MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक उपक्रम:उमाताई समशेट्टे यांच्या वतीने 51 महिलांची कपिलधार वारी

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक उपक्रम:उमाताई समशेट्टे यांच्या वतीने  51 महिलांची कपिलधार वारी 

 परळी वैजनाथ...

     भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळी शहरातील विविध भागांतील ५१ महिलांना श्री क्षेत्र कपिलधार येथे दर्शन व अभिषेकाची सोय नगर परिषद सदस्या सौ उमाताई समशेट्टे यांच्या तर्फे करण्यात आली. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

२६ जुलै, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस राज्यभरासह परळीतील कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, लोकोपयोगी उपक्रम राबवत उत्साहात साजरा केला. आपला वाढदिवस समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा करून साजरा करावा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, गरजू महिलांना शिलाई मशीन, भारतीय डाक विभागाचा दहा लाखांचा अपघात विमा, दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, रूग्णांना फळ आणि ब्लॅकेट वाटप, प्रभू वैद्यनाथ अभिषेक, दर्ग्यास चादर आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.  याचाच एक भाग म्हणून रोजच्याच आपल्या घर कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना एक दिवस सुंदर निसर्गाच्या सानिध्यात व धार्मिक दृष्ट्या पवित्र असलेल्या बीड जवळील श्री क्षेत्र कपिलधार येथे अभिषेक व दर्शनाचा योग लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी नगर परिषदेच्या नगरसेविका सौ उमाताई समशेट्टे यांनी घडवून आणला. यावेळी  दर्शन अभिषेकासाठी जाणाऱ्या वाहनांना रवाना करते वेळी  जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरुजी, भाजपा प्रदेश सचिव राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलसेठ लोहिया, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोदसेठ सामत, विकासराव डुबे, जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक श्रीराम मुंडे विजयसेठ वाकेकर, संदीप लाहोटी,  माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, प्रकाश जोशी, विठ्ठल आप्पा चौधरी, अब्दुल करीम, राजेंद्र ओझा, उमेश खाडे, अश्विन मोगरकर, मोहनसेठ जोशी, प्रितेश तोतला, अनिष अग्रवाल, पवन तोडकरी, विजय बुंदिले, सुभाष सावंत जितेंद्र मस्के आदी उपस्थित होते. 

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्य व उज्वल राजकीय प्रवासासाठी श्री क्षेत्र कपिलधार येथे विविध ५ वाहनांतून सुखकर प्रवास व दर्शन घडवून आणल्याबद्दल महिलांनी नगरसेविका सौ उमाताई समशेट्टे यांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार