MB NEWS-चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात एकाला अटक

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात एकाला अटक 



बीड- इंटरनेट कॅफे च्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी करणाऱ्या बीड येथील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी चे चार ते पाच गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली होती.

शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यात चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास करताना सायबर शाखेने संत नामदेव नगर भागात इंटरनेट कॅफे चालवणाऱ्या गोविंद बापूराव क्षीरसागर या व्यक्तीस अटक केली आहे.या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफी चे चार ते पाच गुन्हे दाखल झाले होते.लहान मुलांचे व्हिडीओ इंटरनेट वर टाकून त्यांच्या पालकांची अन बालकांची बदनामी करण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली होती. गेल्या महिनाभरापासून पोलीस या प्रकरणात आरोपीचा शोध घेत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!