इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकते बीड जिल्ह्यात सर्वप्रथम

 *99.6 टक्के गुण संपादन:  सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकते बीड जिल्ह्यात सर्वप्रथम*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी अनुष्का अनिल देवकते हिने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.99.6 टक्के गुण संपादन करून सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकतेने बीड जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.

     अनुष्का अनिल देवकते  ही परळीच्या भेल सेकंडरी स्कुलची विद्यार्थिनी आहे.बसस्थानक पार्किंग येथे काम करणारे अनिल देवकते यांची मुलगी अनुष्का  हिने आतापर्यंत विविध परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. यापुर्वी शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परिक्षेत तिने यश मिळवलेले आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालात तिने यशोशिखर गाठले आहे.अनुष्का अनिल देवकते हिने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.99.6 टक्के गुण संपादन करून सीबीएसई बोर्ड परीक्षेत परळीची अनुष्का देवकतेने बीड जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट