MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत रक्तदान,कोविड बूस्टर डोस व मोफत दंतचिकित्सा शिबीर

 पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत  रक्तदान,कोविड बूस्टर डोस व मोफत  दंतचिकित्सा शिबीर



जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा- प्रा पवन मुंडे


परळी प्रतिनिधी : मा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी 10:30 वाजता भव्य रक्तदान शिबीर व नागरिकांना कोविड बूस्टर डोस देण्याबरोबरच  मोफत भव्य दंतचिकित्सा शिबिर होणार असून या मध्ये परळीतील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ शुभम  ईश्वरप्रसाद लाहोटी व डॉ मीरा शुभम लाहोटी हे उपस्थितीत राहणार असून शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.

      या शिबिरा मध्ये रुग्णांच्या दाता संबंधित अनेक समस्यांच्या मोफत x ray द्वारा तपासणी करण्यात येणार असून, रुग्णांच्या दातांमध्ये सीमेंट-चांदी भरणे, रूट कॅनल करणे, दातांवर कॅंप लावणे,दात स्वच्छ करणे,दातांच्या हिरड्या विषयक समस्यांवर विलाज, डेंटल इंप्लॅन्ट करणे आदी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून , परळी शहरातील व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सतिश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया व नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार