पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

इमेज
  सिरत-ऊन-नबी स्पर्धेत अलविया शेख हिला पहिले पारितोषिक  मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण परळी (प्रतिनिधी) : महेबूबिया एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने शहरातील विविध उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अंजुम उल उलुम शाळेतील अलविया  युनूस शेख हिने पहिले पारितोषिक पटकाविले. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील  उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.  स्पर्धेचे बक्षीस वितरण लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे पाहुण्यांच्या हस्ते झाले. मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्याविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धेत अलविया शेख हिने प्रथम बक्षीस मिळविले. तिला पाहुण्यांच्या हस्ते रोख रूपये सात हजार  प्रमाणपत्र व समृचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल हाजी शेख युसुफ, शेख युनूस, हाफेज इसा शेख, आसेफ शेख यासह शिक्षक व नातेवाईकांनी कौतुक करून अभिनंदन केले.

नामांतर: परळीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता 'स्व.गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था'

इमेज
नामांतर: परळीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता 'स्व.गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था' परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणानुसार विविध ठिकाणच्या औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थांना विविध लोकनेत्यांची नावे देण्यात आली आहेत यामध्ये परळी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाम फलक अनावरण व नामांतर समारंभ औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी येथे घेण्यात आला.             महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या धोरणानुसार परळी वैद्यनाथ शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 'स्व.गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था' असे करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकृत नामांतराचे फलक लावण्यात आले. यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परळी वैजनाथ च्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास

ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय निर्गमित

इमेज
  पालकमंत्री धनंजय मुंडेंचा विकासनिधी खेचून आणण्याचा धडाका सुरूच; बंजारा/लमाण तांड्यांच्या विकासासाठी 9.50 कोटी निधी मंजूर ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय निर्गमित मुंबई (दि. 11) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विविध विभागाच्या मार्फत बीड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विकास कामांना निधी खेचून आणण्याचा धडाकाच सुरू केला आहे. ग्रामविकास विभागाच्या संत सेवालाल महाराज बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनेतून परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील बंजारा/लमाण तांड्यांच्या विकासासाठी नऊ कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून बीड जिल्ह्यातील बहुतांश तांड्यांना सम प्रमाणात निधी देण्यात आला आहे. याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.  नुकतेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून 28 हजार घरकुलांसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापाठोपाठ जिल्ह्याचे उद्योग भवन, विविध रस्त्यांची दर्जा उन्नती, यासह पालकमंत्री धनंजय मुंड

रतन टाटा यांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान

इमेज
टाटा समूहाची धुरा नोएल टाटा यांच्या खांद्यावर; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड रतन टाटा यांचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे ९ ऑक्टोबरला रात्री निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेणारा व्यक्ती कोण असेल, हा प्रश्नही या निमित्ताने देशवासीय आणि टाटा समूहात उत्पन्न होणे सहाजिक होते. टाटा समूहातील विविध कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा (Noel Tata)) यांची निवड करून टाटा समूहाने रतन टाटा यांचा वारसदार निवडला आहे. टाटा ट्रस्टच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक भरारी घेतली, शिवाय टाटा समूहाने स्थापनेपासून जी सामाजिक मूल्ये जपली ती रतन टाटांच्या काळात अधिक दृढ झाली. त्यामुळे नोएल टाटा यांच्यावर रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचे फार मोठे आव्हान असणार आहे. रतन टाटा होते अविवाहित रतन टाटा यांनी लग्न केलेले नव्हते, तसेच 'टाटा ट्रस्ट'मध्ये त्यांचा वारसदार कोण असला पाहिजे

पंकजाताईंचं कार्यकर्त्यांना आवाहन

इमेज
  राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मगांवी उद्या भक्ती आणि शक्तीचा विराट संगम ! पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उसळणार लाखोंचा जनसागर शिदोरी बांधून, शांततेने, वेळेवर स्वतःची काळजी घेत  भगवान भक्तीगडावर या..पंकजाताईंचं कार्यकर्त्यांना आवाहन पाटोदा  । दिनांक ११। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी सावरगांव येथे उद्या १२ तारखेला भक्ती आणि शक्तीचा विराट संगम पहायला मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळणार आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी शांततेत, वाहने हळू चालवत, घरची भाकरी, चटणी शिदोरी आणि पाण्याची बाटली घेऊन स्वतःची काळजी घेत भगवान भक्तीगडावर वेळेत या, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.   पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ जारी करून  सर्वांना या मेळाव्याला येण्याचे आवाहन करतांना काही सूचना देखील केल्या आहेत. आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन करतांना म्हटले आहे, की सावरगावचा दसरा मेळावा ही आपली परंपरा पुढे कायम ठे

पक्षाने संधी दिल्यास आपण परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार: अभिजीत देशमुख

इमेज
पक्षाने संधी दिल्यास आपण परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास तयार: अभिजीत देशमुख परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- पक्षाने संधी दिल्यास परळी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक नेते व पक्षाच्या युवा आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस अभिजीत उत्तमराव देशमुख तसेच महाराष्ट्रा शेतकरी शुगर, ली (सायखेडा). आत्ताचा-21 शुगर, यूनिट-2 चे संस्थापक अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्री देशमुख यांच्या गणेशपार भागातील "विठाई निवास" ह्या त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि. ११) ही पत्रकार परिषद झाली. श्री देशमुख म्हणाले, परळीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात माझे काका माजी नगराध्यक्ष कै. एन. के. देशमुख (मालक) यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. परळी पालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी विविध विकास योजना कार्यान्वित केल्या, शासन दरबारी आपले संबंध वापरून त्यांनी शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणला, परळीचा सर्वांगिण विकास करण्यात कै. एन. के. देश
इमेज
  नारायण गडावर दसरा मेळाव्याची अभूतपूर्व तयारी      बीड: नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.        मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच, पहिल्यांच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर पहिला दसरा मेळावा होत आहे. या दसरा मे

कृषी विभागाची जागा बस स्थानकासाठी हस्तांतरित करण्यास परवानगी

इमेज
  सिरसाळा बसस्थानक उभारणीचा मार्ग पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला मोकळा कृषी विभागाची जागा बस स्थानकासाठी हस्तांतरित करण्यास कृषी विभागाने दिली परवानगी, शासन निर्णय निर्गमित मुंबई (दि. 09) - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एस टी बसस्थानक उभारणी साठी जागेचा प्रश्न आज पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मार्गी लागला असून, बसस्थानक साठी कृषी विभागाच्या ताब्यात असलेली व सध्या वापरात नसलेली 2 एकर जागा महसूल मार्फत राज्य परिवहन महामंडळाला हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.  कृषी विभागाचे सन 1996 सालचे कृषी तंत्रज्ञान केंद्र या जागेत होते. मात्र त्याचा कालावधी संपून ही जागा सध्या वापरात नव्हती. बस स्थानकास सिरसाळा गाव भागात अन्यत्र जागा उपलब्ध नसल्याने बसस्थानाकाचे का रखडले होते. याचाच विचार करून धनंजय मुंडे यांनी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत सदर जागेपैकी 2 एकर जागा परिवहन विभागास हस्तांतरित करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव मागवून तो मंजूर केला आहे, त्यामुळे आता सिरसाळा येथे बसस्थानक उभारणीची वाट मोकळी झाली आहे. या जागे

कामगार अपघातात मृत झाल्यास 5 लाखांचे कवच, उपचारांसाठी देखील मिळणार निधी, पशूंनाही सानुग्रह अनुदानाचे कवच

इमेज
  गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत अपघातासाठी सानुग्रह अनुदान योजनेचे कवच लागू धनंजय मुंडेंची स्वप्नपूर्ती, शासन निर्णय निर्गमित कामगार अपघातात मृत झाल्यास 5 लाखांचे कवच, उपचारांसाठी देखील मिळणार निधी, पशूंनाही सानुग्रह अनुदानाचे कवच मुंबई (दि. 09) - सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी लावलेल्या रोपट्याला आता फळे येताना दिसत असून नुकत्याच राज्य शासनाने ऊसतोड कामगारांसाठी घोषित केलेल्या अपघात विमा कवचाला सानुग्रह अनुदान योजनेचे मूर्त स्वरूपात प्राप्त झाले असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या सानुग्रह अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असून ऊस तोडणीच्या हंगामात कोणत्याही प्रकारच्या अपघातामध्ये ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याला पाच लाखांचे कवच या योजनेतून देण्यात येणार आहे, तर कायमचे अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.  ऊसतोड कामगारांच्या झोपडी व साहित्याला 10 हजारांचे, वैयक्तिक अपघातात उपचारासाठी 50 हजार रुपयांचे, लहान बैलजोडी मृत झाल्यास

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश

इमेज
  राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाचे यश  कु.तेजस्विनी सलगरे हिने पटकावले प्रथम पारितोषिक परळी / प्रतिनिधी बीड जिल्ह्याचे माजी खासदार, झुंजार स्वातंत्र्य सेनानी कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत परळी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तेजस्विनी सलगरे या विद्यार्थिनीने दमदार वक्तृत्व करत प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले. कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले होते. अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून 350 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या वक्तृत्व स्पर्धेकरिता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील अधिष्टाता डॉ.शंकर धपाटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रा.योगेश सुरवसे यांच्यासह  अनेकांची उपस्थिती होती.या वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील इयत्ता 8 वि वर्गात शिक्षण घेत असलेली कु.तेजस्विनी नीलकंठ

धनंजय मुंडे प्रथमच उपस्थित राहणार

इमेज
  पंकजा मुंडेंचा भगवान भक्तीगडावर दशकपूर्ती दसरा मेळावा: धनंजय मुंडे प्रथमच उपस्थित राहणार ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट, भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये गत दहा वर्षापासून दसरा मेळावा होतो. या मेळाव्याला आतापर्यंत धनंजय मुंडे हे कधीही उपस्थित राहिले नव्हते. परंतु आता प्रथमच धनंजय मुंडे या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे.          बीड जिल्ह्यात यावेळी दोन दसरा मेळावे लक्षवेधी होणार आहेत. यामध्ये नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे. याबरोबरच भगवान भक्ती गड येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेला दसरा मेळावा देखील प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या मेळाव्यात आज पर्यंत पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थितीत असायची. धनंजय मुंडे कधीही या मेळाव्याला उपस्थित राहिले नव्हते. परंतु यंदा प्रथमच धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंडे बह

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

इमेज
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.      ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त सोमवारी आलं होतं. त्यानंतर रतन टाटांनीच त्यांच्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती. वाढत्या वयामुळे नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचं टाटांकडून सांगण्यात आलं होतं. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आलं. त्यानंतर त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना सुरु होत्या. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही वेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.        अनेक दशके उद्योग क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजसेवेची भावना ओतप्रेत अंगी भिनलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. ते 86

शासन निर्णय निर्गमित; मुंडेंनी मानले उदय सामंत यांचे आभार

इमेज
  धनंजय मुंडेंची मागणी मित्र उदय सामंतांनी केली पूर्ण बीड जिल्हा उद्योग भवन उभारणीसाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान शासन निर्णय निर्गमित; मुंडेंनी मानले उदय सामंत यांचे आभार मुंबई (दि. 09) - केंद्र व राज्य शासनाच्या औद्योगिक विकासाच्या धोरणाला अनुसरून बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणी बाबतच्या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने जिल्ह्याचे अध्ययवत व सर्व सोयी युक्त असे उद्योग भवन असावे, याबाबतची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती, आपल्या मित्राची मागणी उदय सामंत यांनी मान्य केले असून बीड जिल्ह्यात सर्व सोयुक्त अध्यायावत उद्योग भवन उभारण्यासाठी 14 कोटी 70 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील उद्योजकांना एकाच ठिकाणी उद्योग उभारणी बाबतच्या सर्व सेवा मिळाव्यात या दृष्टीने हे उद्योग भवन अत्यंत उपयुक्त ठरणार असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीला अनुसरून सात जून रोजी झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी याबाबतचा प्रस्ताव मागवला होता

स्वतःच्या ताफ्यातील वाहन हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी दिले; अपघातग्रस्तांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी मुंडेंच्या सूचना

इमेज
  रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धनंजय मुंडे धावले स्वतःच्या ताफ्यातील वाहन  हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी दिले; अपघातग्रस्तांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी मुंडेंच्या सूचना छत्रपती संभाजीनगर (दि. 09) - कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज छत्रपती संभाजीनगर येथील कामकाज आटोपून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जात असताना संभाजीनगर शहरालगतच्या हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी धनंजय मुंडे धावले.  धनंजय मुंडे हे समृद्धी महामार्गाकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. एक पुरुष व एक महिला मोटरसायकल वरून जात असताना एका वाहनाने त्यांना जोराची धडक दिली, त्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव होत होता.  धनंजय मुंडे यांनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवला. स्वतःचा स्टाफ आणि जवळ आज उभ्या असणाऱ्या माणसांच्या मदतीने या जखमींना आपल्या ताफ्यातील सुरक्षेचे पोलीस वाहन उपलब्ध करून दिले व गाडीत रुग्णांना घेऊन तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये जाण्याची सूचना केली. माझ्यासोबत सुरक्षा साठी वाहन नसले तरी चालेल मात्र आधी या जखमींना घ

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी!

इमेज
  पालकमंत्री धनंजय मुंडेंचे बीड जिल्हा वासीयांना मोठे गिफ्ट  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यात तब्बल 28 हजार घरकुलांना शासनाची मंजुरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी! मुंबई (दि. 09) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना ऐन सणासुदीच्या काळात मोठे गिफ्ट दिले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून जिल्ह्यासाठी तब्बल 28 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.  याबाबतचे शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये एका शासन निर्णयाद्वारे 17081 तर दुसऱ्या शासन निर्णयाद्वारे 9941 अशा एकूण 28 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री श्री अतुल सावे यांचे याबद्दल आभार मानले आहेत.  विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील गरजू नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतुन स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये निधी दिला जातो.  बीड जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्य

दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रम

इमेज
  दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रम ह. भ. प. श्री. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दाऊतपूर येथील माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त ह. भ. प. श्री. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होणार आहे. तरी किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिडगर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.          परळी तालुक्यातील मौजे दाऊतपूर येथील माजी सरपंच, जेष्ठ नागरिक, सामाजिक, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अश्विन शु.10 (विजयादशमी) शनिवार दि.12 ऑक्टोंबर रोजी सकाळी 12 ते 2 ह. भ. प. श्री. मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होणार आहे. परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी तसेच ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविकांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी श्री हनुमान मंदिर दाऊतपूर (परळी ते गंगाखेड रोडवर)

पाणीपुरवठा आता होणार दोन दिवसाआड

इमेज
  परळी शहराचा पाणीपुरवठा आता होणार दोन दिवसाआड; अश्विन मोगरकर यांच्या पाठपुराव्याला यश परळी वैजनाथ गणेशपार भागात मागील आठवड्यापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त शिष्टमंडळाने तक्रारींचा पाढा आक्रमकपणे मुख्याधिकार्यां समोर मांडल्यावर गावभागतील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याच्या सूचना विभागास दिल्या. तसेच अश्विन मोगरकर यांनी वारंवार केलेल्या मागणीनुसार पुढील आठवड्यापासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. गावभागतील गणेशपार विभागात मागील आठवड्यापासून पाणी न आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत होते. नवरात्र चालू आहे, दसरा दिवाळी तोंडावर आहे, तरीही नगरपरिषद प्रशासनाला नागरिकांच्या अडचणीही कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.  याविरोधात  गावभागातील नागरिकांनी परळी नगरपरिषद मुख्याधिकार्यांना भेटून पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. मुख्याधिकार्यांनी त्वरित पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. नागापूरच्या धरणात पाण्याची कमतरता असताना पाणी पाच दिवसाआड

रेल्वेप्रश्नांवर जिव्हाळ्याच्या मागण्या....

इमेज
  नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची डीआरएम यांच्याकडे मागणी-जी.एस.सौंदळे   द्वादश पंचम ज्योतीर्लिंग श्री.वैद्यनाथ क्षेत्र परळी मार्गे पुणे- पनवेल जाणा-या नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी व स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवून या रेल्वेने दाटीवाटीने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करून परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागिय व्यवस्थापक श्री.भरतेशकुमार जैन  परळी रेल्वे स्थानक येथे तपासणीनिमित्त बुधवार दि.9 अॉक्टोंबर रोजी आले असताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ बीड जिल्हा व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली.    नांदेड-पनवेल रेल्वेगाडी च्या बोगी वाढवण्याच्या मागणीसह प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण मागण्या निवेदनात करण्यात आल्या यामध्ये 1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी,यशवंतपुर-बीदर एक्सप्रेस,

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा बीड दौरा कार्यक्रम

इमेज
  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा बीड दौरा कार्यक्रम  बीड, दि. 8 (जि. मा. का.) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे बुधवार, दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत त्यांच्या दौ-याचा तपशील  खालीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 9.55 वाजता शासकीय हेलीकॅप्टरने बीडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बीड यथील पोलीस ग्राऊंडवर आगमन 10.35 वाजता बीड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत विविध क्षेत्रातील  व्यक्तींशी ते  संवाद साधतील. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजून 10 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह, बीड येथून पोलीस ग्राऊंडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता शासकीय हेलीकॉप्टरने  ते जालनाकडे प्रयाण करतील.

दिव्यांगांच्या हृदयातील वेदना ओळखणारा नेता म्हणजे ना.धनंजय मुंडे- डॉ.संतोष मुंडे

इमेज
  परळी हा येणाऱ्या काळात दिव्यांगांसाठी सर्वात जास्त सुविधा उपलब्ध करून देणारा मतदार संघ असेल - ना.धनंजय मुंडे  दिव्यांगांच्या हृदयातील वेदना ओळखणारा नेता म्हणजे ना.धनंजय मुंडे- डॉ.संतोष मुंडे भव्य मोफत श्रवण यंत्र शिबिराचा घेतला १००० कर्णबधिरांनी लाभ ३७०० पेक्षा जास्त नागरिकांनी केली नवीन नावनोंदणी परळी प्रतिनिधी : दिनांक ९ ऑक्टोबर कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून दिनांक ७ ऑक्टोबर व ८ ऑक्टोबर  रोजी श्रीनाथ हॉस्पिटल येथे कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबीर अतिशय यशस्वी पणे संपन झाले . तब्बल १००० कर्णबधिर नागरिकांना या डिजिटल श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आणि ३७०० पेक्षा जास्त नवीन नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली. अशी माहिती दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडे यांनी दिली. या भव्य मोफत शिबिराचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, पर

कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन

इमेज
बियाणे समिती : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या उपससमितीच्या सदस्यपदी गोविंद देशमुख, विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची निवड कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांनी केले अभिनंदन मुंबई दि 8 ऑक्टोबर 2024-: केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी आणि फलोत्पादन बियाणे उपसमितीच्या सदस्यपदी परळी वैजनाथ येथील गोविंदराव देशमुख, ऍड.विष्णुपंत सोळंके, अतुल मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जाहीर केले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या पदाधिकाऱ्यांची शिफारस केली होती. केंद्र सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालया अंतर्गत केंद्रीय बियाणे समिती कार्यरत असते. ही समिती राज्यनिहाय उपसमित्यांची नेमणूक करते. बियाणे कायदा, 1966 च्या अंमलबजावणीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणे, राज्यातील बियाणे कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि राज्य सरकार/केंद्रीय बियाणे समितीला नियतकालिक अहवाल पाठवणे, राज्य बियाणे चाचणी प्रयोगशाळेची तपासणी करणे आणि बियाणे कायद्यांतर्गत राज्य बियाणे चाचणी प्रयोगशाळा म

राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज

इमेज
  जागर भक्तीचा..सागर शक्तीचा.. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग ! राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत पाटोदा । दिनांक ०८। राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे  उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिली आहे.   येत्या १२ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने 'आपला दसरा, आपली परंपरा' जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंक

स्पेशल एडिशनमधील मुलाखतीत आ. पंकजाताईंच्या कार्याचा मॅगझिनने केला गौरव

इमेज
'सोसायटी अचिव्हर्स' इंग्रजी मॅग्झिनमध्ये आ.पंकजाताई मुंडे झळकल्या! स्पेशल एडिशनमधील मुलाखतीत आ. पंकजाताईंच्या कार्याचा मॅगझिनने केला गौरव नीता अंबानी, नीरजा बिर्ला, हेमामालिनी, सुधा मूर्तीसह   विविध क्षेत्रातील नामवंत महिलांच्या मॅगझिनमध्ये मुलाखती मुंबई दि. ०८ ----- भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्रातील धडाडीच्या नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची एक विशेष मुलाखत 'सोसायटी अचिव्हर्स' या मुंबईतून प्रकाशित होणा-या सुप्रसिद्ध इंग्रजी मॅग्झिनने घेतली असून स्पेशल एडिशनमध्ये त्यांच्या राजकीय कार्याचा गौरव केला  आहे. मॅगझिनने राज्यातील व देशातील विविध क्षेत्रात उत्तुंग यश व नावलौकिक प्राप्त केलेल्या महिलांच्या मुलाखती या अंकात घेतल्या असून त्या रांगेत आ. पंकजाताईंची देखील मुलाखत घेतली आहे.    'सोसायटी अचिव्हर्स' मॅग्झिनची एक स्पेशल एडिशन या महिन्यात  प्रसिद्ध झाली आहे. या इंग्रजी मासिकाचा देश विदेशात मोठा वाचक वर्ग आहे. आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या धडाकेबाज कामातून राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे शिवाय काम करण्याची त्यांची एक स्वतःची खास शैली आह

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवली होती नावे; बीडच्या आयटीआयला स्व.विनायकराव मेटे यांचे नाव

इमेज
  परळीच्या आयटीआयला लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे तर अंबाजोगाई आयटीआयला स्व.प्रमोद महाजनांचे नाव पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवली होती नावे; बीडच्या आयटीआयला स्व.विनायकराव मेटे यांचे नाव बीड (दि. 08) - महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व उद्योजकता विभागाने घोषित केलेल्या निर्णयाप्रमाणे बीड जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मान्यवरांची नावे देण्यात येत असून, बीड जिल्ह्यातील परळी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे तर अंबाजोगाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व.प्रमोद महाजन यांचे तसेच बीड शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्व.विनायकराव मेटे यांचे आणि महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस राणी पद्मिनी यांचे नाव देण्याचा निर्णय विभागाने जाहीर केला आहे.  या नावांबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहेत.  राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अशाप्रकारे मान्यवरांची व समाजभूषण व्यक्तींची नावे देण्याचा निर्णय कौशल्य व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात

परळी वैजनाथ ते अंबाजोगाई: श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपची पायी दिंडी

इमेज
परळी वैजनाथ ते अंबाजोगाई: श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपची पायी दिंडी  परळी वैजनाथ /प्रतिनिधी रविवार, 6 ऑक्टोबर रोजी, पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ आरती ग्रुपच्या वतीने परळी वैजनाथ येथून अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी 111 भाविकांची भव्य पायी दिंडी निघाली. या दिंडीचे ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई राजा उदो उदो चा जयघोष व ढोल ताशाच्या निनादात हा पायी दिंडी सोहळा निघाला होता. गेल्या सात वर्षांपासून नवरात्रीमध्ये श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आरती ग्रुपच्या सदस्यांनी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. रविवारी रात्री एक वाजता ढोल ताशांच्या गजरात व "आई राजा उदो उदो" च्या जयघोषात हा सोहळा प्रारंभ झाला. दिंडीची सोहळा पहाटे पाच वाजता अंबाजोगाईत दाखल झाली. येथे संत श्री भगवान बाबा चौकात पोचल्यावर व्यापारी श्री पंपटवार यांच्या वतीने सर्व भाविकांना चहा, पाणी आणि नाश्ता देण्यात आला. योगेश्वरी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. तसेच, सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या  महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड ज
इमेज
  ‘मुझे गिराने के लिए, कई बडे लोग बार बार गिरे, मगर ये मुमकिन नही है - धनंजय मुंडे         आम्ही ज्यांचा आजही आदर करतो, त्यांचा आदर बाळगतो भलेही आम्ही अजितदादांसोबत आहोत पण कधीही व्यक्तीगत त्यांच्यावर टीका आम्ही केली नाही. मात्र माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका करावी लागते हे योग्य नाही.         आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका लावला आहे. ,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांना शरद पवार गटाकडून लक्ष्य केलं जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही शरद पवार यांनी लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे.        ‘मुझे गिराने के लिए    कई बडे लोग बार बार गिरे.     मगर ये मुमकिन नही है. मला इथेच बांधून ठेवणं, मला लक्ष्य करणे हे आजचं नाही. अनेक जणांनी हा प्रयत्न केला आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो. त्या नेत्यांना ही पातळी गाठली आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारां

पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,मथुरा यांच्या वतीने प्रा. डॉ. वैजनाथ कानगुले यांना "विद्यावाचस्पती सारस्वत" डॉक्टरेट पदवी प्रदान

इमेज
पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,मथुरा यांच्या वतीने प्रा. डॉ. वैजनाथ कानगुले यांना "विद्यावाचस्पती सारस्वत" डॉक्टरेट पदवी प्रदान गेल्या 26 वर्षा पासून परळी वैजनाथ येथे ओम कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रा वैजनाथ कानगुले यांना 29 सप्टेंबर  2024 रोजी दिल्ली येथे"पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,मथुरा यांच्या वतीने भव्य अशा दीक्षांत समारोह कार्यक्रमात"विद्यावाचस्पती सारस्वत" ही डॉक्टरेट पदवी पद्मश्री डॉ अरविंद कुमार, कुलगुरू डॉ इंदूभूषण मिश्रा,सुश्री दीपा मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.ही त्यांची दुसरी डॉक्टरेट पदवी आहे या अगोदर 30 डिसेंबर 2023 होसूर तामिळनाडू येथे"एशिया इंटरनॅशनल कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटी,चेन्नई यांच्या वतीने सुद्धा डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे.सरांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे.       नांदेड पॅटर्न चे जनक,चौगुले कोचिंग क्लासेस (सध्या चे आय आय बी) चे संस्थापक गणेश चौगुले सर यांचा आदर्श डोळ्यासमोर  ठेऊन ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर

इमेज
  मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर पुणे, प्रतिनिधी... मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा उषा तांबे आणि कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.          महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधिंची महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या तख्तावर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता साहित्यप्रेमींना होती.बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावर्षी संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार- विचारवंत विनय हर्डीकर आदी नावे चर्चेत होती. यापूर्वी १

चिडीमार पथक नामशेष

इमेज
  क्लासेसला जात असलेल्या सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  शहरातील संत सावतामाळी परिसरातुन कुंभारगल्लीमार्गे क्लासेसला जात असलेल्या एका 16 वर्षीय मुलीचा त्याच भागातील एकाने विनयभंग केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील संत सावतामाळी परिसरातील सोळा वर्षीय मुलगी शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता सावतामाळी मंदिर जवळील रस्त्यावरुन कुभांरगल्ली मार्गे क्लासेसला जात असताना आरोपी राहुल विठ्ठल गायकवाड रा.सावतामाळी,परळी हा पाठिमागुन दुचाकीवर आला व मला तुझा मोबाईल नंबर दे नाहीतर तुला उचलुन घेवुन जाईन असे म्हणत विनयभंग केला.याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन संभाजीनगर पोलिस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जाधवर पिंक पथक अंबाजोगाई हे करत आहेत. @@@@@@ चिडीमार पथक नामशेष  परळी शहरासाठी असलेल्या शहर व संभाजीनगर पोलिस ठाण्यात दोन वर्षापुर्वी चिडीमार पथक कार्यरत असल्याने रस्त्यावर मुली,महिलांच्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसला होता.सध्या चिडीमार पथक नामशेष असुन शहरात गस्त घालण्यासाठी देण्यात आले

भजन हे परमात्माशी संवाद साधण्याचे माध्यम- अमोल महाराज बोधले

इमेज
  महिला भजन स्पर्धेत कळंब प्रथम, परळी द्वितीय तर उदगीर केंद्रास तृतीय पारितोषिक  भजन हे परमात्माशी संवाद साधण्याचे माध्यम- अमोल महाराज बोधले  परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या  महिला भजन स्पर्धेत कळंब प्रथम, परळी द्वितीय तर उदगीर येथील भजनी मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावले. तर कामगार पुरुष भजन स्पर्धेत निलंगा प्रथम, कळंब द्वितीय तर बीडला तृतीय पारितोषिक मिळाले. धाराशिव येथील कामगार कल्याण भवनमध्ये शनिवारी ( दि.  ५) या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत लातुर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील ८ भजनी मंडळानी सहभाग घेतला.  या स्पर्धेत सहभागी संघांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या स्पर्धेतचे पारितोषिक वितरण जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रमुख पाहूणे ह.भ.प.अमोल महाराज बोधले, महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनचे मुंबईचे मा. अध्यक्ष भागवतराव धस, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, परिक्षक सुनिताताई आडसुळ, ह.भ.प.पांडुरंग शिंपले, योगेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती झाले. प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यानी केले