MB NEWS-गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश

 गौरव जगतकरचे सिबीएससीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश 

परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी)

 गौरव विनोद जगतकर सिबीएससीच्या दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण घेवून शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

               गेल्या काही दिवसांपासून सिबीएससी बोर्ड दहावी, बारावी परिक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. समाजमाध्यमाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखा घोषित होत होत्या यामुळे विद्यार्थी वर्गात चिंता निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी (ता.२२) सकाळी बारावी व दुपारी दोन वाजता दहावीचा निकाल लागला. येथील राजस्थानी पोद्दार स्कूल चा विद्यार्थी गौरव विनोद जगतकर याने सिबीएससी दहावी बोर्ड परिक्षेत ९५ टक्के गूण प्राप्त करुन शाळेतून तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. मुंडे  यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गौरवचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !