समाजाला सुद्धा श्री संताजी महाराजांच्या नावाने सर्व सोयी युक्त असे सभागृह बांधून देणार असल्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी तेली समाजाच्या सोबत आयोजित बैठकीमध्ये दिला आहे.  परळीकरांना मागील निवडणुकीत दिलेले सर्वच्या सर्व शब्द पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यातून अनेक विकास कामे झाली आहेत तसेच अनेक विकास कामे प्रगतीपथावर असून काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे कुणी कितीही आरोप करून मला एकटे पाडण्याचा किंवा घेरण्याचा प्रयत्न केला तरी मी परळीची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे, शनी मं

आता माघार घेऊ नका; जनतेतून मागणी

इमेज
  आता माघार घेऊ नका, राजेभाऊ तुम्ही लढाच! परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या परळी मतदारसंघातील जनतेचा राजेभाऊ फड यांना आग्रह परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी विधानसभा मतदारसंघात विकास घडवून आणायचा असेल आणि मतदारसंघातील वातावरण निर्भय आणि सर्वधर्म समभावाचे बनवायचे असेल तर त्यासाठी परिवर्तन घडवावे लागेल. त्यासाठी युवक नेते राजेभाऊ फड हे सक्षम उमेदवार आहेत अशी जनसामान्यांच्या मनात भावना निर्माण झाल्याने मतदारसंघातून फड यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. निवडून येण्यास ते सक्षम उमेदवार असून त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह मतदरांतून केला जात आहे. त्यांनी कुठल्याही स्थितीत माघार न घेता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढवावी असा आग्रह परिवर्तनाच्या मानसिकतेत असलेल्या मतदार बांधवांतून केला जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होईल असे चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तगडी लढत देऊ शकेल असा एकमेव उमेदवार राजेभाऊ फड आहेत अशी जनतेत भावना आहे. विकासाची सकारात्मक दृष्टी, उद्योग व्यापारातील त्यांचे संबंध यामुळे ते या मतदारसंघात रोजगार निर्मिती दे

प्राचार्या डॉ.विद्याताई देशपांडे -देशमुख यांच्या कार्यकाळातील पहिले उत्तुंग यश !

इमेज
  आनंदवार्ता :  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास नॅक ' चा 'बी' दर्जा प्राप्त परळी वैजनाथ दि.३१ (प्रतिनिधी)       येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयास 'नॅक' चा 'बी ' दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाने 'नॅक'च्या मूल्यमापनात तिसऱ्यांदा हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. तृतीय मूल्यमापनासाठी ' नॅक' च्या त्रिसदस्यीय समितीच्या तज्ज्ञांनी दि २२ व २३ऑक्टोबर  रोजी महाविद्यालयास भेट दिली होती.     या समितीत डॉ जितेनकुमार सोनी ( माजी कुलगुरु सौराष्ट्र विद्यापीठ , गुजरात) हे समितीच्या अध्यक्षस्थानी होते तर डॉ.वासंती ताटिमाकुला (योगी वेन्नम्मा विद्यापीठ कडापा,आंध्रप्रदेश) व डॉ . पार्वती रुद्रप्पा(व्ही इ टी फर्स्ट ग्रेड  कॉलेज,बेंगलोर - कर्नाटक ) यांनी सदस्या म्हणून काम पाहिले.त्यांच्या या दोन दिवसीय  भेटीत त्यांच्याद्वारा महाविद्यालयातील विविध विभागांची तपासणी केली गेली.त्यात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम , समाजोपयोगी घेतलेली भूमिका ,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य,कार्यालयीन कामकाज,ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा विविध वि

कोणत्या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे?

इमेज
  परळी विधानसभा मतदार संघ : दोन जणांनी अर्ज घेतले मागे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत असून  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल झाले होते. दि. 30 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद झाले तर 48 अर्ज वैध झाले. आज दि.31 रोजी दोन जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.     विष्णु नामदेव राठोड अपक्ष इनाम तांडा, गोवर्धन हिवरा ता. परळी वै. जिल्हा बीड व साहेबराव नामदेवराव जाधव अपक्ष शाहूनगर, बीड या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 233- परळी विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.         

प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर: पक्षाकडून कार्यकर्त्यांना केलं आवाहन

इमेज
प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर: पक्षाकडून कार्यकर्त्यांना केलं आवाहन       वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात अधिकृत पत्रक काढत माहिती दिली. गुरुवारी, ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.        प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत वंचितच्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली. ” बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर कुटुंब यावेळी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. त्यामुळे आपणास विनंती आहे की कुटुंबाच्या विनंतीचा आदर करावा कारण ते कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. “पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभाग यां

नागरी समस्या सोडवण्यासाठी कार्यालय होणार कार्यान्वित

इमेज
श्रीकृष्ण मिञमंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्घाटन - राजकुमार डाके              परळी ( प्रतिनीधी ) शहरातील कृष्णानगर परिसरात नागरी समस्या सोडवण्यासाठी व सामाजीक, सांस्कृतीक,  शैक्षणीक चळवळ वाढीस लागण्यासाठी गेल्या बावीस वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भाऊबीजेच्या शुभमुहुर्तावर रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी अनेक मांन्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकृष्ण मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार डाके यांनी दिली आहे.      अनेक नागरी समस्यांना वाचा फोडुन वेळप्रसंगी जनआंदोलन उभारुन श्रीकृष्ण मिञ मंडळाच्या माध्यमातून प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यात आल्या आहेत.सामाजीक  सांस्कृतीक व शैक्षणीक चळवळ गतीमान करण्याचे कार्य करत श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमीत्त दहिहंडी सोहळा, विविध शालेय स्पर्धा, आरोग्य शिबीरे, वृक्षारोपन सारखे सामाजीक ऊपक्रम श्रीकृष्ण मीञ मंडळाच्या माध्यमातुन प्रामुख्याने राबवले जातात.परळी पोलीस स्टेशन समोर तीन दिवस उपोषण करुन परिसरातील अवैध धंदे कायमचे बंद करण्याचे कार्य श्रीक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|Assembly Elections

इमेज
  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|Assembly Elections |विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना 196 मुक्त चिन्हांचे पर्याय  राजकीय पक्षांची उमेदवारी नसल्यास अपक्ष म्हणून लढताना उमेदवारांना मतदारांवर प्रभाव पडेल किंवा त्यांच्या लक्षात राहील असेच निवडणूक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत पारंपरिक चिन्ह जास्त असल्याने त्यात निवडीला वाव नसायचा, त्यात अपक्षांची संख्या जास्त झाली, तर महत्त्वाचे चिन्ह मिळवायची मोठीच स्पर्धा असायची. काही चिन्ह तर शिट्टी, कुकर, पतंग अशी काही चिन्ह खेळणी वाटत असल्याने उमेदवारांचा कल नसायचा. मात्र आता घसघशीत 196 चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, नुसतीच चिन्हच वाढलेली नाही तर त्यात नावीन्यता आली आहे. राष्ट्रीय पक्ष वाढले राष्ट्रीय व राज्य पक्षांची मान्यता वाढलेल्या पक्षांमुळे यावेळी पक्षांच्या चिन्हात वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पंजा), भारतीय जनता पक्ष (कमळ), राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कनीस-विळा), शिवसेना (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इंजिन), बहुजन समाज पार्टी (हत्ती) या पारंपरिक चिन्हांत आता

परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन: धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त

इमेज
  परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे  निधन: धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त परळी वैजनाथ (दि.30) - परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बद्दर  यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान निधन झाले असून त्यांच्या अकाली निधनाबद्दल राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.  दिलीपराव बद्दर हे कायम चेहऱ्यावर हास्य आणि मनात सामाजिक विचार असलेले व्यक्तिमत्व होते. दै. सामना, लोकाशा आदी वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली. त्यांच्या अकाली निधनाने बद्दर परिवारावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी स्व.दिलीपराव बद्दर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

MB NEWS:राजेभाऊ फड यांच्या नावाला मतदारांतून मोठी पसंती

इमेज
ऑटोवालाच होणार परळीचा आमदार! राजेभाऊ फड यांच्या नावाला मतदारांतून मोठी पसंती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी विधानसभा मतदारसंघाचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. नेहमीपेक्षा यंदाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने होऊ घातली आहे. राजकीय पक्षांच्या फुटाफुटीला मतदार नागरिक वैतागले असून ते वेगळ्या पर्यायाचा शोध घेतला जात आहे. युवक नेते राजेभाऊ फड यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. सर्व तयारी पूर्ण झालेली असतांनाही व सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने त्यांना उमेदवारी न देता ऐनवेळी उमेदवार वेगळाच दिला. मात्र मतदारसंघातील जनतेत राजेभाऊ यांच्याच नावाला मोठी पसंती असल्याचे दिसून येत आहे. राजेभाऊ हे अतिशय साधारण कौटुंबिक परिस्थितीतून पुढे आलेले असून, काहीकाळ त्यांनी शहरात ऑटो चालवला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील यंदाचे चित्र वेगळे दिसून येऊ लागले आहे. पक्षीय समीकरणे बदलली आहेत. निवडून येण्याचे गणित जरी उमेदवार लावू लागले असले तरीही मतदारसंघातील नागरिकांत सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून राजेभाऊ फड यांच्या नावाला पसंती असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने उमेदवारी डावलली असली तरी

धनंजय मुंडेंचा मॅरेथॉन बैठकांमधून जनसंवाद

इमेज
  परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा - धनंजय मुंडे  धनंजय मुंडेंचा मॅरेथॉन बैठकांमधून जनसंवाद  मंदिरे, सामाजिक सभागृह यांसह समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध - धनंजय मुंडेंची ग्वाही परळी वैद्यनाथ (दि.30) - सातत्याने काही लोक निवडणुकीच्या तोंडावर परळीत गुंडगिरी, दहशत वगैरे शब्द वापरून परळी शहराची व शहरातील रहिवाशांची बदनामी करत आहेत. इथे सर्व समाजातील लोक गुण्या-गोविंदाने राहतात. परळी हे कायम विकसनशील शहर आहे, या शहराची व शहरातील लोकांची बदनामी करणाऱ्यांना आता जनतेने मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे.  परळी शहरातील भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज, रावळ समाज, तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी विविध समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या. समाज बांधवांच्या विविध मंदिरांची उभारणी तसेच सभागृहांच्या उभारणीसाठी जागेसह निधीचे प्रश्न सोडवले जातील, तसेच ज्या ठिकाणी रस्ते व विजेची समस्या आहे ते प्रश्न निवडणूक क्षमताच प्राधा

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  परळीतील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन परळी (प्रतिनिधी)  परळीच्या पत्रकारिता क्षेत्रात गेल्या तीन दशकापासून आपल्या लेखणी द्वारे न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कट्टर शिवसैनिक दिलीप बद्दर यांचे मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते 61 वर्षे वयाचे होते.  परळी शहरातील सुभाष चौक भागातील रहिवासी असलेले दिलीप बद्दर हे गत तीस वर्षापासून पत्रकारीतेत कार्यरत होते दैनिक सामनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीचा ठसा समाज मनावर उमटवला. याबरोबरच त्यांनी अनेक दैनिकात काम केले. परळी शहरातील कट्टर शिवसैनिक म्हणून ते परिचित होते.आपल्या पत्नी शोभना बद्दर यांना नगरसेविका म्हणुन निवडुन आणत सामाजिक कार्य केले. मागील काही महिन्यापासून ते हृदयरोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर शिर्डी व छत्रपती संभाजी नगर येथे उपचार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान मंगळवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांच्या निधनाने परळीच्या पत्रकारितेची मोठी ह

सर्वसामान्यांचा उमेद्वार - एमआयएम इन्कलाबचे आव्हान!

इमेज
  उमेदवारी अर्ज वैध: एमआयएम इन्कलाब पक्षाचे उमेदवार शेख मुस्तफा देणार तगडे आव्हान ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शेख मुस्तफा यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरला आहे.  लक्षवेधी ठरणाऱ्या या मतदारसंघात शेख मुस्तफा हे प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे करणार आहेत.          सर्वसामान्य घरातील युवक व  सामाजिक, राजकीय मोठा जनसंपर्क असलेले युवक कार्यकर्ते मुस्तफा मैनुद्दीन  शेख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून एमआयएम इन्कलाब पक्षाच्यावतीने आपली उमेदवारी दाखल केली. त्यांच्या उमेदवारीला सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सामान्यांचा उमेदवार म्हणून आपण ही निवडणूक लढवत असून लोकशाही पद्धतीने खऱ्या अर्थाने सामान्य जनतेची आपली उमेदवारी असल्याने नक्कीच परळी मतदारसंघातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्यांक, शिक्षित, सुशिक्षित, व्यावसायिक  व्यापारी, छोटे व्यापारी आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास शेख मुस्तफा यांनी व्यक्त केला आहे. आज झालेल्या छाननीत शेख मुस्तफा यां

जाणून घ्या- कोणाचे फार्म राहिले ,कोणाचे झाले बाद ?

इमेज
  परळी विधानसभा मतदार संघ : एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद; 48 अर्ज वैध  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत असून  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल झाले होते.आज दि. 30 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये एकूण 58 पैकी 10 अर्ज छाननीत बाद झाले आहेत तर 48 अर्ज वैध झाले आहेत.चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.   वैध उमेदवारांची यादी 1.राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड़ अपक्ष 2.महेंद्र अशोक ताटे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी 3धनंजय पंडितराव मुंडे नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी 4.राजश्री धनंजय मुंडे अपक्ष  5.मुस्तफा मैनोददीन शेख ऑल इंडिया मज्लिस ए इन्कलाब ए मिल्लत 6.हिदायत सादेखअली सय्यद अपक्ष 7.सुलेमान खैरोद्दीन महमद अपक्ष 8.अशफाक सज्जाद शेख अपक्ष 9.गौतम प्रकाश आदमाने अपक्ष 10.महेमुदखा स्ततानखा पठाण अपक्ष 11 राजाभाऊ श्रीराम फड अपक्ष 12.केशव ज्ञानोबा मुंडे अपक्ष 13.सेवक सखाराम जाधव अपक्ष 14. राजेसाहेब

कोणी कोणी दाखल केले परळी विधानसभा मतदारसंघात अर्ज

इमेज
  मला आमदार झाल्यासारखं वाटतंय......! परळी विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या: 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येत असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 58 उमेदवारांचे 72 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान उद्या दि. 30 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया होणार असून चार नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ● कोणी कोणी दाखल केले परळी विधानसभा मतदारसंघात अर्ज 1.राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड, रा कण्हेरवाडी ता. परळी 2.महेंद्र अशोक ताटे, रा. भीमनगर नगर, ताटे गल्ली, परळी ता. परळी 3.धनंजय पंडितराव मुंडे, मु. नाथरा पो. कौठळी ता. परळी वैजनाथ 4. राजश्री धनंजय मुंडे, मु. नाथरा पो. कौठळी ता. परळी वैजनाथ जि. 5.एजाज मिसरोद्दीन इनामदार रा. आझादनगर, माजलगाव 6.मुस्तफा मैनो‌द्दीन शेख, रा. आझाद नगर, परळी वै ता. परळी वै. 7. हिदायत सादेख अली सय्यद रा सायगाव, ता. अंबाजोगाई जिल्हा 8.सुलेमान खैरो‌द्द

पाटलांचे खंदे समर्थक ऋषीकेश बेदरे यांची उपस्थिती

इमेज
मराठायोध्दा जरांगे पाटील समर्थक विजकुमार वाव्हळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल आमदारकीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केज मतदारसंघात निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता जरांगे पाटलांच्या ‘गणितामुळे’ पारंपारिक ‘समीकरणे’ बदलण्याची शक्यता! पाटलांचे खंदे समर्थक ऋषीकेश बेदरे यांची उपस्थिती केज / प्रतिनिधी  बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीने चांगलाच रंग धरला आहे. इच्छुकांच्या गर्दीने विधानसभेचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत केवळ जरांगे फॅक्टर चालणार असुन त्याचा परिणाम पुर्ण राज्यात पहायला मिळत आहे. जरांगे पाटलांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला गनिमी कावा अजुन तरी स्पष्ट केलेला नाही. यामुळे रणनिती आखण्यास प्रस्थापिक सत्ताधारी, विरोधी पक्षांना घाम फुटला आहे. तर रणनिती नेमकी काय असावी याचा मेळ बसताना दिसत नाही.        जरांगे पाटलांच्या सुचनेवरून मराठा आरक्षणाला समर्थन देणार्‍या सर्व इच्छुक उमेदवारांना विधानसभेचे अर्ज भरण्यास सांगितले आहे. यातील कुठला अर्ज ठेवायचा, कुणाला उमेदवारी द्यायची हे येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत स्पष्ट होणार आहे. यावरून केज विधानसभा मतदार संघात राखीव जागेवर आज उद्योजक

बेरजेचे राजकारण !

इमेज
धनंजय मुंडे यांची यशस्वी खेळी: संजय दौंड यांचा विरोध केला शांत :संजय दौंड धनंजय मुंडे सोबत! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या व मोठमोठ्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या परळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया रंगात आली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मराठा कार्ड खेळले जात असताना धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात परिणामकारक ठरेल अशा प्रकारची खेळी यशस्वी करून दाखवली आहे. नाराज असलेले व परळी मतदारसंघात ज्यांच्या गाठीशी मतांचा मोठा जनप्रवाह येऊ शकतो असे नेते संजय दौंड यांना शांत करून सोबत घेण्यात धनंजय मुंडेंना यश आले आहे.         धनंजय मुंडे व संजय दौंड यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकारणाच्या पलीकडे आम्ही एकजूट व एकजीव असल्याचे चित्र सर्वांसमोर दाखवले आहे. एका बाजूला शरद पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक, त्यात मराठा कार्ड खेळून ही निवडणूक आणखीनच गुंतागुंतीची करून ठेवण्याचा प्रयत्न, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष वाटावा असे चित्र या मतदारसंघात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या अनुषंग

बीड मधून राज ठाकरे यांना मोठा झटका… परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवाराची माघार

इमेज
  बीड मधून राज ठाकरे यांना मोठा झटका… परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवाराची माघार राज्यात निवडणुकीला रंगत आली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना मनसेला मोठा धक्का दिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे चे उमेदवार अभिजित देशमुख यांनी माघार घेतली असून त्यांनी तशी माहिती माध्यमांना दिली आहे. माझे चुलते एन के. देशमुख यांनी परळी शहरात विकासाची बरेच कामे केली होती. त्यात नटराज रंगमंदिर, भाजी मंडई, जिजामाता उद्यान, परळी शहरातील टॉवर असेल अशी विकासाची कामे केली, 25 वर्षे लोटली त्यानंतर मला कुठली कामे दिसली नाहीत. सध्याचे सुरू असलेले जाती पातीचे राजकारण मला पटत नाही. जातीच्या नावाने मागणे योग्य नाही अश्या गोष्टी मला पटत नाहीत, यामुळे मी परळी विधानसभा मतदारसंघातून माघार घेत आहे.  मी शरदचंद्र पवारांचा कार्यकर्ता आहे, माझ्यासाठी ते आधारवड आहेत, माझ्या कारखान्यासाठी पवार साहेबांनी खूप मदत केली आहे. जाती पातीचे राजकारण माझ्या मनाला बोचत असल्याने माघार घेतली असल्याचे अभिजित देशमुख म्हणाले . दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीचे

AB From:मध्यरात्री दोन वाजता बीडचं ठरलं

इमेज
मध्यरात्री दोन वाजता बीडचं ठरलं!  संदिपभैय्यांविरुद्ध डाॅ.योगेश क्षीरसागर लढत होणार!     राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ योगेश क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाली आहे. रात्री दोन वाजता क्षीरसागर यांना एबी फॉर्म देण्यात आला. बीड जिल्ह्यात सहापैकी एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यांची उमेदवारी फायनल होईल असे वाटतं होते.अखेर रात्री दोन वाजता डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नावाने अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला आणि सगळा सस्पेन्स संपला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते अपक्ष म्हणून मैदानात कायमच राहणार आहेत.  

मतदारसंघातून नागरिकांची मोठी उपस्थिती

इमेज
  शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी लढत राहणार - राजेभाऊ फड राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मतदारसंघातून नागरिकांची मोठी उपस्थिती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील युवक नेते राजेभाऊ श्रीराम फड यांनी सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील माता - भगीनिंची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अर्ज दाखल करतेवेळी मतदारसंघातील जनतेची मोठ्या प्रमाणावर स्वयंस्फूर्तीने उपस्थिती होती. जनतेच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असून शेवटच्या श्वासापर्यंत मी जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणार असल्याची प्रतिक्रिया युवक नेते राजेभाऊ फड यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेभाऊ फड यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. तद्नंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवाच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. परळी विधानसभा मतदारसंघात युवक नेते राजेभाऊ फड  यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील जनता आपल्याला अनुकूल असून यंदाची विध

मुंबईतील चेंबूर व ठाण्यातील घोडबंदर येथील परळीकरांशी धनंजय मुंडेंनी साधला संवाद

इमेज
सत्तेत असो किंवा नसो माझ्या मातीतील माणसांची सेवा करण्याची शक्ती प्रभू वैद्यनाथ आणि मला द्यावी - धनंजय मुंडे मुंबईतील चेंबूर व ठाण्यातील घोडबंदर येथील परळीकरांशी धनंजय मुंडेंनी साधला संवाद सेवा हीच माझी जात आणि विकास हाच माझा धर्म - धनंजय मुंडे यांची साद मुंबई (दि. 27) - मी आज इथपर्यंतचा प्रवास केला तो माझ्या परळीतील जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर केला. परळी जनता आणि मी यांच्यात जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते आहे. परळीचा माणूस पुण्या मुंबईतच काय देशाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी त्याच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाणे हे माझे कर्तव्य आहे. आपण सत्तेत असोत किंवा नसोत, मात्र आपल्या मातीतील माणसाची सेवा करण्याचे बळ मात्र मला प्रभू वैद्यनाथाने द्यावे, अशी मी कायम प्रार्थना करत असतो, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत बोलताना केले आहे.        मुंबईतील चेंबूर व ठाण्यातील घोडबंदर येथे आज धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई, ठाणे व परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परळीकर नागरिकांशी कौटुंबिक संवाद साधला. यावेळी दोन्ही ठिकाणी परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.         

परळीत एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा आज उमेदवारी अर्ज करणार दाखल

इमेज
  परळीत एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा आज उमेदवारी अर्ज करणार दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिल्लत (ए.आय.एम.आय.एम) पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे 233 परळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.तरी सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन केले आहे.          परळी वैजनाथसह महाराष्ट्रात ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिल्लत ए.आय.एम.आय.एम.पक्ष ४३ जागा लढविणार आहेत. परळी मतदारसंघातील पहिल्या उमेद्वारची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये परळीतील एमआयएमचे उमेदवार म्हणून शेख मुस्तफांना संधी देण्यात आली आहे. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.ख़वी अबबासी साहेब यांनी दिली होती. आदेशानुसार एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.      एमआयएम इन्कलाब पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष शेख मुस्तफा हे परळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरले आहेत. सर्वसामान्य जनतेतून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय.  एमआयएम इन्कलाब

कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्या जाणून;भव्य कार्यकर्ता बैठकीतून घोषणा!

इमेज
  परळी विधानसभे संदर्भात दोन दिवसात निर्णय जाहीर करणार - प्रा.टी.पी.मुंडे कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्या जाणून;भव्य कार्यकर्ता बैठकीतून घोषणा!  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ... ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी दोन दिवसात परळी विधानसभा मतदारसंघ संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेणार असल्याची घोषणा केली. आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी औद्योगिक वसाहत सभागृह येथे भव्य कार्यकर्ता बैठक संपन्न झाली त्यांनी ही घोषणा केली आहे. सर तुम्ही फक्त निर्णय घ्या आम्ही तुमच्या निर्णयाचे पालन करू अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तसेच पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते आनंदराज आंबेडकर, मा. वामन मेश्राम, प्रकाश अण्णा शेंडगे आदींना सोबत घेऊन आरक्षणवादी आघाडी च्या माध्यमातून महाराष्ट्रातील 288 मतदार संघातील विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.    परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना मानणारा गावोगावी मोठा वर्ग आहे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची चर्चा करण्यासाठी आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचे संकेत

इमेज
  परळी मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी अटळ ! युवक नेते राजेभाऊ फड यांनी अपक्ष लढावे; कार्यकर्त्यांचा आग्रह परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 233 परळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने युवक नेते राजेभाऊ फड यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने वेगळाच उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आणि संताप व्यक्त केला जात असून, लोकभावना आपल्या बाजूने असताना सुद्धा पक्षाने डावलले असल्याने राजेभाऊ फड यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. ही बाब लक्षात घेता सोमवार, दि.28 ऑक्टोबर रोजी ते प्रचंड शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. महाविकास आघाडीकडून परळी मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. अखेर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. युवक नेते राजेभाऊ फड यांनी पक्षाकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आणि संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे फड यांच्या बाजूने मतदारसंघात अनुकूल असे