इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-क्रुुरपणे बेकायदेशीर गर्भपात करणार्‍या तथाकथित डॉक्टरला अटक

क्रुुरपणे बेकायदेशीर गर्भपात करणार्‍या तथाकथित डॉक्टरला अटक



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
     अतिशय घृणास्पद व क्रुुरपणे गर्भपात करून देणाऱ्या तथाकथित डॉक्टरला परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

        परळी येथील शिवाजीनगरमधील एका विवाहितेचे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करून  गर्भपात केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी बार्शी येथील तथाकथित डॉक्टरला मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींच्या शोधासाठी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी तीन पथके नियुक्त केलेली आहेत. मुलगी नको, असे म्हणून तथाकथित डॉक्टरला हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. त्यानंतर तथाकथित डॉक्टरने  गर्भ अक्षरश:ओढून बाहेर काढला व गर्भपात करुन दिला. या प्रकरणी संभाजीनगर  पोलिसांनी तथाकथित डॉक्टर नंदकुमार स्वामी यास बार्शी येथून अटक केली.पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, पोलीस सचिन सानप व  गोपीनाथ डाके यांनी आरोपीला ताब्यात घेतले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट