इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत विविध सामाजिक उपक्रम

 पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  परळीत विविध सामाजिक उपक्रम







दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, गरजू महिलांना दहा लाखाचे विमा संरक्षण 


परळी दि. २४ ----- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा २६ जूलै हा  वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून त्यानिमित्त दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, गरजू महिलांचा दहा लाखाचा विमा, शिलाई मशीन वाटप यासह विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे.


   पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज पार पडली. शहर व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आपला वाढदिवस समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा करून साजरा करावा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे, त्यानुसार शहर व ग्रामीण भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, गरजू महिलांना शिलाई मशीन, भारतीय डाक विभागाचा दहा लाखांचा अपघात विमा, दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, रूग्णांना फळ आणि ब्लॅकेट वाटप, प्रभू वैद्यनाथ आणि कपीलधार तीर्थक्षेत्री अभिषेक, दर्ग्यास चादर आदी उपक्रम यावेळी राबविण्यात येणार आहेत.  जिल्हाभरात देखील अशाच सामाजिक उपक्रमांनी पंकजाताईंचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या