इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-रंभापुरी महापिठाकडून डॉक्टर सुरेश चौधरी यांना "शिवाद्वैत भास्कर " उपाधी; स्वातंत्र्यसैनिक कुटुंबांचाही सन्मान

 रंभापुरी महापिठाकडून डॉक्टर सुरेश चौधरी यांना "शिवाद्वैत भास्कर" उपाधी; स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांचाही सन्मान




परळी ,. श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू, कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी  यांच्या हस्ते  25 जुलै 2022 रोजी आषाढमास तपोअनुष्ठान सांगता कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवाराचे जगद्गुरू महास्वामीजींच्या हस्ते "अमृत रत्न "  प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच  अनुष्ठान समितीचे प्रमुख डॉ सुरेश चौधरी, "शिवाद्वैत भास्कर " ही पदवी देऊन गौरविण्यात आले,                            डॉ सुरेश चौधरी यांचा वेद,वेदांत,भगवद्गीता, उपनिषद, योगशास्त्र, सिद्धांत शिखामणी, आध्यात्म यांचा सखोल अभ्यास व प्रकांड पांडित्य असल्याचा उल्लेख करून  रंभापुरी पिठाकडून जगद्गुरुंनी  शिवाद्वैत भास्कर ही पदवी देऊन सन्मानित केले.      येथील आषाढ मास अनुष्ठान व जगद्गुरु यांची अड्ड पालखी सोहळा न भूतो न भविष्यती व सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी ऐतिहासिक घटना आहे असे रंभापुरी जगतगुरुंनी त्यांच्या आशीर्वचनांमध्ये उल्लेख केला . रंभापुरी जगद्गुरु यांचे प्रथमच परळी शहरात आगमन होत असल्यामुळे त्यांच्या सेवेत डॉक्टर सुरेश चौधरी यांनी नवीन पालखी अर्पण केली.                         स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवाराचे जगद्गुरू महास्वामीजींच्या हस्ते "अमृत रत्न " ही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.श्रीमद् रंभापुरी जगद्गुरु वीर गंगाधर कला व वाणिज्य महाविद्यालय शिग्गाव च्या वतीने पंचात्तर व स्वातंत्र्य अमृतरत्न पुरस्कार  स्व,गुरुलिंगअप्पा धोंडीअप्पा मेनकुदळे ,
गणपतअप्पा संभाप्पा इटके,सिद्धलिंग नरहरी स्वामी,गंगाधर आप्पा बुरांडे,गुंडप्पा जीरगे,सोमनाथ अप्पा महाजन,विश्वनाथ स्वामी येलंबकर यांना अमृत रत्न पुरस्कार देण्यात आला,त्यांच्या परिवारास सन्मानित करण्यात आले यावेळी श्री गुरु डॉ.विरूपाक्ष  शिवाचार्य श्रीक्षेत्रमन्मथधाम ,श्री गुरु पर्वतेश्वर शिवाचार्य स्वामीजी बेलगूंपा कलबुर्गी.
श्री गुरु अभिनव शांतलिंग शिवाचार्य स्वामीजी अंम्मीनभावी ,कर्नाटक.. श्री गुरु शंभूलिंग शिवाचार्य स्वामीजी, अंबेजोगाई, श्री गुरु काशिनाथ शिवाचार्य स्वामीजी,पाथरी,श्री गुरु गुरुसिद्ध मनीकंठ शिवाचार्य स्वामीजी.बार्शि.श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी,सोनपेठ.,श्री गुरु चन्नबसव शिवाचार्य  स्वामीजी, बर्दापूर.श्री गुरु विरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी.मानूर,श्री गुरू म.नि.प्र .सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी, देवनी.श्री गुरू विरुपाक्ष शिवाचार्य मुखेड उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट