पोस्ट्स

पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

गोळीबार:बँक कॉलनी परिसरातील थरार :एक ठार: एक जण जखमी

इमेज
  गोळीबार:बँक कॉलनी परिसरात थरार: एक ठार;एक जण जखमी  परळी : परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले तर ग्यानबा गीते जखमी झाले आहेत. जखमी असलेल्या गीते यांना परळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचली असून आता हा गोळीबार कोणी केला आणि कोणत्या कारणावरून केला याचा शोध घेतला जात आहे. 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 73 वा वर्धापन दिन भेल संस्कार केंद्रात मोठ्या हर्षोल्लसात

इमेज
  भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 73 वा वर्धापन दिन भेल संस्कार केंद्रात मोठ्या हर्षोल्लसात   परळी वैजनाथ (प्रतिनिधी):              येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या भेल संस्कार केंद्रात संस्थेचा 73 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. 28 जून ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा उमटवणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा 73 वा वर्धापन दिन आहे. ध्येयनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रींचा अवलंब करीत ही संस्था अविरतपणे आपली वाटचाल करत आहे. अशा या संस्थेत विद्यार्थ्यांना भारतीयत्वाचे शिक्षण देऊन माणूस घडवणाऱ्या या शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणजेच आजचा हा भेल संस्कार केंद्रातील कार्यक्रम होय. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय मा. श्री. जीवनराव गडगूळ यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री.राडकर सर आणि श्री. यशवंत कांबळे सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. श्

महापारेषण चे अधिक्षक अभियंता मिलिंद बनसोडे सेवानिवृत्त

इमेज
  महापारेषण चे अधिक्षक अभियंता मिलिंद बनसोडे सेवानिवृत्त परळीत काम करताना आनंद व समाधान वाटले: व्यक्त केली कृतज्ञ भावना परळी :महापारेषण कंपनीच्या येथील अतिउच्च दाब सं व सू मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे हे सेवानिवृत्त झाले त्याबद्दल 28 जून रोजी येथील कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी नगर परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी, महापारेषण (संचलन )चे माजी संचालक यु.जी .झाल्टे महापारेषण (संचलन ) चे माजी कार्यकारी संचालक रोहिदास मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलिंद बनसोडे यांचा महापारेषण परळीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .यावेळी मिलिंद बनसोडे यांनी आधिक्षक अभियंता म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याचा यावेळी आढावा चीत्रफित द्वारे सादर करण्यात आला .यावेळी मिलिंद बनसोडे म्हणाले की, परळीत येण्यापूर्वी  भीती चे वातावरण असल्याचे सांगण्यात आले होते पण तसे काही नव्हते उलट छान वातावरण पहायावस  मिळाले .परळी येथे अभियंता पदाची सेवा अत्यंत आनंदात आणि खेळी मेळी च्या वातावरणात करता आली .येथील अधिकारी कर

पूर्वेकडील प्रवेशद्वार, पायऱ्या यांसह प्रदक्षिणा मार्गाचे काम गतीने सुरू

इमेज
 श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुरू असलेल्या विकास कामांची धनंजय मुंडेंकडून पाहणी पूर्वेकडील प्रवेशद्वार, पायऱ्या यांसह प्रदक्षिणा मार्गाचे काम गतीने सुरू परळी वैद्यनाथ (दि.29) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनाकडून 286 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची आज मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.  मंदिराच्या पूर्वेस असलेल्या मुख्य प्रवेशद्वार, स्वागत कमान, मेघडंबरी, तसेच मंदिराकडे जाणाऱ्या चिरेबंदी दगडातील पायऱ्यांचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामांची पाहणी करून धनंजय मुंडे यांनी अधिकारी व कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना दिल्या. चिरेबंदी दगड बसवताना ते एका रेषेत असावेत तसेच खालीवर होऊ नये त्यावर खड्डे पडणार नाही यासाठी योग्य दगडाची निवड करून त्यांचे रचना उत्तमरीत्या करावी अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या. प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या भोवती मेरू पर्वताकडून जाणाऱ्या मंदिर प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असून त्यावर आता नाली व काँक

बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

इमेज
  बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी बीड : पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सचिव संजय मोरे यांनी ही शनिवारी कारवाई केली.  कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथीत ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यांनी यात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पहिल्यांदा धोका दिल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार यांना ३७६ बुथवर यंत्रणा पुरवून पैसे वाटल्याचे म्हटले होते. तसेच धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याबाबतही वक्तव्य केले होते.  हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर खांडे व बांगरविरोधात परळी व बीडमध्ये गुन्हे दाखल झाले होते. याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

रामचंद्र इंगळे यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान - राजकिशोर मोदी

इमेज
  रामचंद्र इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार समाजोपयोगी कार्य करण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारा -प्राचार्य डॉ.दादाहरी कांबळे रामचंद्र इंगळे यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान  - राजकिशोर मोदी                                                                                                              अंबाजोगाई, प्रतिनिधी:-रामचंद्रजी इंगळे यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान  असल्याचे प्रतिपादन अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी यांनी केले. ते मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. छत्रपतीशिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी पुरोगामी विचारधारा अंगीकारून मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान,अंबाजोगाई जि.बीड ही संस्था कार्यरत आहे.आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठ आधारस्तंभ स्मृतिशेष रामचंद्र इंगळे (अप्पा )यांनी कर्तृत्त्वसंपन्न जिल्हा परिषद सदस्य (बीड ) म्हणून राजकीय –सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. स्मृतिशेष रामचंद्र इंगळे (अप्पा ) यांच्या  वैचारिक भूमिकेची शिदोरी घेऊन कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थेची दखल घेऊन त्यांन

भाशिप्र संस्थेने सुसंस्कारित व राष्ट्राभिमानी विद्यार्थी घडविले - विष्णुपंत कुलकर्णी

इमेज
भाशिप्र संस्थेने सुसंस्कारित व राष्ट्राभिमानी विद्यार्थी घडविले - विष्णुपंत कुलकर्णी नांदेड. दिनांक 28 जून प्रतिनिधी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुसंस्कारित व राष्ट्राभिमानी , जबाबदार नागरिक घडविण्याचे अव्याहतपणे काम केले आहे. शिक्षणातील भारतीयत्व घडवीत असताना समाजाची मूल्याधिष्ठित जडणघडण करण्याचेही काम संस्थेने मराठवाड्यात केले आहे.आज मितीस संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. संस्थेला या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा कै. नाना पालकर शैक्षणिक संकुलाचे पालक विष्णुपंत कुलकर्णी यांनी नांदेड येथे काढले.  भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचालित कै नाना पालकर प्रा विद्यालयात संस्थेचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ अर्जुन मापारे होते.   कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्था ध्वजाचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या ब्रीदवाक्याचे गायन , स

जातीभेद निर्मूलनाचे काम छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केले- संपादक मोहन व्हावळे

इमेज
  जातीभेद निर्मूलनाचे काम छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केले- संपादक मोहन व्हावळे परळी (प्रतिनिधी):- छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जातिभेद निर्मूलनाच्या कामासोबत सर्व समाजांना समान न्याय देण्याचे काम केले असे प्रतिपादन संपादक मोहन व्हावळे यांनी  केले. लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित जयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ संपादक रानबा गायकवाड, फुले शाहू आंबेडकरी अभ्यास समूहाचे इंजि. भगवान साकसमुद्रे, धनंजय आढाव, संपादक मोहन व्हावळे, प्रकाश चव्हाण, संजीव रॉय, विकास वाघमारे आदींची उपस्थिती होती.     या कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका नेहमीच घेतली. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम केले. असे काम होता ना आज पाहायला मिळत नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेवर काम करणारे आजचे राजकीय पुढारी फार कमी संख्येने दिसून

वैद्यनाथ सिटीकेबलचे संचालक उद्धव गित्ते यांचे निधन

इमेज
  वैद्यनाथ सिटीकेबलचे संचालक उद्धव गित्ते यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        वैद्यनाथ सिटीकेबलचे संचालक उद्धव गित्ते यांचे आज दि.२८ रोजी  निधन झाले. मृत्यूसमयी ते ५२ वर्षे वयाचे होते.       परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व असलेले केबल नेटवर्कचे परळी शहरात जाळे निर्माण करणारे उद्धव प्रल्हाद गित्ते काही दिवसांपासून आजारी होते.यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.२९ रोजी सकाळी ९ वा. परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैद्यनाथ सिटीकेबल, संभाजीनगर (स्वातीनगर) भागातील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

इमेज
  अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला            बीड,दि. 28 (जिमाका) अविनाश पाठक यांनी आज बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मूधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला. बुधवारी दिनांक 26 जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश काढले होते. त्या आदेशाप्रमाणे आज दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री पाठक यांच्याकडे आज सोपविला. तत्पूर्वी श्री. पाठक यांनी सकाळी आपल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार संगीता देवी पाटील यांना सोपविला.              याप्रसंगी  परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, कविता जाधव, महेंद्र कुमार कांबळे यासह वेगवेगळे विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या मागणीला यश ; मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'लाडकी बहिण' योजना सरकारने केली लागू योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद मुंबई।दिनांक २८। मध्यप्रदेशात प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘लाडली बहना' योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण' योजना राबवण्याची मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली होती. त्या अनुषंगाने आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केली असून याकरिता आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.    उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य नागरिकांच्या हिताच्या हा अर्थसंकल्प होता. दरम्यान, पंकजाताई मुंडे भाजपच्या मध्यप्रदेशात सह प्रभारी असल्याने या राज्यात महिलांसाठी लोकप्रिय ठरलेली 'लाडली बहना' योजना आपल्या महाराष्ट्रात देखील लागू करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे वारंवार केली होती, त्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने आजच्या

सोमवारी लोकशाही दिन

इमेज
  सोमवारी लोकशाही दिन           बीड, दि. 28 (जि. मा. का.)  जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 1 जुलै, 2024 रोजी सकाळी 10-00 ते दुपारी 12-00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.            लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.       लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्

मुख्यमंत्री कृषी वीज बिल सवलत योजनेसह शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा

इमेज
  पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्वांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे *2023-24 मधील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजारांची मदत - अजितदादांची घोषणा* *मुख्यमंत्री कृषी वीज बिल सवलत योजनेसह शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा - कृषिमंत्री मुंडेंनी मानले दादांचे आभार*  मुंबई (दि. 28) - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  महिला आर्थिक धोरण, महिलांचा विकास,  गृहिणींवरील कौटुंबिक ताण तणाव कमी करणे आदी करण्यासह या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, युवा वर्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आला आहे.  आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारने सन 2023 24 सालच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित अ

प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी कार्यक्रम

इमेज
 प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी कार्यक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      श्री. चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेडचे पुर्वमठाधिपती प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळीत रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.         श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर,स्व. मनोहरपंत बडवे सभागृह देशपांडे गल्ली परळी वैजनाथ येथे प.पू.श्री. सद्गुरू वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ वद्य ९ शके १९४६ रविवार दि. ३०/०६/ २०२४ रोजी सकाळी ७.३० वा. श्री गुरू महाराज यांच्या प्रतिमेस रूद्राभिषेक व सकाळी १०.३० वा श्री. ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ यांचे नारदीय कीर्तन होईल. तरी सर्व गुरुभक्तांनी उपस्थित राहुन महाआरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गुरुबंधु व सर्व समाज बांधव, परळी वैजनाथ यांनी केले आहे.

परळी पोलिसात गुन्हा दाखल

इमेज
  व्हायरल ऑडिओ क्लिप: शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,शिवराज बांगर यांच्याविरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिप मध्ये मी पंकजा मुंडेंना धोका दिला, याबरोबरच धनंजय मुंडे यांची गाडी फोडू, त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या विरोधात आवाज उठवू अशा पद्धतीचे तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता परळी पोलीस ठाण्यात न. प. गटनेते वाल्मीक कराड यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       मी पंकजाताईंना जाणीवपूर्वक धोका दिला, 376 बूथ बजरंग बाप्पांच्या ताब्यात दिले एवढेच नाही तर निवडणुकीत बजरंग बाप्पांना पैसाही पुरविला तसेच धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्याबाबतीत आक्षेपार्ह शिव्या दिल्याची वक्तव्येही या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचे दिसून येते. ही व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप व यातील संवाद शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्याम

मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात; गावात शांतता!

इमेज
  मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात; गावात शांतता!  गेवराई /शिरूर..... प्रतिनिधी..        मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे पुढील होणार  अनर्थ टळला आहे .दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.  ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड इथून दर्शन घेऊन भगवानगड ला जाणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तिंतरवणी माळेगाव येथील ग्रामस्थ दुचाकी रॅली आणि डीजे लावून पाडळशिंगी कडे निघाले होते त्यांची रॅली मातोरी गावात आल्यानंतर रॅलीतील तरुणांनी त्या गावात डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. डिजेवर  एक दोन गाणी डान्स केल्यानंतर मोठी ट्राफिक जाम झाली त्यामुळे मातोरी  ग्रामस्थांनी या तरुणांना येथे डीजे वाजून नका म्हणून सांगितले त्याच कारणावरून ग्रामस्थांनी तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी  काही तरुणांनी शिवीगाळ  सुरू करीत एक हाॅटेल वर दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेकीला सुरुवात झाली. यात काही जणांना मार ला

सुषमा अंधारेंच्या प्रतिमेचे दहन: गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा -उबाठा शिवसेनेचे निवेदन

इमेज
सुषमा अंधारेंच्या प्रतिमेचे दहन: गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा -उबाठा शिवसेनेचे निवेदन  परळी वैजनाथ दि २७ (प्रतिनिधी) :- उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेचे दहन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.             शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालून त्यांच्या प्रतिमेचे दहन काही लोकांनी केले. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा उबाठा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा  इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते, उपतालुकाप्रमुख महेश उर्फ पप्पू केंद्रे, परळी विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंके, परळी विधानसभा समन्वक भरत इंगळे, तालुका सचिव प्रकाश साळुंके आदींनी पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकांना सुविधा पुरवा - अनिल बोर्डे

इमेज
  ज्येष्ठ नागरिकांना सुविधा पुरवा - अनिल बोर्डे                               गेवराई :- गेवराई शहरातील नागरिकांना विविध सुविधा पुरविणे बाबतचे निवेदन बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख व जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराईचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी गेवराई शहरातील नगरपरिषद कार्यालय येथील अधीक्षक तृप्ती तळेकर यांना ज्येष्ठ नागरिक समस्या बाबत विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.                                      भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निरोधक तत्त्वावरील अनुच्छेद 39 व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे.  ज्येष्ठ नागरिक समाजातील स्थान लक्षात घेता त्यांना वृद्ध काळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा व समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे असे शासनाचे परिपत्रक काढले आहे त्याचे अवलोकन करून ज्येष्ठ नागरिकाच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु त्यांच्या कार्यालयाने अद्याप पर्यंत आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. त्यामुळे गेवराई शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये असंत

वीज पडून तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

इमेज
वीज पडून तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी  धोंडराई, प्रतिनिधी:- गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.        गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने  शालनबाई शेषराव नजन वय 65 यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय 40 तर विजु बाई बाळासाहेब खेडकर वय41 असा या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला तिनी महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष 65 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील इलाज आणि उपचार सुरू आहेत

भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला जवळ अपघात; दोन जन ठार

इमेज
भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला  जवळ अपघात; दोन जण ठार धोंडराई,प्रतिनिधी......       आळेफाटा येथील भाजीपाला (तरकरी ) घेऊन जाणाऱ्या पहाटेच्या दरम्यान दि.२६जून रोजी कोळगाव येथील बायपास जवळच्या पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात पिकअप पलटी होऊन त्यात दोघे जण ठार झाले.        गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन हिंगोली कडे जात असताना राजू सुरेश बांगर रा. बोरीखुर्द (साळवाडी ता. जुन्नर जि. पुणे) हा शेतकरी भाजीपाला उत्पादक होता. त्यांच्या जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने  शेतकरी पिकअपमध्ये मिर्ची आणि कोबी घेऊन हिंगोलीला जात होता. गेवराई तालुक्यातील दोघेजण ठार, कोळगाव जवळ घडली. ही दि.२६ जुन २०२४ रोजी घटना जुन्नरचा शेतकरी हिंगोलीला घेऊन जात होता भाजीपाला पिकअपने पलट्या खाल्ल्ल्या त्यात राजू सुरेश बांगर (वय २७ वर्षे) व त्याचा सहकारी नागोजी इंगोले ( ३५ ) इना पुर पुसद चालकअसे दोघेजण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या अपघात

अपघात दोघे बहीण-भाऊ जागीच ठार तर तिघे जखमी

इमेज
देव दर्शन करून परतणाऱ्या आंध्रप्रदेशातील भाविकांचा भीषण अपघात ! अपघात दोघे बहीण-भाऊ जागीच ठार तर तिघे जखमी केज :- शिर्डी येथून देवदर्शन करून आंध्रप्रदेश कडे जाणाऱ्या भविकांच्या स्विफ्ट कारने मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्या जवळ पहाटे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्या अपघात दोघे बहीण भाऊ जागीच ठार झाले. तर पाठीमागच्या सीटवर बसलेले दोघे गंभीर जखमी झाले असून या अपघातात ट्रक जवळ उभा असलेला ट्रक ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. स्विफ्ट कार मधील दोन मयत व दोन जखमी हे सर्वजण आंध्रप्रदेश राज्यातील रहिवाशी आहेत. तर ट्रक ड्रायव्हर हा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवाशी आहे.        बुधवार दि. २६ जून रोजी  ५:०० वा. पहाटे बीडकडून अंबाजोगाईच्या दिशेने माल घेवून जाणारी ट्रक क्र. (एम एच-४४/ए बी-८७८६) हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखॉऺं पठान (रा. पाटोदा जि. बीड) यांना त्यांच्या ट्रक मधील मालाची चोरी झाली असा संशय आल्याने त्यांनी ट्रक रस्त्यात थांबवून ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कार क्र. (ए पी-३९/

बाथरूमला म्हणून गेली व बेपत्ता झाली ; पळवुन नेल्याचा मजूर वडीलांना संशय

इमेज
  बाथरूमला म्हणून गेली व बेपत्ता झाली ; पळवुन नेल्याचा मजूर वडीलांना संशय परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     बांधकामावर कामगार म्हणून काम करणाऱ्या परळीतील एका कुटुंबातील पित्याने आपली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असुन तिला कोणीतरी पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करत पोलीसांत धाव घेतली आहे.गेल्या काही दिवसात परळी शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.      परळी शहरानजीकच्या समता नगर  भागात मिस्त्री व बांधकाम कामगार म्हणून काम करणारे एक कुटुंब राहते.या कुटुंबातील 13 वर्षिय मुलगी दि.24/06/ 2024 रोजी दुपारी 03 वा चे सुमारास घरी असताना बाथरुमला जावुन येते असे तिच्या आईला म्हणुन गेली ती परतलीच नाही.तिच्या कुटुंबियांनी शेजारी, नातेवाईक सगळीकडे शोध घेतला मात्र तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीसांत धाव घेऊन बेपत्ता झाल्याची नोंद केली.तिला कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवुन नेल्याचा आपल्याला संशय असुन माझ्या मुलीचा शोध घेऊन अज्ञात ईसमाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केली आह

दुख:द वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते विजय हजारे यांचे निधन परळी / प्रतिनिधी..   शहरातील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते विजय हजारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 27 रोजी सकाळी साडे आठ वाजता परळीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.      विजय हजारे हे फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते.अनेक सामाजिक आंदोलनात त्यांचा सहभाग होता.गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारा दरम्यान त्यांचे आज बुधवार रोजी सकाळी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.     त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोन जागीच ठार तर तिघे जखमी

इमेज
भीषण अपघात: दोन जागीच ठार तर तिघे जखमी केज :- मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्या जवळ पहाटे ४:३० वा. स्विफ्ट कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्या अपघात कार मधील आंध्रप्रदेशातील एक स्त्री व पुरुष जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे आणि ट्रक ड्रायव्हर असे तिघे जखमी झाले आहेत.        बुधवार दि. २६ जून रोजी  ४:३० वा. पहाटे बीड कडून अंबाजोगाईकडे येणारी ट्रक क्र. (एम एच-४४/ए बी-८७८६) हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कार क्र. (ए पी-३९/एस एस-५६५७) ने उभ्या ट्रक ला जोराची धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आंध्रप्रदेशातील अनोळखी एक स्त्री व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखॉऺं पठान (रा. पाटोदा जि. बीड) हे देखील जखमी झाले आहेत.  हा अपघात एवढा भीषण होता की, स्विफ्ट डिझायर गाडी पार चकनाचुर झालेली असून ट्रकची चे देखील मागील बाजूचे डाव्या बाजूचे टायर फुटले आ

सेवापुर्ती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यावर्धिनी विद्यालय,परळी वै चे मुख्याध्यापक उन्मेष हरिहरराव मातेकर यांचा प्रासंगिक विशेष लेख >>>>>>माझी शाळा माझा परिवार

इमेज
  माझी शाळा माझा परिवार            म ला आठवतो  तो माझ्या नोकरीचा पहिला दिवस.मी  मंगळवारी माझ्या श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यावर्धिनी विद्यालयात रुजू झालो.पूर्णपणे नवीन वातावरणात मी रुजू झालो होतो. नवीन संस्था,नवीन संचालक,नवीन सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी मी थोडे गोंधळून गेलो होतो. सर्वप्रथम तत्कालीन मा सचिव श्री कोळगे साहेब,श्री भिंगोरे साहेब,श्री पैंजणे साहेब,श्री ईटके,श्री एम टी मुंडे साहेब यांनी सर्वांशी माझा परिचय करून दिला.आज त्या गोष्टीला २७ ते २८ वर्षे झाली,पण आजही ते सर्व प्रसंग स्पष्ट आठवतात.  माझ्या संपूर्ण कार्यकाळात मला आज कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचे मनापासुन सहकार्य लाभले. त्यांच्या उस्फुर्त सहकार्यामुळे आजचे विद्यावर्धिनी विद्यालयाचे नाव परळी शहरात व बीड जिल्ह्यात गाजत आहे.मी रुजू झालो तेंव्हा शाळा १ ली ते ७ वी पर्यंत होती.१९९९ ला ८ वी ते १० वी हे माध्यमिकची स्वतंत्र शाळा मान्यता प्राप्त झाली.पहिल्यांदा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.८वीचा पहिला वर्ग फक्त ४३ विद्यार्थ्यांचा होता.शाळेचे विरोधक नाही म्हटले तरी होतेच. पण त्यातूनही मार्ग काढत आज आमची