भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला जवळ अपघात; दोन जन ठार

भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला  जवळ अपघात; दोन जण ठार


धोंडराई,प्रतिनिधी......

      आळेफाटा येथील भाजीपाला (तरकरी ) घेऊन जाणाऱ्या पहाटेच्या दरम्यान दि.२६जून रोजी कोळगाव येथील बायपास जवळच्या पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात पिकअप पलटी होऊन त्यात दोघे जण ठार झाले. 

      गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन हिंगोली कडे जात असताना राजू सुरेश बांगर रा. बोरीखुर्द (साळवाडी ता. जुन्नर जि. पुणे) हा शेतकरी भाजीपाला उत्पादक होता. त्यांच्या जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने  शेतकरी पिकअपमध्ये मिर्ची आणि कोबी घेऊन हिंगोलीला जात होता. गेवराई तालुक्यातील दोघेजण ठार, कोळगाव जवळ घडली. ही दि.२६ जुन २०२४ रोजी घटना जुन्नरचा शेतकरी हिंगोलीला घेऊन जात होता भाजीपाला पिकअपने पलट्या खाल्ल्ल्या त्यात राजू सुरेश बांगर (वय २७ वर्षे) व त्याचा सहकारी नागोजी इंगोले ( ३५ ) इना पुर पुसद चालकअसे दोघेजण गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताबद्दल जुन्नर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !