परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

भाशिप्र संस्थेने सुसंस्कारित व राष्ट्राभिमानी विद्यार्थी घडविले - विष्णुपंत कुलकर्णी

भाशिप्र संस्थेने सुसंस्कारित व राष्ट्राभिमानी विद्यार्थी घडविले - विष्णुपंत कुलकर्णी

नांदेड. दिनांक 28 जून प्रतिनिधी

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुसंस्कारित व राष्ट्राभिमानी , जबाबदार नागरिक घडविण्याचे अव्याहतपणे काम केले आहे. शिक्षणातील भारतीयत्व घडवीत असताना समाजाची मूल्याधिष्ठित जडणघडण करण्याचेही काम संस्थेने मराठवाड्यात केले आहे.आज मितीस संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. संस्थेला या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा कै. नाना पालकर शैक्षणिक संकुलाचे पालक विष्णुपंत कुलकर्णी यांनी नांदेड येथे काढले.

 भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचालित कै नाना पालकर प्रा विद्यालयात संस्थेचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ अर्जुन मापारे होते.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्था ध्वजाचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या ब्रीदवाक्याचे गायन , संस्था प्रार्थना घेण्यात आली. 

   संस्थेच्या इ. पहिली ते आठवीच्या वार्षिक नियोजन पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.  शाळेच्या विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा. सौ. रेश्मा डोईफोडे, सदस्या सौ रेखा कुलकर्णी, प्रा. डॉ. सौ. भाग्यश्री कापरे- कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. 

   संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा तसेच वर्गनिहाय पाढे पाठांतर स्पर्धेतील  विजयी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. 

       अध्यक्षीय समारोप करताना भाशिप्र संस्था  शाखा नांदेडचे अध्यक्ष डॉ.मापारे यांनी संस्था वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना भविष्यात लवकरच कै. नाना  पालकर शाळेची सुसज्ज इमारत समाजाच्या सहकार्यातून उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. 

  यावेळी व्यासपीठावर रा.स्व.संघाचे शिवाजी हंगरगे, ॲड. सोनुले ,  श्री गिरीश जोशी, तसेच शालेय समितीचे सदस्य श्री अनिल डोईफोडे , श्री संतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री रमेश सातपुते यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना कांबळे यांनी केले, प्रास्ताविक सौ. श्रुती देशपांडे यांनी केले तर आभार सौ.  शिल्पा हिवंत यांनी मानले. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी सर्व शिक्षक पालक प्रतिनिधी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!