MB NEWS-लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी

 लावण्याई पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी



परळी  वैजनाथ   ( प्रतिनिधी)

लावणयाई  पब्लिक स्कूलमध्ये आज दिनांक 23 जुलै  रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक  कार्यकर्ते  अँड.अरुण  पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून  कृष्णा विर्धे, शाळेचेअध्यक्ष अनंत  कुलकणी,  मुख्याध्यापक  अस्मिता  गोरे  हे उपस्थित  होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील श्लोक पारेगावकर,श्रेयस  हरेगावकर अरोही  पेंटेवार,अणर्व पवार, प्रज्वल घडवे या मुलांनी  लोकमान्य  टिळक यांच्यावर भाषण  केले.अध्यक्षीय  भाषणात अँड. अरुण  पाठक  यांनी टिळकांविषयी  मोलाचे  मार्गदर्शन  केले. यावेळी कृष्णा  विर्धे  यांनी  लोकमान्य टिळकांचे विचारासह स्वराज्य व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाद्वारे पटवून दिले . 

  


 सूत्रसंचालन सहशिक्षिका पुजा बिडवे यांनी केले तर  सहशिक्षिका  कविता विर्धे  यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील किशन  हते,  शेख सर, हर्षदा  परदेशी, वैष्णवी  स्वामी,  पदमा  चांडक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !