महापारेषण चे अधिक्षक अभियंता मिलिंद बनसोडे सेवानिवृत्त

 महापारेषण चे अधिक्षक अभियंता मिलिंद बनसोडे सेवानिवृत्त


परळीत काम करताना आनंद व समाधान वाटले: व्यक्त केली कृतज्ञ भावना


परळी :महापारेषण कंपनीच्या येथील अतिउच्च दाब सं व सू मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद बनसोडे हे सेवानिवृत्त झाले त्याबद्दल 28 जून रोजी येथील कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी नगर परिमंडळाचे मुख्य अभियंता नसीर कादरी, महापारेषण (संचलन )चे माजी संचालक यु.जी .झाल्टे महापारेषण (संचलन ) चे माजी कार्यकारी संचालक रोहिदास मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलिंद बनसोडे यांचा महापारेषण परळीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला .यावेळी मिलिंद बनसोडे यांनी आधिक्षक अभियंता म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याचा यावेळी आढावा चीत्रफित द्वारे सादर करण्यात आला .यावेळी मिलिंद बनसोडे म्हणाले की, परळीत येण्यापूर्वी  भीती चे वातावरण असल्याचे सांगण्यात आले होते पण तसे काही नव्हते उलट छान वातावरण पहायावस  मिळाले .परळी येथे अभियंता पदाची सेवा अत्यंत आनंदात आणि खेळी मेळी च्या वातावरणात करता आली .येथील अधिकारी कर्मचारी व कंपनीचे एजन्सी यांच्यात चांगला समन्वय असल्याने अवघड काम करणे सोपे झाले आहे. कार्यक्रमाचे संचालन संभाजीनगर येथील वरिष्ठ व्यवस्थापक मनीषा दुसाने यांनी केले यावेळी जाधवर, पारपल्लीवार, लक्ष्मीकांत दगडगुंडे,घोडके ,कानडे,बालासाहेब चाटे, व्यवस्थापक प्रमोद आकरे, प्रवीण फड, सोमनाथ सिरसाट, अजय वाल्मिकी, परमेश्वर करडे, नितीन मुंडे, शशिकांत देशमाने, प्रताप जाधव, सुरज कापसे, माधव हंचाटे, गंगाधर चाटे,सतीश बनसोडे,प्रा खंदारे ,दिनकर काळे, ठक्कर ,कांबळे ,सुरडकर ,एकनाथ सावजी, ऍड मनोज संकाये, चंद्रकांत गीते, प्रकाश ईटके,कुंभार, पाठक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गीते इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार