इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा एससी तर १८ जागा ओबीसींना राखीव

 बीड जिल्हा परिषदेतील ६९ पैकी ९ जागा एससी तर १८ जागा ओबीसींना राखीव











बीड : बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव आहेत. लोकसंख्येच्या क्रमानुसार त्या आरक्षीत करण्यात आल्या. त्यानुसार उमापुर, मोगरा, किट्टी आडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत.
      बीड जिल्ह्यातील ६९ जिल्हापरिषद गटांपैकी १८ गट ओबीसींना राखीव ठेवण्यात आले आहेत. यात रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे.

---------
*बीड जिल्हा परिषद गटांचे संपूर्ण आरक्षण*

बीड : बीड जिल्हा परिषदेच्या ६९ जागांसाठिची आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एससी ८, एसटी १, ओबीसी १८ तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या २१ जागा आरक्षीत करण्यात आल्या आहेत. 

*गटांसाठीचे आरक्षण खालीलप्रमाणे 

● *एससी -* 
उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगलवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर, किट्टीआडगाव हे पाच गट एससी महिलांसाठी राखीव झाले. 

● *एसटी -* जिरेवाडी

● *ओबीसी -*
रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरीया गटांचा समावेश आहे. यापैकी रेवकी, बीड सांगवी, तलवाडा, मातोरी, डोंगरकिन्ही, नाळवंडी, पाडळसिंगी, पिंप्री, जोगाईवाडी हे ९ गट ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत.

● *सर्वसाधारण महिला -*
ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, टाकरवण, धोंडराई, पाली, दाऊतपुर, घाटनांदूर, वीडा, राजुरी, बहिरवाडी, नागापूर या गटांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट