इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

वीज पडून तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

वीज पडून तीन महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी 


धोंडराई, प्रतिनिधी:- गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. 

      गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने  शालनबाई शेषराव नजन वय 65 यांची सुन लंका हरिभाऊ नजन वय 40 तर विजु बाई बाळासाहेब खेडकर वय41 असा या वीज पडून मयत झालेल्या महिलांचं नाव आहे या तिन्ही महिला शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच वीज पडून मृत्यू झाला तिनी महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असता त्यांना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केला आहे. यामध्ये यमुना माणिक खेडकर वय वर्ष 65 या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील इलाज आणि उपचार सुरू आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!