वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे  वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे  यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर  , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.       यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे असून मानवाच्या शाश्वत विकासासाठी त्या

रामचंद्र इंगळे यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान - राजकिशोर मोदी

 रामचंद्र इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार समाजोपयोगी कार्य करण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारा -प्राचार्य डॉ.दादाहरी कांबळे



रामचंद्र इंगळे यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान  - राजकिशोर मोदी      

                                                                                                      

अंबाजोगाई, प्रतिनिधी:-रामचंद्रजी इंगळे यांचे कार्य दिशादर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान  असल्याचे प्रतिपादन अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी यांनी केले. ते मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते.

छत्रपतीशिवराय-फुले-शाहू-आंबेडकरी पुरोगामी विचारधारा अंगीकारून मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान,अंबाजोगाई जि.बीड ही संस्था कार्यरत आहे.आंबेडकरी चळवळीतील तत्वनिष्ठ आधारस्तंभ स्मृतिशेष रामचंद्र इंगळे (अप्पा )यांनी कर्तृत्त्वसंपन्न जिल्हा परिषद सदस्य (बीड ) म्हणून राजकीय –सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. स्मृतिशेष रामचंद्र इंगळे (अप्पा ) यांच्या  वैचारिक भूमिकेची शिदोरी घेऊन कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थेची दखल घेऊन त्यांना मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सन्मानित करण्यात येते. मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान,अंबाजोगाई  संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दिल्या जाणारा  मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार-२०२४ हा सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, आदर्श शिक्षक,समाजभूषण  माजी प्राचार्य डॉ .दादाहरी कांबळे यांना देवून गौरवण्यात आले .

मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार समाजोपयोगी कार्य करण्याची ऊर्जा व प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दादाहरी कांबळे यांनी केले. अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी  राजकिशोर (पापा) मोदी (श्री.बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-सचिव तथा माजी नगराध्यक्ष न.प.अंबाजोगाई )तसेच  ज्येष्ठ नेते ॲड.अनंतराव जगतकर,प्राचार्य डॉ.डी.एच.थोरात,डी.जी.धाकडे ,ॲड.श्याम तांगडे,प्रा व्ही.बी.चव्हाण,डॉ.मधुकर कांबळे,सुधीर फुलारी,डॉ. दिलीप गायकवाड,

सी.व्ही.गायकवाड,

महादेव आदमाने,लंकेश वेडे,भारत सातपुते,ताराचंद शिंदे,संतोष सिनगारे,

धम्मपाल सरवदे, सुनिल वाघाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक-राजकीय  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  करणाऱ्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील  सामाजिक योगदान  देणाऱ्या   व्यक्तीस अथवा सामाजिक संस्थांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी  प्रतिष्ठानच्या वतीने २०१९ पासून हा पुरस्कार देण्याचे कार्यान्वीत केले आहे.२०१९ मध्ये आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृतिशेष एन. के.सरवदे (आप्पा) यांना तर २०२० मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भानुदासजी देवरवाडे,२०२१मध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्य  करणारे  डॉ.मधुकर कांबळे,२०२२ मध्ये ज्येष्ठ भीमगीत गायक नागनाथ जोगदंड,२०२३ मध्ये सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अल्पसंख्याकांचे हितचिंतक स्मृतिशेष ख्वाजा  बशीरोद्दिन ख्वाजा मोइनोद्दीन  यांना प्रदान करण्यात आलेला आहे. २०२४ सालचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ  प्राचार्य डॉ.दादाहरी कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मा.रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार 

या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक  प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे,तर आभार संस्थापक सचिव बालासाहेब इंगळे  यांनी मानले.मानपत्र वाचन बळीराम जोगदंड यांनी केले.उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश इंगोले तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. डी. ए.कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

या पुरस्कार सोहळ्यास पत्रकार दादासाहेब कसबे,जगन सरवदे,परमेश्वर गित्ते,कारभारी शिनगारे,विजय रापतवार,सुनील व्यवहारे,गोविंदराव सोनवणे, व्यंकट वेडे,नामदेव आचार्य,बाबासाहेब समुद्रे, बाबुराव कांबळे,देविदास घोबाळे,प्रा.कालिदास सुरवसे,डॉ. डी. आर.शिंदे, माणिक शिंदे,बबन पानकोळी,बापु सरवदे,बुद्धकरण जोगदंड,गंगाधर जोगदंड, मुकुंद भागवत,प्रा. बी. एम. खरात,बालाजी अंबाड,मुन्ना वेडे,  केवळबाई इंगळे, वंदना इंगळे,जयश्री सिरसाट,कांताबाई बनसोडे, लता सोनवणे,सविता इंगले,आशाबाई सरवदे,प्रा.उषा कांबळे, डॉ.भारती इंगळे- सोनवणे,डॉ. आकाश सोनवणे,अशोक सोनवने,महादेव भालेराव, स्वीतम इंगळे, रोहन इंगळे,भूषण इंगळे यांचेसह नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?