MB NEWS-विद्युत तारेचा कंरट लागला;शेतकऱ्याचा मृत्यू

 विद्युत तारेचा कंरट लागला; एका शेतकऱ्याचा मृत्यू 


गेवराई, प्रतिनिधी...

रानडुकरापासून संरक्षण मिळावे यासाठी ऊसाला तार कुंपण लावून त्यात सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे घडली. यात एका शेळीचाही शोक लागुण मृत्यू झाला.

नंदु उद्धव थोपटे (वय ४०, रा. अर्धमसला, ता.गेवराई) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी आपल्या शेतात काम करून सायंकाळच्या सुमारास घरी निघाले असताना सोबत असलेली शेळी ऊसात गेली असता तीला पाहण्यासाठी सदरील शेतकरी ऊसात गेला. त्याचवेळी रानडुकरापासून संरक्षण मिळावे यासाठी लावलेल्या तारेत सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. यात शेळीचाही शॉक लागून मृत्यू झाला. मंगळवार रोजी रात्री शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे अर्धमसला परिसरात हळहळ व्यक्त होत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !