दुख:द वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली
आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते विजय हजारे यांचे निधन
परळी / प्रतिनिधी..
शहरातील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते विजय हजारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 27 रोजी सकाळी साडे आठ वाजता परळीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विजय हजारे हे फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते.अनेक सामाजिक आंदोलनात त्यांचा सहभाग होता.गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारा दरम्यान त्यांचे आज बुधवार रोजी सकाळी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता भीमनगर येथील शांतीवन स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा