MB NEWS-✍️• प्रदीप कुलकर्णी यांचा अभिष्टचिंतन लेख >>>>गर्दीतील लोकनेत्या.........!

 गर्दीतील लोकनेत्या.........!

                    ✍️• प्रदीप कुलकर्णी •

-------------------------------------------------------



लोकनेत्याचा वारसा जपणं आणि तो यशस्वीपणे पुढे चालवणं हे म्हणावं तितकं सोप नाही. मुंडे साहेब आणि गर्दी हे जसं समीकरण होतं तसचं समीकरण पंकजाताई यांच्याबाबतीतही आहे पक्षाचं राष्ट्रीय सचिवपद सोडलं तर त्यांच्याकडे घटनात्मक असं कोणतही पद नसलं तरी त्या आजही जिथं जातील तिथं लोकांची गर्दी ही ठरलेलीच..! कुणी कामासाठी, कुणी गांवचे प्रश्न घेऊन, कुणी सार्वजनिक विषय घेऊन तर कुणी 'फक्त पहायला' म्हणून गर्दी करतात..अर्थात ही सर्व 'मुंडे' नावांच्या भारदस्त नेतृत्वाची किमया म्हणावी लागेल, जी केवळ पंकजाताई यांनाच लाभली. सत्ता असताना लोकांची गर्दी होणं तसं स्वाभाविक आहे पण कोणतंही पद, अधिकार नसताना जेव्हा लोकं गर्दी करतात आणि हक्कानं आपलं गाऱ्हाणं मांडतात  तेव्हा त्या नेतृत्वाची काम करण्याची पध्दत,  त्याचा स्वभाव, लोकांना आपलसं करण्याची शैली त्यांना मनापासून आवडलेली असते आणि हेच लोकनेता असल्याचं वैशिष्ट्य आहे. हे सर्व गुण पंकजाताईमध्ये आहेत, हे मान्यच करावं लागेल. 



आठ वर्षापूर्वी मुंडे साहेबांच्या अकाली निधनानं सर्व कार्यकर्ते सैरभैर झाले होते. तळागाळातील लोकांना खूप धक्का बसला होता. अजूनही अनेक जण त्यातून सावरलेले नाहीत. क्षणोक्षणी त्यांची आठवण काढतात.  राजकीय क्षेत्रात तर त्यांच्या नांवाची आजही सातत्याने चर्चा होते, कारण त्यांच्या नेतृत्वाची किमयाचं तशी होती. लोकांना हाताळण्याची त्यांची एक वेगळी हातोटी होती. गर्दीचं वलय सतत त्यांचेभोवती होते. अगदी तेच वलय  पंकजाताईंच्या भोवती देखील असते हे मी सतत अनुभवतो आहे. लोकं त्यांच्यातच मुंडे साहेबांना पाहतात. हा गर्दीचा वारसा, लोकांना हाताळण्याची शैली त्यांनी तितक्याच समर्थपणे जपली आहे.. भगवानगडावरील दसरा मेळाव्याची गर्दी सर्वांनीच अनुभवली होती पण त्यानंतर मेळाव्याचे   ठिकाण अचानकपणे बदलूनही  सावरगांव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीत त्यांच्या एका हाकेवर भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याला आलेला अलोट जनसागर पाहून उभ्या महाराष्ट्राने तोंडात बोटं घातली. २०१४ साली काढलेली संघर्षयात्रा, त्यातील गाजलेल्या जाहीर सभा आणि त्यात उसळलेला अलोट जनसागर ही त्यांचेवरील निस्सिम प्रेमाची साक्ष आहे. केवळ ठरवून केलेले कार्यक्रमच नाही तर अचानकपणे घेतलेल्या बैठकांनाही तसेच दौरा करताना रस्त्यात वाहने थांबवून स्वागतासाठी येणारी ही गर्दी  असते. जाहीर सभा, मेळावे यासाठी इतर राजकीय नेत्यांसारखी भाडोत्री गर्दी इथे जमवावी लागत नाही. लोकं स्वतःहून आपल्या नेत्यांचा उत्साह आणि ताकद वाढविण्यासाठी येतात, हे तितकेच खरे ! महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय घराण्याला  अजूनपर्यंत तरी हे जमले नाही. पंकजाताईंच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद व होणारी गर्दी केवळ संख्यात्मक नसते तर मतांत परिवर्तीत होणारी असते हे मागील विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलेले आहे. या सभांनी भाजपच्या अनेक आमदारांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली म्हणूनच भाजपला राज्यात सत्ता मिळाली होती हे विसरून चालणार नाही.  राज्यात नुकतीच भाजपची सत्ता आलेली आहे. सत्तेत ताईंना मंत्रीपद मिळावे अशी कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे. त्यांच्या मागे असणारा मोठा लोकसंग्रह त्यांच्या सत्तेतील सहभागाची वाट पहात आहे. कारण   ते त्या पदाच्या योग्यतेच्या आहेत. जे खरं आहे, जे योग्य आहे ते मिळालचं पाहिजे अर्थात यासाठी त्यांनी  कधी लाॅबिंग केली नाही,  हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.  ताईसाहेबांकडे येणारा लोकांचा ओढा आजही तसूभर कमी झालेला नाही उलट तो वाढतच आहे. जन सामान्यांचे हेच प्रेम आणि ही गर्दी त्यांची शक्ती आहे. ही शक्ती, ही ताकद कुणीही कितीही मनसुबे रचून कमी करण्याचा प्रयत्न केला तरी कमी होणार नाही. वंचित, पिडित घटकांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत प्रेमाची ही नाळ घट्ट जोडलेली आहे. सतत गर्दीत रमणाऱ्या या लोकनेत्यांवरील सामान्य माणसाचे  हे प्रेम, ही शक्ती  दिवसेंदिवस वाढत  राहील यात तीळमात्र शंका नाही. 

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार