युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

बाथरूमला म्हणून गेली व बेपत्ता झाली ; पळवुन नेल्याचा मजूर वडीलांना संशय

 बाथरूमला म्हणून गेली व बेपत्ता झाली ; पळवुन नेल्याचा मजूर वडीलांना संशय



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    बांधकामावर कामगार म्हणून काम करणाऱ्या परळीतील एका कुटुंबातील पित्याने आपली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असुन तिला कोणीतरी पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करत पोलीसांत धाव घेतली आहे.गेल्या काही दिवसात परळी शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

     परळी शहरानजीकच्या समता नगर  भागात मिस्त्री व बांधकाम कामगार म्हणून काम करणारे एक कुटुंब राहते.या कुटुंबातील 13 वर्षिय मुलगी दि.24/06/ 2024 रोजी दुपारी 03 वा चे सुमारास घरी असताना बाथरुमला जावुन येते असे तिच्या आईला म्हणुन गेली ती परतलीच नाही.तिच्या कुटुंबियांनी शेजारी, नातेवाईक सगळीकडे शोध घेतला मात्र तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीसांत धाव घेऊन बेपत्ता झाल्याची नोंद केली.तिला कोणीतरी अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवुन नेल्याचा आपल्याला संशय असुन माझ्या मुलीचा शोध घेऊन अज्ञात ईसमाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या बेपत्ता मुलीच्या वडिलांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या