MB NEWS-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या पंकजाताई मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या  पंकजाताई मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा



उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य अन् सुयशासाठी दिले शुभाशीर्वाद !


मुंबई  ।दिनांक २७।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुयशासाठी शुभाशीर्वाद दिले. पंकजाताईंनी या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांचे मनापासून आभार मानले.


   पंकजाताई मुंडे यांचा काल वाढदिवस होता. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि शेतकरी चिंतित असल्याने त्यांनी वाढदिवस साजरा केला नाही. सेलिब्रेशन करण्यापेक्षा समाजातील गरजूंना सेवेच्या माध्यमातून मदत करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले होते.


    काल देशभरातील प्रमुख नेत्यांनी विविध माध्यमांतून पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत राज्यातील विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !