युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

दोन जागीच ठार तर तिघे जखमी

भीषण अपघात: दोन जागीच ठार तर तिघे जखमी

केज :- मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्या जवळ पहाटे ४:३० वा. स्विफ्ट कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्या अपघात कार मधील आंध्रप्रदेशातील एक स्त्री व पुरुष जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे आणि ट्रक ड्रायव्हर असे तिघे जखमी झाले आहेत.

       बुधवार दि. २६ जून रोजी  ४:३० वा. पहाटे बीड कडून अंबाजोगाईकडे येणारी ट्रक क्र. (एम एच-४४/ए बी-८७८६) हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कार क्र. (ए पी-३९/एस एस-५६५७) ने उभ्या ट्रक ला जोराची धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आंध्रप्रदेशातील अनोळखी एक स्त्री व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखॉऺं पठान (रा. पाटोदा जि. बीड) हे देखील जखमी झाले आहेत. 

हा अपघात एवढा भीषण होता की, स्विफ्ट डिझायर गाडी पार चकनाचुर झालेली असून ट्रकची चे देखील मागील बाजूचे डाव्या बाजूचे टायर फुटले आहे.या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले असून दोन मयत व एक जखमी यांची ओळख पटलेली नाही. तर तर दोघांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून मयत व जखमी हे परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत असून त्यांना तेलगू भाषे व्यतिरिक्त इतर भाषा समजत नाही

      अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलीस नाईक राजू गुंजाळ, शेख रशीद हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना मदत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या