पोस्ट्स

MB NEWS-बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा एससी तर १८ जागा ओबीसींना राखीव

इमेज
  बीड जिल्हा परिषदेतील ६९ पैकी ९ जागा एससी तर १८ जागा ओबीसींना राखीव बीड : बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव आहेत. लोकसंख्येच्या क्रमानुसार त्या आरक्षीत करण्यात आल्या. त्यानुसार उमापुर, मोगरा, किट्टी आडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत.       बीड जिल्ह्यातील ६९ जिल्हापरिषद गटांपैकी १८ गट ओबीसींना राखीव ठेवण्यात आले आहेत. यात रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. --------- *बीड जिल्हा परिषद गटांचे संपूर्ण आरक्षण* बीड : बीड जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठिची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एससी ८, एसटी १, ओबीसी १८ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत.  *गटांसाठीचे आरक्षण खालीलप्रमाणे  ● *एससी -*  उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगलवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठ

MB NEWS-विद्यापीठस्तरीय एन.एस . एस.चे पुरस्कार प्रदान सर्वोकृष्ट वैद्यनाथ कॉलेज तर प्रा.डॉ. माधव रोडे उत्कृष्ट कार्यक्रमधिकारी

इमेज
  विद्यापीठस्तरीय एन.एस . एस. चे पुरस्कार प्रदान सर्वोकृष्ट वैद्यनाथ कॉलेज तर प्रा.डॉ. माधव रोडे उत्कृष्ट कार्यक्रमधिकारी परळी -वै: - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एन . एस . एस . विभागाच्या वतीने मागिल चार वर्षाचे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या नुकतेच वितरण करण्यात आले . त्यात सन - २०१९-२० चा विद्यापीठस्तरीय सर्वोकृष्ट कॉलेज एकक वैद्यनाथ कॉलेज  व उत्कृष्ट कार्यक्रमधिकारी प्रा.डॉ.माधव रोडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले .         या पुरस्कारचे वितरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाटयगृहत दि . २६ जुलै २०२२ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ . प्रमोदजी येवले यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य एन.एस.एस.समन्वयक प्रा. डॉ . प्रशांत वंजे, एन . एस . एस . ईं . टी. सी . प्रशिक्षण केंद्र अहमदपुर चे संचालक प्रा . डॉ . विजय बोराडे, विद्यापीठचे  एन.एस. एस . विभागाचे संचालक प्रा . डॉ . आनंद देशमखु , प्रा . डॉ . टी. आर . पाटील यांच्या उपस्थिती कुलगुरू प्रो . डॉ . प्रमोदजी येवले यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट वैद्यनाथ कॉलेज पुरस्कार प्राचार्य डॉ . डी . व्ही मेश्राम व एन . एस . एस .  क

MB NEWS-रंभापुरी महापिठाकडून डॉक्टर सुरेश चौधरी यांना "शिवाद्वैत भास्कर " उपाधी; स्वातंत्र्यसैनिक कुटुंबांचाही सन्मान

इमेज
  रंभापुरी महापिठाकडून डॉक्टर सुरेश चौधरी यांना "शिवाद्वैत भास्कर" उपाधी; स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांचाही सन्मान परळी ,. श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू, कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी  यांच्या हस्ते  25 जुलै 2022 रोजी आषाढमास तपोअनुष्ठान सांगता कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवाराचे जगद्गुरू महास्वामीजींच्या हस्ते "अमृत रत्न "  प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच  अनुष्ठान समितीचे प्रमुख डॉ सुरेश चौधरी, "शिवाद्वैत भास्कर " ही पदवी देऊन गौरविण्यात आले,                            डॉ सुरेश चौधरी यांचा वेद,वेदांत,भगवद्गीता, उपनिषद, योगशास्त्र, सिद्धांत शिखामणी, आध्यात्म यांचा सखोल अभ्यास व प्रकांड पांडित्य असल्याचा उल्लेख करून  रंभापुरी पिठाकडून जगद्गुरुंनी  शिवाद्वैत भास्कर ही पदवी देऊन सन्मानित केले.      येथील आषाढ मास अनुष्ठान व जगद्गुरु यांची अड्ड पालखी सोहळा न भूतो न भविष्यती व सुवर्णाक्षरांनी लि

MB NEWS-सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकते बीड जिल्ह्यात सर्वप्रथम

इमेज
 *99.6 टक्के गुण संपादन:  सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकते बीड जिल्ह्यात सर्वप्रथम* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी अनुष्का अनिल देवकते हिने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.99.6 टक्के गुण संपादन करून सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकतेने बीड जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.      अनुष्का अनिल देवकते  ही परळीच्या भेल सेकंडरी स्कुलची विद्यार्थिनी आहे.बसस्थानक पार्किंग येथे काम करणारे अनिल देवकते यांची मुलगी अनुष्का  हिने आतापर्यंत विविध परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. यापुर्वी शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परिक्षेत तिने यश मिळवलेले आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालात तिने यशोशिखर गाठले आहे.अनुष्का अनिल देवकते हिने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.99.6 टक्के गुण संपादन करून सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकतेने बीड जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्रदान

इमेज
  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्रदान  महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट तर डॉ. प्रा.एल. एस. मुंडे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी परळी वैजनाथ ता.२७ (प्रतिनिधी)        डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या २०१७-१८ यावर्षीचा विद्यापीठ स्तरावरील पुरस्कारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची निवड झाली आहे तर याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा.एल.एस. मुंडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याचे मंगळवारी (ता.२६) विद्यापीठातील एका समारंभात कुलगुरूंच्या हस्ते वितरण करण्यात आले.           राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत २०१७-१८  मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देण्यात येतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागास व

MB NEWS-क्रुुरपणे बेकायदेशीर गर्भपात करणार्‍या तथाकथित डॉक्टरला अटक

इमेज
क्रुुरपणे बेकायदेशीर  गर्भपात करणार्‍या तथाकथित डॉक्टरला अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      अतिशय घृणास्पद व क्रुुरपणे गर्भपात करून देणाऱ्या तथाकथित डॉक्टरला परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.         परळी येथील शिवाजीनगरमधील एका विवाहितेचे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून  गर्भपात केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी बार्शी येथील तथाकथित डॉक्टरला मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींच्या शोधासाठी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी तीन पथके नियुक्त केलेली आहेत. मुलगी नको, असे म्हणून तथाकथित डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. त्यानंतर तथाकथित डॉक्टरने  गर्भ अक्षरश:ओढून बाहेर काढला व गर्भपात करुन दिला. या प्रकरणी संभाजीनगर  पोलिसांनी तथाकथित डॉक्टर नंदकुमार स्वामी यास बार्शी येथून अटक केली.पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, पोलीस सचिन सानप व  गोपीनाथ डाके यांनी आरोपीला ताब्यात घेतले. 

MB NEWS-शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

इमेज
  शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ  शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा परळी (प्रतिनिधी)  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात शिवसेनेच्या वतीने बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरूवात करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस निमित्त परळी वैजनाथ शहरात विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात शहरातील मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी विधीवत पुजा करून श्रीफळ अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांनतर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन आणि याच परिसरात सोन चाफा व बेल या वृक्षाचे वृक्षारोपण शिवसेना बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, माजी उपनगराध

MB NEWS-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या पंकजाताई मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

इमेज
  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या  पंकजाताई मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य अन् सुयशासाठी दिले शुभाशीर्वाद ! मुंबई  ।दिनांक २७। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुयशासाठी शुभाशीर्वाद दिले. पंकजाताईंनी या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांचे मनापासून आभार मानले.    पंकजाताई मुंडे यांचा काल वाढदिवस होता. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि शेतकरी चिंतित असल्याने त्यांनी वाढदिवस साजरा केला नाही. सेलिब्रेशन करण्यापेक्षा समाजातील गरजूंना सेवेच्या माध्यमातून मदत करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले होते.     काल देशभरातील प्रमुख नेत्यांनी विविध माध्यमांतून पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत राज्यातील विविध विषयांवर त्य

MB NEWS-विद्युत तारेचा कंरट लागला;शेतकऱ्याचा मृत्यू

इमेज
  विद्युत तारेचा कंरट लागला; एका शेतकऱ्याचा मृत्यू  गेवराई, प्रतिनिधी... रानडुकरापासून संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला तार कुंपण लावून त्यात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे घडली. यात एका शेळीचाही शोक लागुण मृत्यू झाला. नंदु उद्धव थोपटे (वय ४०, रा. अर्धमसला, ता.गेवराई) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी आपल्या शेतात काम करून सायंकाळच्या सुमारास घरी निघाले असताना सोबत असलेली शेळी ऊसात गेली असता तीला पाहण्यासाठी सदरील शेतकरी ऊसात गेला. त्याचवेळी रानडुकरापासून संरक्षण मिळावे यासाठी लावलेल्या तारेत सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. यात शेळीचाही शॉक लागून मृत्यू झाला. मंगळवार रोजी रात्री शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे अर्धमसला परिसरात हळहळ व्यक्त होत

MB NEWS-मान्सून शो कला प्रदर्शनात चिञकार प्रा.श्रीकांत दहिवाळ यांच्या चित्रांना पसंती

इमेज
  मान्सून शो कला प्रदर्शनात चिञकार प्रा.श्रीकांत दहिवाळ यांच्या चित्रांना पसंती परळी वैजनाथ..... द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूशनच्या वतीने औरंगाबाद येथील यशवंत कला महाविद्यालयाच्या कलादालनात 'मान्सून शो 2022' हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील 31 अनुदानित कला महाविद्यालयातील 45 प्राचार्य, प्राध्यापकाच्या 104 कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. 30 जुलै 2022 पर्यंत सर्वांसाठी खुल्या राहणाऱ्या या प्रदर्शनात बीडच्या कैलास कला निकेतनच्या, प्राचार्य प्रवीण मुखेकर, प्रा. श्रीकांत पुरी, प्रा. श्रीकांत दहिवाळ या तीन प्राध्यापकांचे पेंटिंग समाविष्ट करण्यात आले आहे. स्वातंत्र्य सेनानी,सुप्रसिद्ध चिञकार कै. दताञय दहिवाळ गुरुजीचे चिञकार प्रा.श्रीकांत दहिवाळ हे चिरंजीव आहेत.वडिलांकडुन घेतलेला चिञकलेचा वारसा पुढे घेऊन अनेक चिञ प्रदर्शनात त्यांनी आपली चिञकलेच प्रदर्शन करुन प्रा.श्रीकांत दहिवाळ हे दहिवाळ परिवाराचे व परळीच नावलौकिक करत आहेत.चिञकले बरोबर गायन कला ही त्यांनी जोपासली असुन अतिषय उत्तम बासरी,शिळवादनातुन आपली कला सादर करतात. परळीकर असलेल्या चिञकार श्रीकां

MB NEWS-चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात एकाला अटक

इमेज
चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात एकाला अटक  बीड- इंटरनेट कॅफे च्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या बीड येथील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी चे चार ते पाच गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यात चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास करताना सायबर शाखेने संत नामदेव नगर भागात इंटरनेट कॅफे चालवणाऱ्या गोविंद बापूराव क्षीरसागर या व्यक्तीस अटक केली आहे.या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी चे चार ते पाच गुन्हे दाखल झाले होते.लहान मुलांचे व्हिडीओ इंटरनेट वर टाकून त्यांच्या पालकांची अन बालकांची बदनामी करण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली होती. गेल्या महिनाभरापासून पोलीस या प्रकरणात आरोपीचा शोध घेत होते.

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक उपक्रम:उमाताई समशेट्टे यांच्या वतीने 51 महिलांची कपिलधार वारी

इमेज
पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक उपक्रम:उमाताई समशेट्टे यांच्या वतीने  51 महिलांची कपिलधार वारी   परळी वैजनाथ...      भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळी शहरातील विविध भागांतील ५१ महिलांना श्री क्षेत्र कपिलधार येथे दर्शन व अभिषेकाची सोय नगर परिषद सदस्या सौ उमाताई समशेट्टे यांच्या तर्फे करण्यात आली. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. २६ जुलै, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस राज्यभरासह परळीतील कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, लोकोपयोगी उपक्रम राबवत उत्साहात साजरा केला. आपला वाढदिवस समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा करून साजरा करावा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, गरजू महिलांना शिलाई मशीन, भारतीय डाक विभागाचा दहा लाखांचा अपघात विमा, दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, रूग्णांना फळ आणि ब्लॅकेट वाटप, प्रभू वैद्यनाथ अभिषेक, दर्ग्यास चादर आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.  याचाच एक भाग म्हणून रोजच्याच आपल्या घर कामात व्यस्त अस

MB NEWS-संत नामदेव: विवेकी प्रबोधन परंपरेचे नायक

इमेज
संत नामदेव: विवेकी प्रबोधन परंपरेचे नायक                   - ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज ----------------------------------- *महाराष्ट्रामध्ये विवेकी प्रबोधनाचा अखंड जागर वारकरी संतांनी केला. या वारकरी विचार परंपरेचे नायक म्हणून संत नामदेव महाराज यांच्याकडे पाहिले जाते. विविध जातीतील त्यांचे समकालीन 24 मराठी संत कवी  होते आणि ते नामदेवांना आदर्श मानत होते. इतकेच नव्हे तर त्यांचे समकालीन कानडी संत पुरंदरदास आणि हिंदी कवी संत कबीर यांच्यावरही नामदेवांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. वारकरी परंपरेचे कळस म्हणून गौरविलेले तुकाराम महाराज हे तर नामदेव महाराज हे आपल्या अभंग रचनेची प्रेरणा असल्याचे सांगतात. यावरून संत नामदेव हे संत प्रबोधन परंपरेचे नायक आहेत, असे ठामपणे म्हणता येईल.* संत नामदेव यांनी विवेकी वारकरी प्रबोधनाच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले. तसे संपूर्ण भारताचे भ्रमण करणारे ते पहिले मराठी संत होते.  ते संत चरित्रकार आहेत, आत्मचरित्रकार आहेत, पहिले वारकरी कीर्तनकार आहेत अशा विविध भूमिकांमध्ये आपण नामदेव महाराज यांना पाहू शकतो.  जातीभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणा-या स

MB NEWS-मुलगी नको, मुलगाच हवा हट्टापायी बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान व कापून काढला गर्भ

इमेज
  मुलगी नको, मुलगाच हवा हट्टापायी बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान व कापून काढला गर्भ  • _सासू, पती,व डॉक्टरसह चौघांवर गुन्हा_ परळी वैजनाथ ,...       मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ अक्षरश: कापून बाहेर काढला. या प्रकरणातील पिडीत मातेच्या फिर्यादीवरून सासू, पती,व डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे.       पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, शिवाजीनगर, थर्मल भागातील रहिवासी पिडिता आहे. मागील वर्षी मुलीला जन्म दिलेली ही विवाहिता पुन्हा गर्भवती राहिली. परंतु, दुसऱ्या वेळेस मुलगी नको, मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी एका डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून त्या डॉक्टरने गर्भ अक्षरश: कापून बाहेर काढला. मुलगी असो वा मुलगा, मला गर्भपात नको, माझ्या बाळाला मारू नका असा आक्रोश करणाऱ्या मातेकडेही त्या डॉक्टरने

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत रक्तदान,कोविड बूस्टर डोस व मोफत दंतचिकित्सा शिबीर

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत  रक्तदान,कोविड बूस्टर डोस व मोफत  दंतचिकित्सा शिबीर जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा- प्रा पवन मुंडे परळी प्रतिनिधी : मा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी 10:30 वाजता भव्य रक्तदान शिबीर व नागरिकांना कोविड बूस्टर डोस देण्याबरोबरच  मोफत भव्य दंतचिकित्सा शिबिर होणार असून या मध्ये परळीतील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ शुभम  ईश्वरप्रसाद लाहोटी व डॉ मीरा शुभम लाहोटी हे उपस्थितीत राहणार असून शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.       या शिबिरा मध्ये रुग्णांच्या दाता संबंधित अनेक समस्यांच्या मोफत x ray द्वारा तपासणी करण्यात येणार असून, रुग्णांच्या दातांमध्ये सीमेंट-चांदी भरणे, रूट कॅनल करणे, दातांवर कॅंप लावणे,दात स्वच्छ करणे,दातांच्या हिरड्या विषयक समस्यांवर विलाज, डेंटल इंप्लॅन्ट करणे आदी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून , प

MB NEWS-वंचित, पिडित घटकांची सेवा हयाच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा -पंकजाताई मुंडे

इमेज
  वंचित, पिडित घटकांची सेवा हयाच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा -पंकजाताई मुंडे मुंबई  ।दिनांक २४। माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हार, बुके, मोठं सेलिब्रेशन करण्यापेक्षा समाजातील गरजूंना मदत करा, समाजाच्या सेवेचे उपक्रम राबवा, आपल्या हातून झालेली वंचित, पिडित घटकांची सेवा हयाच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा आहेत असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.  वाढदिवसाला भेटीसाठी येऊ नका, जिथं आहात तिथूनच शुभेच्छा द्या अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.   पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस येत्या २६ जूलै रोजी आहे, त्या अनुषंगाने त्यांनी राज्यभरातील तमाम कार्यकर्त्यांना यासंदर्भात फेसबुकवर व्हिडीओ संदेश द्वारे विनंतीवजा आवाहन केलं आहे.  "खूप लोकांना वाटतयं की ताईंची भेट घ्यावी, वाढदिवसाला काहीतरी करावं. ताईची नजर त्यावर पडावी, ताईनी ते पहावं. पण प्रत्येकापर्यंत मला पोचणं शक्य नाही, त्यातच राज्यात अतिवृष्टी होत आहे, शेतकरी चिंतित आहे, राजकीय उलथापालथ होत आहे, त्यामुळे माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, यावेळी मला क्षमा करावी. राजकीय नेत्यांनी, सेलिब्रेटींनी वाढदिवस मोठया प्रमाणा

MB NEWS-नागापूर धरणात युवक बुडाला; शोध मोहीम सुरू

इमेज
  नागापूर धरणात युवक बुडाला; शोध मोहीम सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणात पोहायला गेलेल्या एक युवक धरणात बुडाला आहे.        याबाबत माहिती अशी की परळी शहरातील जुना रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी असलेला युवक शेख तालेब शेख जानी वय 24  हा तरुण  नागापुर वाण धरणात बुडाला असुन शोध मोहीम चालू आहे. काही दिवसापूर्वीच परळीचा मुख्य जलस्त्रोत असलेला नागापूरचा वाहन प्रकल्प तुडुंब भरला असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे त्याचप्रमाणे नागापूर वाहन प्रकल्प सेल्फी पॉईंट बनला आहे धरणात पोहायला जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे असाच हा युवक धरणावर गेला होता धरणात पडून तो बुडाला असून त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. घटनास्थळी परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर ठाण मांडून असून नगरपालिकेचे आपत्कालीन पथक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन शोध मोहिमेत काम करत आहे.

MB NEWS-✍️• प्रदीप कुलकर्णी यांचा अभिष्टचिंतन लेख >>>>गर्दीतील लोकनेत्या.........!

इमेज
  गर्दीतील लोकनेत्या.........!                     ✍️ • प्रदीप कुलकर्णी • ------------------------------------------------------- लोकनेत्याचा वारसा जपणं आणि तो यशस्वीपणे पुढे चालवणं हे म्हणावं तितकं सोप नाही. मुंडे साहेब आणि गर्दी हे जसं समीकरण होतं तसचं समीकरण पंकजाताई यांच्याबाबतीतही आहे पक्षाचं राष्ट्रीय सचिवपद सोडलं तर त्यांच्याकडे घटनात्मक असं कोणतही पद नसलं तरी त्या आजही जिथं जातील तिथं लोकांची गर्दी ही ठरलेलीच..! कुणी कामासाठी, कुणी गांवचे प्रश्न घेऊन, कुणी सार्वजनिक विषय घेऊन तर कुणी 'फक्त पहायला' म्हणून गर्दी करतात..अर्थात ही सर्व 'मुंडे' नावांच्या भारदस्त नेतृत्वाची किमया म्हणावी लागेल, जी केवळ पंकजाताई यांनाच लाभली. सत्ता असताना लोकांची गर्दी होणं तसं स्वाभाविक आहे पण कोणतंही पद, अधिकार नसताना जेव्हा लोकं गर्दी करतात आणि हक्कानं आपलं गाऱ्हाणं मांडतात  तेव्हा त्या नेतृत्वाची काम करण्याची पध्दत,  त्याचा स्वभाव, लोकांना आपलसं करण्याची शैली त्यांना मनापासून आवडलेली असते आणि हेच लोकनेता असल्याचं वैशिष्ट्य आहे. हे सर्व गुण पंकजाताईमध्ये आहेत, हे मान्यच करावं लागे

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत विविध सामाजिक उपक्रम

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  परळीत विविध सामाजिक उपक्रम दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, गरजू महिलांना दहा लाखाचे विमा संरक्षण  परळी दि. २४ ----- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा २६ जूलै हा  वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून त्यानिमित्त दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, गरजू महिलांचा दहा लाखाचा विमा, शिलाई मशीन वाटप यासह विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे.    पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. शहर व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आपला वाढदिवस समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा करून साजरा करावा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे, त्यानुसार शहर व ग्रामीण भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, गरजू महिलांना शिलाई मशीन, भारतीय डाक विभागाचा दहा लाखांचा अपघात विमा, दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, रूग्णांना फळ आणि ब्लॅकेट वाटप, प्रभू वैद्यनाथ आणि कपीलधार तीर्थक्षेत्री अभिषेक, दर्ग्या

MB NEWS-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षेत 100% यश

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षेत 100% यश परळी (प्रतिनिधी) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या 2021-22 शैक्षणिक वर्ष इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकता जाहीर झाला असून त्यात दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सर्वोत्तम गुण मिळवले आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर अंगद गुट्टे 94.08%, द्वितीय क्रमांक अभय विक्रम काळे 93.04%, तृतीय क्रमांक अजित कुमार लटपटे 91.04% गुण मिळवले आहे.   येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अजून चांगले यश मिळावे याकरिता सुटीच्या दिवशी सराव परिक्षा व शंका निवारण वर्ग, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पालक शिक्षकांची नियुक्ती, गणित विज्ञान विषयांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती, निवडक पाठांसाठी ॲानलाईन तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतले आहेत.  विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व पालकांचे शाळेच्या विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा

MB NEWS-परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्माजींच्या पुतळ्याचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

इमेज
  परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व पुतळ्याचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते  लोकार्पण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- भाऊड्या कराड परळी (प्रतिनिधी): आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले व परळी शहराचे वैभव वाढविणारे विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यानाचे लोकार्पण व महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 3.30 वा. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.  हे उद्यान निर्माण करण्यासाठी या भागाच्या नगरसेविका सौ. प्राजक्ता श्रीकृष्ण (भावड्या) कराड यांनी आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात व श्री. वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवक नेते भाऊड्या कराड यांनी केले आहे. परळी शहराच्या विद्यानगर भागात उभारण्यात आलेल्या या उद्यानात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 5 पंचाचार्यांचे प्रतीक म्हणून 5 भक्तीस्थाने, ध्यान साधना करण्यासाठी मेडिटेशन परिसर, वाचनालय, दुर्मिळ वृक्ष, यांसह वॉकिंग ट्रॅक आदी साकारण्यात आले असल्याने हे उद्यान

MB NEWS -20 लाख 72 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल: महाजनवाडी येथे चंदनचोरी; पंकज कुमावत मोठी कारवाई

इमेज
20 लाख 72 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त: महाजनवाडी येथे चंदनचोरी; पंकज कुमावत मोठी कारवाई बीड, प्रतिनिधी.... बीड तालुक्यातील महाजनवाडी शिवारात शेतातील चंदनाची झाडे तोडून नंतर त्यातील गाभा काढून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 23 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली . या कारवाईत 499 किलो चंदनाची तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त करून एकूण 10 आरोपी विरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या कारवाईने चंदन चोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .  महाजनवडी ( ता . बीड ) येथील एक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या काही इसमाच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभ विक्री करण्यासाठी घरात  ठेवला आहे , अशी माहिती सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी खातरजमा करत सदरची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळवली . न

MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी परळी  वैजनाथ   ( प्रतिनिधी) लावणयाई  पब्लिक स्कूलमध्ये आज दिनांक 23 जुलै  रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक  कार्यकर्ते  अँड.अरुण  पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून  कृष्णा विर्धे, शाळेचेअध्यक्ष अनंत  कुलकणी,  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  हे उपस्थित  होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील श्लोक पारेगावकर,श्रेयस  हरेगावकर अरोही  पेंटेवार,अणर्व पवार, प्रज्वल घडवे या मुलांनी  लोकमान्य  टिळक यांच्यावर भाषण  केले.अध्यक्षीय  भाषणात अँड. अरुण  पाठक  यांनी टिळकांविषयी  मोलाचे  मार्गदर्शन  केले. यावेळी कृष्णा  विर्धे  यांनी  लोकमान्य टिळकांचे विचारासह स्वराज्य व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले .      सूत्रसंचालन सहशिक्षिका पुजा बिडवे यांनी केले तर  सहशिक्षिका  कविता विर्धे  यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील किशन  हते,  शेख सर, ह

MB NEWS-शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड

इमेज
  शिवाजी पोळ यांची उपनिरीक्षकपदी निवड  परळी - येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नानाभाऊ पोळ यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.     गेल्या एक वर्षापासून परळी येथील ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. ग्रामीण पोलीस स्टेशन येथील सत्कार प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक खोडेवाड साहेब , गणेश यरडवार , सुनील अन्नमवार, रामचंद्र केकान, लक्ष्मण टोले , विनोद कदम, व्यंकट डोलणे, नामदेव चाटे, नवनाथ हरेगावकर , रमेश तोटेवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी नेहा करवंदे, मायादेवी कांबळे , भाग्यश्री डाके, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश

इमेज
  गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश  परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)  गौरव विनोद जगतकर सिबीएससीच्या दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण घेवून शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                गेल्या काही दिवसांपासून सिबीएससी बोर्ड दहावी, बारावी परिक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. समाजमाध्यमाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा घोषित होत होत्या यामुळे विद्यार्थी वर्गात चिंता निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी (ता.२२) सकाळी बारावी व दुपारी दोन वाजता दहावीचा निकाल लागला. येथील राजस्थानी पोद्दार स्कूल चा विद्यार्थी गौरव विनोद जगतकर याने सिबीएससी दहावी बोर्ड परिक्षेत ९५ टक्के गूण प्राप्त करुन शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. मुंडे  यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गौरवचे अभिनंदन केले आहे.