MB NEWS -20 लाख 72 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल: महाजनवाडी येथे चंदनचोरी; पंकज कुमावत मोठी कारवाई

20 लाख 72 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त: महाजनवाडी येथे चंदनचोरी; पंकज कुमावत मोठी कारवाई

बीड, प्रतिनिधी....

बीड तालुक्यातील महाजनवाडी शिवारात शेतातील चंदनाची झाडे तोडून नंतर त्यातील गाभा काढून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 23 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली . या कारवाईत 499 किलो चंदनाची तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त करून एकूण 10 आरोपी विरुद्ध नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . या कारवाईने चंदन चोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .


 महाजनवडी ( ता . बीड ) येथील एक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या काही इसमाच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभ विक्री करण्यासाठी घरात  ठेवला आहे , अशी माहिती सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी खातरजमा करत सदरची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कळवली . नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत व त्याच्या पथकातील पोलीस पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदरील ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा मारला . या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा एक इसम जागीच मिळून आला . त्यास ताब्यात घेऊन नाव गाव विचारले असता एक अशोक रामहारी घरत ( रा . महाजनवाडी ) असे सांगितले . त्याच्या घराची झडती घेतली असता घरात 499 किलो चंदनाची तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला . या कारवाईत एकूण 10 आरोपी विरुद्ध ठाण्यात बालाजी शेषेराव दराडेयांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर , बीड अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक शपंकज कुमावत , पोलिस कर्मचारी बाबासाहेब बांगर , बालाजी दराडे , अमजद सय्यद , राजू वंजारे , रामहरी भांडाने , संजय टूले , शिवाजी कागदे दीपक जावळे मपोना आशा चोरे यांनी केली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?