जातीभेद निर्मूलनाचे काम छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केले- संपादक मोहन व्हावळे
जातीभेद निर्मूलनाचे काम छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केले- संपादक मोहन व्हावळे
परळी (प्रतिनिधी):- छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जातिभेद निर्मूलनाच्या कामासोबत सर्व समाजांना समान न्याय देण्याचे काम केले असे प्रतिपादन संपादक मोहन व्हावळे यांनी केले. लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित जयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ संपादक रानबा गायकवाड, फुले शाहू आंबेडकरी अभ्यास समूहाचे इंजि. भगवान साकसमुद्रे, धनंजय आढाव, संपादक मोहन व्हावळे, प्रकाश चव्हाण, संजीव रॉय, विकास वाघमारे आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले की, छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका नेहमीच घेतली. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम केले. असे काम होता ना आज पाहायला मिळत नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेवर काम करणारे आजचे राजकीय पुढारी फार कमी संख्येने दिसून येतात याकडेही त्यांनी लक्षवेधी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा