MB NEWS-मान्सून शो कला प्रदर्शनात चिञकार प्रा.श्रीकांत दहिवाळ यांच्या चित्रांना पसंती

 मान्सून शो कला प्रदर्शनात चिञकार प्रा.श्रीकांत दहिवाळ यांच्या चित्रांना पसंती



परळी वैजनाथ.....


द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूशनच्या वतीने औरंगाबाद येथील यशवंत कला महाविद्यालयाच्या कलादालनात 'मान्सून शो 2022' हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील 31 अनुदानित कला महाविद्यालयातील 45 प्राचार्य, प्राध्यापकाच्या 104 कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. 30 जुलै 2022 पर्यंत सर्वांसाठी खुल्या राहणाऱ्या या प्रदर्शनात बीडच्या कैलास कला निकेतनच्या, प्राचार्य प्रवीण मुखेकर, प्रा. श्रीकांत पुरी, प्रा. श्रीकांत दहिवाळ या तीन प्राध्यापकांचे पेंटिंग समाविष्ट करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य सेनानी,सुप्रसिद्ध चिञकार कै. दताञय दहिवाळ गुरुजीचे चिञकार प्रा.श्रीकांत दहिवाळ हे चिरंजीव आहेत.वडिलांकडुन घेतलेला चिञकलेचा वारसा पुढे घेऊन अनेक चिञ प्रदर्शनात त्यांनी आपली चिञकलेच प्रदर्शन करुन प्रा.श्रीकांत दहिवाळ हे दहिवाळ परिवाराचे व परळीच नावलौकिक करत आहेत.चिञकले बरोबर गायन कला ही त्यांनी जोपासली असुन अतिषय उत्तम बासरी,शिळवादनातुन आपली कला सादर करतात. परळीकर असलेल्या चिञकार श्रीकांत दहिवाळ हे बीड येथील कला निकेतन येथे प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहे.

दरम्यान औरंगाबाद येथील, यशवंत कला महाविद्यालयातील मान्सून शो चित्र प्रदर्शनासाठी प्राध्यापक श्रीकांत दहिवाळ यांच्या चित्राची निवड करण्यात आली.यापुर्वी लंडन, अमेरिका, भूतान, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई नंतर आता औरंगाबाद येथील चिञ प्रदर्शनात यांच्या  प्रा.दहिवाळ यांच्या चिञांना मोठी पसंदी मिळत आहे......

 दुरुस्ती बातमी

 आपल्या लोकप्रिय अंकात प्रकाशित करण्यात यावी ही विनंती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !