वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे  वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे  यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर  , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.       यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे असून मानवाच्या शाश्वत विकासासाठी त्या

सेवापुर्ती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यावर्धिनी विद्यालय,परळी वै चे मुख्याध्यापक उन्मेष हरिहरराव मातेकर यांचा प्रासंगिक विशेष लेख >>>>>>माझी शाळा माझा परिवार

 माझी शाळा माझा परिवार 

          ला आठवतो  तो माझ्या नोकरीचा पहिला दिवस.मी  मंगळवारी माझ्या श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यावर्धिनी विद्यालयात रुजू झालो.पूर्णपणे नवीन वातावरणात मी रुजू झालो होतो. नवीन संस्था,नवीन संचालक,नवीन सहकारी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी मी थोडे गोंधळून गेलो होतो. सर्वप्रथम तत्कालीन मा सचिव श्री कोळगे साहेब,श्री भिंगोरे साहेब,श्री पैंजणे साहेब,श्री ईटके,श्री एम टी मुंडे साहेब यांनी सर्वांशी माझा परिचय करून दिला.आज त्या गोष्टीला २७ ते २८ वर्षे झाली,पण आजही ते सर्व प्रसंग स्पष्ट आठवतात.

 माझ्या संपूर्ण कार्यकाळात मला आज कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचे मनापासुन सहकार्य लाभले. त्यांच्या उस्फुर्त सहकार्यामुळे आजचे विद्यावर्धिनी विद्यालयाचे नाव परळी शहरात व बीड जिल्ह्यात गाजत आहे.मी रुजू झालो तेंव्हा शाळा १ ली ते ७ वी पर्यंत होती.१९९९ ला ८ वी ते १० वी हे माध्यमिकची स्वतंत्र शाळा मान्यता प्राप्त झाली.पहिल्यांदा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.८वीचा पहिला वर्ग फक्त ४३ विद्यार्थ्यांचा होता.शाळेचे विरोधक नाही म्हटले तरी होतेच. पण त्यातूनही मार्ग काढत आज आमची शाळा या स्तरापर्यंत पोहोचली आहे.हे मार्गक्रमण चालू असताना आमच्या संस्था सचिव व संस्था संचालकांनी आम्हाला भक्कम मानसिक व आधार दिला.कोणतीही अडचण जी आमच्या आवाक्याबाहेरची असली की संस्थेच्या संचालकांनी ती समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले.

      आमच्या शाळेचे  ५वी व ७वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात नाव होते.मी रुजू होण्यापूर्वीपासून  त्यासाठी सर्वांनी खूप परिश्रम घेतले होते.शिष्यवृत्तीचा विद्यावर्धिनी पॅटर्न त्यांच्यामुळे निर्माण झाला. शिष्यवृत्ती निकाल म्हंटल की विद्यावर्धिनी विद्यालयाचे पहिल्या पाचमध्ये हमखास विद्यार्थी असायचे त्यांनी पाया रचला, त्यावर आम्ही कळस बांधण्याचा प्रयत्न केला,आणखी पुढे खूप मोठा पल्ला गाठवयाचा आहे.

   माध्यमिकसाठी आम्हाला भरपूर परिश्रम घ्यावे लागले.मला आठवते की कु लीना भाटकर ही विद्यार्थिनी परळी शहरातून माध्यमिक शालांत परीक्षेत( १० वी बोर्ड ) पहिल्यांदा गुणवत्ता यादीत अली होती.त्यानंतर आम्ही मागे वळून पाहिले नाही.पहिली काही वर्षे आम्हाला विद्यार्थी प्रवेशासाठी परिश्रम घ्यावे लागले.आज विद्यावर्धिनी विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून तेथे आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. वैद्यकीय क्षेत्र,अभियांत्रिकी क्षेत्र, संशोधन क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र,सॉफ्टवेअर क्षेत्र,व्हेटर्नरी क्षेत्र, कृषी क्षेत्र,खाजगी व्यवसाय क्षेत्र, व शिक्षण क्षेत्र या सर्वच क्षेत्रात  त्यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. काही विद्यार्थी परदेशात मोठ्या पदांवर काम करत आहेत,त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.काही माजी विद्यार्थी शाळेसाठी चांगल्या प्रकारे योगदान देत आहेत.काही माजी विद्यार्थी हे शाळेतील गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक,शालेय गणवेश न चुकता देऊनआपले सामाजिक दायित्व पार पाडत आहेत.

           आम्ही शालेय वयात दिलेले संस्कार त्यांच्या जीवनात कामाला आले. प्रशासनात काम करत असताना फ्रि हॅन्ड दिला त्यामुळे काम करताना  उत्साह आला.संस्थेत व शाळेत काम करताना विविध प्रकारचे अनुभव मिळाले.मी अनुभव समृद्ध झालो.कोणाशी कसा संवाद करावा हे शिकायला मिळाले. शक्यतो कोणताही पालक शाळेत काम घेऊन आल्यानंतर तो समाधानानेच परत कसा जाईल असा प्रयत्न मी केला.संस्थेने जे काही प्रकल्प राबवले त्याचे प्रकल्प अहवाल तयार करावे याचा अनुभव मिळाला. प्रकल्प सादरीकरण( presentation) कसे करावे याचेही ज्ञान प्राप्त झाले व  हळूहळू नाही म्हटले तरी सभाधीटपणा ( स्टेज करेज) आला.

         शाळेत मी शेवटच्या दिवसापर्यंत अध्यापन केले.इयत्ता १० ला इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अध्यापन करणे यात एक मानसिक समाधान लाभले.मी जरी मुख्याध्यापक म्हणून काम केले असले तरी मी प्रथम अध्यापक होतो.ती जबाबदारी मी पार पाडली.मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थी,पालक, शिक्षण विभाग,शिक्षक ,इतर शाळांचे मुख्याध्यापक या सर्वांबरोबर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे शाळेची प्रगती झाली आहे. आमची शाळाशिस्त व संस्कार यासाठी प्रसिद्ध आहे.यासाठीमला माझ्या सर्व शिक्षक बंधू व भगिनीं व सर्व आदरणीय संचालक यांनी मनापासून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.शाळा प्रगतीपथावर नेणे हे एकट्याचे काम नाही ते एक  सामूहिक काम आहे.

      माझी शाळा माझा एक परिवार आहे. गेल्या २७ वर्षात मला त्याची वारंवार प्रचिती आली.२०१६ मध्ये मुख्याध्यापक बैठक आटोपून माजलगावहून परत येताना माझा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी माझ्या विद्यावर्धिनी परिवाराने मला भक्कम मानसिक आधार दिला. मी साडेपाच महिने पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले.पायात रॉड टाकण्यासहित पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यावेळी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ व विद्यावर्धिनी विद्यालय परिवाराने वारंवार पुण्याला येऊन भेटून मानसिक बळ दिले.त्या आधारावर मी पूर्णपणे बरा होऊन परत आलो. हे केवळ आमच्या या सर्वांच्या स्नेहामुळे शक्य झाले. हे माझ्यापुरतं मर्यादित नाही तर संस्थेतील व शाळेतील सर्वांना याचा अनुभव आहे.अशी आहे माझी शाळा आणि माझा परिवार.

    ✍️उन्मेष हरिहरराव मातेकर 

मुख्याध्यापक, विद्यावर्धिनी विद्यालय,परळी वै

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?