MB NEWS-परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्माजींच्या पुतळ्याचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार लोकार्पण

 परळीतील विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यान व पुतळ्याचे आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते  लोकार्पण


कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- भाऊड्या कराड


परळी (प्रतिनिधी): आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन साकारलेले व परळी शहराचे वैभव वाढविणारे विद्यानगर भागातील महात्मा बसवेश्वर उद्यानाचे लोकार्पण व महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण आज दि. 24 जुलै रोजी दुपारी 3.30 वा. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.  हे उद्यान निर्माण करण्यासाठी या भागाच्या नगरसेविका सौ. प्राजक्ता श्रीकृष्ण (भावड्या) कराड यांनी आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात व श्री. वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवक नेते भाऊड्या कराड यांनी केले आहे.
परळी शहराच्या विद्यानगर भागात उभारण्यात आलेल्या या उद्यानात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 5 पंचाचार्यांचे प्रतीक म्हणून 5 भक्तीस्थाने, ध्यान साधना करण्यासाठी मेडिटेशन परिसर, वाचनालय, दुर्मिळ वृक्ष, यांसह वॉकिंग ट्रॅक आदी साकारण्यात आले असल्याने हे उद्यान नागरिकांसाठी बहुउयोयोगी ठरणार आहे.
रविवारी दु. 3.30 वा. धनंजय मुंडे यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण व येथे उभारण्यात येत असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या परळी शहरातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमास प्रसन्नरेणूक डॉ.वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत तसेच ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, ष.ब्र. शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबेजोगाई, ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगाव, डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, मन्मथधाम, ष.ब्र. काशिनाथ शिवाचार्य महाराज,पाथरी, ष.ब्र. चनबसव शिवाचार्य महाराज, बर्दापुर आदी संतांच्या शुभाशीर्वादामध्ये तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा बसवेश्वर उद्यान लोकार्पण आणि पुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीकृष्ण (भावड्या) कराड यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?