वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे  वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे  यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर  , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.       यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे असून मानवाच्या शाश्वत विकासासाठी त्या

अपघात दोघे बहीण-भाऊ जागीच ठार तर तिघे जखमी

देव दर्शन करून परतणाऱ्या आंध्रप्रदेशातील भाविकांचा भीषण अपघात !

अपघात दोघे बहीण-भाऊ जागीच ठार तर तिघे जखमी

केज :- शिर्डी येथून देवदर्शन करून आंध्रप्रदेश कडे जाणाऱ्या भविकांच्या स्विफ्ट कारने मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्या जवळ पहाटे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्या अपघात दोघे बहीण भाऊ जागीच ठार झाले. तर पाठीमागच्या सीटवर बसलेले दोघे गंभीर जखमी झाले असून या अपघातात ट्रक जवळ उभा असलेला ट्रक ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. स्विफ्ट कार मधील दोन मयत व दोन जखमी हे सर्वजण आंध्रप्रदेश राज्यातील रहिवाशी आहेत. तर ट्रक ड्रायव्हर हा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवाशी आहे.

       बुधवार दि. २६ जून रोजी  ५:०० वा. पहाटे बीडकडून अंबाजोगाईच्या दिशेने माल घेवून जाणारी ट्रक क्र. (एम एच-४४/ए बी-८७८६) हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखॉऺं पठान (रा. पाटोदा जि. बीड) यांना त्यांच्या ट्रक मधील मालाची चोरी झाली असा संशय आल्याने त्यांनी ट्रक रस्त्यात थांबवून ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कार क्र. (ए पी-३९/एस एस-५६५७) ने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात कार चालक साईकृष्णा वामसी श्रीनिवासराव जोन्नालगड्डा (वय २७ वर्ष, रा. जंगला पेठ, सिवलायम नुझविड, इलुरू) व त्याची बहीण रमयाकृष्णा व्यंकटा नरसिंहराव मंडवा (वय ३७ वर्ष, पेडावुटपल्ली जोसेफ तम्बी टेम्पल एरिया कृष्णा) या जागीच ठार झाले. तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले आहेत. 

स्विफ्ट कार मधील दोघे मयत व दोघे जखमी हे चौघे आंध्र प्रदेश राज्यातील रहिवाशी आहेत.तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखॉऺं पठान (रा. पाटोदा जि. बीड) हे देखील जखमी झाले आहेत. 

अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर गाडीतील भाविक हे शिर्डी येथे श्री साई दर्शन करून आंध्र प्रदेशातील त्यांच्या गावाकडे जात होते. हा अपघात एवढा भीषण होता की, स्विफ्ट डिझायर गाडी पार चकनाचुर झालेली असून ट्रकचीचे देखील मागील बाजूचे डाव्या बाजूचे टायर फुटले आहे.

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले असून एका जखमी यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी आंध्रप्रदेशातील मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून मयत व जखमी हे परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत आहे. त्यांना त्यांच्या बोली भाषे व्यतिरिक्त इतर भाषा समजत नाही. तसेच त्यांचे नातेवाईक हे रात्री उशिरा के ज मध्ये पोहचण्याची शक्यता आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलीस नाईक राजू गुंजाळ, शेख रशीद हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना मदत केली.

दोन्ही मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवले आहेत तर जखमींवर के ज येथे प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे.

-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?