मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात; गावात शांतता!

 मातोरीतील परिस्थिती नियंत्रणात; गावात शांतता!



 गेवराई /शिरूर..... प्रतिनिधी..

       मातोरी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे पुढील होणार  अनर्थ टळला आहे .दरम्यान रात्री उशिरा पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

 ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके हे गोपीनाथ गड इथून दर्शन घेऊन भगवानगड ला जाणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तिंतरवणी माळेगाव येथील ग्रामस्थ दुचाकी रॅली आणि डीजे लावून पाडळशिंगी कडे निघाले होते त्यांची रॅली मातोरी गावात आल्यानंतर रॅलीतील तरुणांनी त्या गावात डीजे लावून नाचण्यास सुरुवात केली. डिजेवर  एक दोन गाणी डान्स केल्यानंतर मोठी ट्राफिक जाम झाली त्यामुळे मातोरी  ग्रामस्थांनी या तरुणांना येथे डीजे वाजून नका म्हणून सांगितले त्याच कारणावरून ग्रामस्थांनी तरुणांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी  काही तरुणांनी शिवीगाळ  सुरू करीत एक हाॅटेल वर दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेकीला सुरुवात झाली. यात काही जणांना मार लागला आहे. तर चार ते पाच दुचाकी वर दगड मारून त्याचे नुकसान करण्यात आले आहे. डीजेचे देखील नुकसान करण्यात आले आहे. महामार्गावर गाड्या अडवून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार देखील घडले आहेत. घटनेची माहिती समजल्यानंतर चकलांबा पोलिस आणि बीड जिल्ह्याचे राखीव पोलीस व इतर अधिकारी यांनी तातडीने गावात पोहोचून त्यांनी वेळेत परिस्थिती नियंत्रणात मिळवले.

अफवांचे पेव फुटले 

 प्रा. लक्ष्मण हाके भगवानगडावर येणार म्हणून महामार्गावर ठीक ठिकाणी ग्रामस्थांनी  त्यांची स्वागतासाठी तयारी केली होती. मात्र इकडे मात्र असा गैरसमज निर्माण झाला की आता दुसऱ्या समूह आपल्या गावावर हल्ला करण्याची तयारीत आहे त्यामुळे अनेकांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून माहिती देण्यास सुरुवात केली परिणामी दोन्ही समाजाचे लोक मोठ्या संख्येने मातोरी परिसरात जमण्यास सुरुवात झाली मात्र येथील कृष्णानगर येथील दगडफेक देखील करण्यात आली असे आज ग्रामस्थ सांगत आहेत.

हाके यांचा पुढील दौरा रद्द  

हाके काल भगवानगड निघणार होते पहाटे त्यांनी भगवानगडाचे दर्शन घेतल्यानंतर पुढील दौरा रद्द करत असल्याची घोषणा त्यांचे सहकारी पी.टी चव्हाण यांनी केली आहे घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आव्हान केले आहे ते म्हणाले लाठ्या काठ्या हातात घेण्याचा काळ गेला गावची शांतता बिघडू नका आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षण संरक्षण करण्या दोघांचाही काय हातात घेऊ नये शांत रहा गावाची शांतता बिघडू नका असे आव्हान हाके यांनी केले आहे तसेच मातोरीच्या दगडफेकीच्या घटनेचे निषेध केला आहे ते बीड जिल्ह्याच्या तेलगाव येथे बोलत होते आम्ही उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गाने आम्ही आमची मागणी मागत आहोत तरुणांनी कुठलाही कायदा हातात घेऊ नका दगडफेक आणि रस्ता रोको करू नका गाडी फोडून दहशत पसरू नका  कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करत असतील तर मी त्याचं निषेध व्यक्त करतो संविधानावर विश्वास ठेवा भीती बाळगू नका पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था ठेवावे लाथा काट्याचा काळ गेला गावची शांतता बिघडू नका रोज एकमेकाची तोंड पाहिजे आहेत भांडण आणि हिंसा उपाय नाही असे लक्ष्मण हाके म्हटले आहेत तर पालकमंत्री धनंजय मुंडे व नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !