अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

 अविनाश पाठक यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला


           बीड,दि. 28 (जिमाका) अविनाश पाठक यांनी आज बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मूधोळ मुंडे यांच्याकडून स्वीकारला. बुधवारी दिनांक 26 जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश काढले होते. त्या आदेशाप्रमाणे आज दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री पाठक यांच्याकडे आज सोपविला. तत्पूर्वी श्री. पाठक यांनी सकाळी आपल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार संगीता देवी पाटील यांना सोपविला.

             याप्रसंगी  परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, कविता जाधव, महेंद्र कुमार कांबळे यासह वेगवेगळे विभागाचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार