इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्रदान

 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार प्रदान



 महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट तर डॉ. प्रा.एल. एस. मुंडे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी


परळी वैजनाथ ता.२७ (प्रतिनिधी)

       डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या २०१७-१८ यावर्षीचा विद्यापीठ स्तरावरील पुरस्कारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची निवड झाली आहे तर याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा.एल.एस. मुंडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याचे मंगळवारी (ता.२६) विद्यापीठातील एका समारंभात कुलगुरूंच्या हस्ते वितरण करण्यात आले.

          राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत २०१७-१८  मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देण्यात येतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागास व कार्यक्रमाधिकाऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. गेल्या दोन वर्षात कोविडचा प्रादुर्भाव असल्याने समारंभास बंदी असल्याने याचे वितरण झाले नव्हते. सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक व सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांची यादी विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. यामध्ये या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे.  तर उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कारासाठी सुद्धा याच महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.प्रा.एल.एस. मुंडे यांची निवड २०१७-१८ साठी करण्यात आली होती. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व शैक्षणिक वर्षे सुरळीत चालू झाल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मंगळवारी एका समारंभाचे आयोजन विद्यापिठातील नाट्यगृहाच्या सभागृहात केले होते. यासाठी प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख व प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे यांचा कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आले. याच महाविद्यालयास २०१८-१८ साठी राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट महाविद्यालय व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्कारांसाठी संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख संचालक, छाया देशमुख, प्रा.डॉ. विद्या देशमुख या संचालकासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!