इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

 शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ 



शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने उत्साहात साजरा

परळी (प्रतिनिधी)

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात शिवसेनेच्या वतीने बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरूवात करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस निमित्त परळी वैजनाथ शहरात विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात शहरातील मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी विधीवत पुजा करून श्रीफळ अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांनतर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे चौक येथे स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन आणि याच परिसरात सोन चाफा व बेल या वृक्षाचे वृक्षारोपण शिवसेना बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे,युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,पत्रकार संतोष जुजगर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका प्रमुख सतिश जगताप याच्या हस्ते करण्यात आले व त्याच बोरोबर उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना मा. शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना छ.शिवाजी चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, बबन ढेंबरे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अमित कचरे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनिष जोशी,रघुनाथ बोले,लक्ष्मण मुंडे,नवनाथ वरवटकर, नरेश मैड,विष्णु रोडे,योगेश घेवारे, प्रकाश देवकर, योगेश जाधव, दयानंद गोरे यांच्या सहशिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या