इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-नागापूर धरणात युवक बुडाला; शोध मोहीम सुरू

 नागापूर धरणात युवक बुडाला; शोध मोहीम सुरू





परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणात पोहायला गेलेल्या एक युवक धरणात बुडाला आहे.
       याबाबत माहिती अशी की परळी शहरातील जुना रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी असलेला युवक शेख तालेब शेख जानी वय 24  हा तरुण  नागापुर वाण धरणात बुडाला असुन शोध मोहीम चालू आहे. काही दिवसापूर्वीच परळीचा मुख्य जलस्त्रोत असलेला नागापूरचा वाहन प्रकल्प तुडुंब भरला असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे त्याचप्रमाणे नागापूर वाहन प्रकल्प सेल्फी पॉईंट बनला आहे धरणात पोहायला जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे असाच हा युवक धरणावर गेला होता धरणात पडून तो बुडाला असून त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
घटनास्थळी परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर ठाण मांडून असून नगरपालिकेचे आपत्कालीन पथक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन शोध मोहिमेत काम करत आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट