सुषमा अंधारेंच्या प्रतिमेचे दहन: गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा -उबाठा शिवसेनेचे निवेदन
सुषमा अंधारेंच्या प्रतिमेचे दहन: गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा -उबाठा शिवसेनेचे निवेदन
परळी वैजनाथ दि २७ (प्रतिनिधी) :-
उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेचे दहन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत न बोललेले शब्द त्यांच्या तोंडी घालून त्यांच्या प्रतिमेचे दहन काही लोकांनी केले. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा उबाठा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते, उपतालुकाप्रमुख महेश उर्फ पप्पू केंद्रे, परळी विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंके, परळी विधानसभा समन्वक भरत इंगळे, तालुका सचिव प्रकाश साळुंके आदींनी पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा