बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

 बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी


बीड : पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सचिव संजय मोरे यांनी ही शनिवारी कारवाई केली. 

कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथीत ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यांनी यात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पहिल्यांदा धोका दिल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार यांना ३७६ बुथवर यंत्रणा पुरवून पैसे वाटल्याचे म्हटले होते. तसेच धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याबाबतही वक्तव्य केले होते. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर खांडे व बांगरविरोधात परळी व बीडमध्ये गुन्हे दाखल झाले होते. याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार