इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

पूर्वेकडील प्रवेशद्वार, पायऱ्या यांसह प्रदक्षिणा मार्गाचे काम गतीने सुरू

 श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुरू असलेल्या विकास कामांची धनंजय मुंडेंकडून पाहणी

पूर्वेकडील प्रवेशद्वार, पायऱ्या यांसह प्रदक्षिणा मार्गाचे काम गतीने सुरू


परळी वैद्यनाथ (दि.29) - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनाकडून 286 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची आज मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. 


मंदिराच्या पूर्वेस असलेल्या मुख्य प्रवेशद्वार, स्वागत कमान, मेघडंबरी, तसेच मंदिराकडे जाणाऱ्या चिरेबंदी दगडातील पायऱ्यांचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामांची पाहणी करून धनंजय मुंडे यांनी अधिकारी व कंत्राटदार यांना योग्य त्या सूचना दिल्या. चिरेबंदी दगड बसवताना ते एका रेषेत असावेत तसेच खालीवर होऊ नये त्यावर खड्डे पडणार नाही यासाठी योग्य दगडाची निवड करून त्यांचे रचना उत्तमरीत्या करावी अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.


प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या भोवती मेरू पर्वताकडून जाणाऱ्या मंदिर प्रदक्षिणा मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले असून त्यावर आता नाली व काँक्रीट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे यांनी पाहणी करत रस्त्याचा चढ - उतार यासह सावलीची व्यवस्था, पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता, तिथे असणारी उंची, यामध्ये करावयाचे बदल याबाबत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 


यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड, नगरसेवक राजेंद्र सोनी, प्रताप धर्माधिकारी, नगर अभियंता श्री बेंडले त्याचबरोबर पदाधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....