MB NEWS-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षेत 100% यश

 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या 10वी परीक्षेत 100% यश



परळी (प्रतिनिधी) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या 2021-22 शैक्षणिक वर्ष इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकता जाहीर झाला असून त्यात दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत सर्वोत्तम गुण मिळवले आहेत.


इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर अंगद गुट्टे 94.08%, द्वितीय क्रमांक अभय विक्रम काळे 93.04%, तृतीय क्रमांक अजित कुमार लटपटे 91.04% गुण मिळवले आहे.

  येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अजून चांगले यश मिळावे याकरिता सुटीच्या दिवशी सराव परिक्षा व शंका निवारण वर्ग, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पालक शिक्षकांची नियुक्ती, गणित विज्ञान विषयांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती, निवडक पाठांसाठी ॲानलाईन तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतले आहेत. 

विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे व पालकांचे शाळेच्या विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ उषा किरण गित्ते यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री विठ्ठल तुपे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?