ज्येष्ठ नागरिकांना सुविधा पुरवा - अनिल बोर्डे
ज्येष्ठ नागरिकांना सुविधा पुरवा - अनिल बोर्डे
गेवराई :- गेवराई शहरातील नागरिकांना विविध सुविधा पुरविणे बाबतचे निवेदन बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख व जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराईचे अध्यक्ष अनिल बोर्डे यांनी गेवराई शहरातील नगरपरिषद कार्यालय येथील अधीक्षक तृप्ती तळेकर यांना ज्येष्ठ नागरिक समस्या बाबत विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निरोधक तत्त्वावरील अनुच्छेद 39 व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिक समाजातील स्थान लक्षात घेता त्यांना वृद्ध काळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा व समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे असे शासनाचे परिपत्रक काढले आहे त्याचे अवलोकन करून ज्येष्ठ नागरिकाच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु त्यांच्या कार्यालयाने अद्याप पर्यंत आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. त्यामुळे गेवराई शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच आपल्या मागण्याचे काय झाले याची विचारणा ज्येष्ठ नागरिकाकडून वारंवार करण्यात येत आहे. तरी खालील मागण्या बाबत आपण सहानुभूतीपूर्वक तात्काळ विचार विनिमय करून मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी पुन्हा मागणी करण्यात आली आहे. गेवराई शहराचा चोहोबाजूंनी आकार वाढत आहे सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी गावाबाहेर गेल्या नंतर बसण्यासाठी एकही बेंच उपलब्ध नाही. याबाबत आपणास वारंवार मागणी केलेली आहे. आपणास 25 ते 30 बेंच पुरविण्यात येतील असे प्रत्यक्ष सांगण्यात आले होते परंतु अद्याप पर्यंत एकही बेंच पुरविण्यात आलेला नाही. ही बाब योग्य नाही असे निदर्शनास आणून दिलेले आहे. या निवेदनावर 15 ऑगस्ट पूर्वी कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
तसेच गेवराई शहरातील श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई यांच्यामार्फत विरंगुळा केंद्र चालविले जाते. विरंगुळा केंद्रामध्ये बसण्यासाठी खुर्च्या व इतर साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे तर कार्यक्रम घेणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिक कार्यालयासमोर बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाहीत. तरी बेंच पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विरंगुळा केंद्रात चढण्यासाठी पायऱ्या उपलब्ध नाहीत त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तसेच विरंगुळा केंद्रात व बाहेर स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाही. गेवराई शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज असे गार्डन असणे आवश्यक आहे परंतु गार्डन उपलब्ध नाही तसेच सध्या अस्तित्वात असलेले गार्डन उपलब्ध करून देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या अचानक काही आजारापासून त्यांना त्रास झाल्यास परगावी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते तरी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकाला व्यायाम करण्यासाठी विरंगुळा केंद्र समोर साहित्य उपलब्ध करून देण्यात द्यावे. विरंगुळा केंद्राच्या बाजूला ब्लिचिंग पावडर ठेवण्यात आलेली आहे त्याचा वास मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे ब्लिचिंग पावडर इतरत्र हलवावी म्हणजे त्याचा वास येणार नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विरंगुळाकेंद्रासमोर फुलाची झाडे लावणे आवश्यक आहे व सुसज्ज असे विरंगुळा केंद्र तयार करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यापूर्वी मुख्याधिकारी यांनी आपल्या मागण्या योग्य असून त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील असे प्रत्यक्ष सांगण्यात आले होते परंतु आजपर्यंत कसल्या प्रकारची कारवाई झालेली नाही ही बाब जेष्ठाच्या दृष्टीने योग्य वाटत नाही तरी या निवेदनावर तात्काळ कारवाई करून अंमलबजावणी करण्यात यावी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल या निवेदनावर श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष अनिल बोर्डे, रि. पा. ऑफ इंडिया एकतावादी गेवराई अध्यक्ष हनुमान काळे उपाध्यक्ष राजेंद्र सुतार चिटणीस प्रमोद कदम एडवोकेट बी एम मुळे जीआर जोशी विजय बोर्डे रामेश्वर थळकर भीमराव जगताप सखाराम कानगुडे, अरुण परदेशी आधी जण हजर होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा