पोस्ट्स

MB NEWS:श्रीमती लता रंगराव देशपांडे यांचे निधन

इमेज
  श्रीमती लता रंगराव देशपांडे यांचे निधन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         श्रीमती लता रंगराव देशपांडे यांचे गुरुवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास हृदयविकाराने पालघर येथे उपचारादरम्यान निधन झाले. पालघर येथेच शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.        त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कॉ. रंगराव मामा देशपांडे यांच्या त्या पत्नी तर वैद्यनाथ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आर. आर. देशपांडे व पालघर येथील न्यायाधीश किरण देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने देशपांडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे. 

MB NEWS:खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन

इमेज
  चांगला माणूस बना, आनंदी जीवन जगा - पंकजाताई मुंडे यांचं तरूणाईला आवाहन खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन अंबाजोगाई  ।दिनांक ०२। आयुष्यात खूप संघर्ष, उतार- चढाव, स्पर्धा असली तरी आजच्या तरूणाईने निराश न होता, खचून न जाता, आपले स्वप्न, ध्येय पुर्ण करण्यासाठी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. प्रत्येकाचं स्वप्न असते आपण चांगला अधिकारी बनावे, शास्त्रज्ञ बनावे पण तसं नाही होता आलं तर किमान चांगला माणूस तरी बना..आनंदी जीवन जगा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आजच्या तरूणाईला केलं. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे शानदार उद्घाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाशिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ. कल्पना चौसाळकर, राम कुलकर्णी, अप्पाराव यादव, अविनाश तळणीकर, सौ.वर्षाताई मुंडे, डॉ.पी.आर.कुलकर्णी, सौ. उषाताई मुंडे, विष्णुपंत कुलकर्णी, प्राचार्य

MB NEWS:महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदीराकडे जाण्याच्या रस्त्याची स्वच्छता करून व पथदिवे तात्काळ चालु करावेत-योगेश पांडकर

इमेज
  महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदीराकडे जाण्याच्या रस्त्याची स्वच्छता करून व पथदिवे तात्काळ चालु करावेत-योगेश पांडकर  परळी प्रतिनिधी...परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग आहे देशभरातील लाखो भाविक महाशिवरात्रीच्या निमित्ताने परळी नगरीत येतात. लाखो भाविक प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन सोमेश्वर मंदिर (जिरेवाडी),काळरात्री देवी,डोंगर तुकाई, झुरळे गोपीनाथ या देवस्थानाचे दर्शन घेतात. वैजनाथ मंदिरकडे अनेक मुख्य रस्ते आहेत त्यातील आजाद चौक ते मंदिरकडील रस्त्यावर एका बाजूने गाड्यांचे अतिक्रमण असून दुसऱ्या बाजूने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाकडून येणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरेश्वर मंदिर (तळ) या मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या अंधारात महिला, अबाल वृद्ध दर्शनासाठी जातात पण रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी परळी शहरातील जे पथदिवे बंद असतील तेथील रस्त्यावरील पथदिवे तात्काळ सुरू करावे. महाशिवरात्र

MB NEWS:अर्थसंकल्प:सीतारामन यांच्या साडीच्या रंगात दडलंय रहस्य! जाणून घ्या...

इमेज
  अर्थसंकल्प:सीतारामन यांच्या साडीच्या रंगात दडलंय रहस्य! जाणून घ्या...          केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा अर्थसंकल्प असला तरी सीतारामन यांचा हा सलग 5वा अर्थसंकल्प आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांचा नेहमीच वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. त्यांच्या पेहरावातून एक खास संदेश दिला जातो अशीही चर्चा रंगते. यावेळी देखील सीतारामन लाल रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत आल्या. चला तर, 2019 ते 2023 च्या बजेटमध्ये सीतारामन कोणत्या रंगाच्या साडीत आल्या आणि त्यांनी कोणता खास संदेश दिला ते जाणून घेऊया… मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लूक पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसला. त्यांनी गडद लाल रंगाची साडी परिधान केली होती. हा रंग शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पादरम्यान, सीतारामन यांनी तपकिरी रंगाची साडी नेसली होती. हा रंग संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पादरम्यान लाल रंगाची साडी नेसली हो

MB NEWS: पंकजाताई मुंडे यांनी केलं केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत

इमेज
  सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प पंकजाताई मुंडे यांनी केलं केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत बीड  ।दिनांक ०१। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा तसेच सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे, या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले निर्णय स्वागतार्ह आहेत अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं हे महत्वाचं बजेट असून ते पूर्णपणे सकारात्मक आहे. देशातील सामान्य माणसांला चांगले दिवस यावेत यासाठीच मोदी सरकार सत्तेवर आलं आहे, त्यामुळे अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समान विकास साधण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच सबका प्रयास देखील यात करण्यात आला आहे असं पंकजाताई म्हणाल्या.    मोदी सरकारने कोविड काळात घेतलेले निर्णय, लसीकरण मोहिम,  अन्न धान्याचा पुरवठा हया जमेच्या बाजू आहेत. अर्थसंकल्पात सर्व समावेशक विकास साधतांना सरकारने वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा, हरित विकास अशी विकासाची सप्तर्षी योजना आखली

MB NEWS:खडका येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

इमेज
  खडका येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन सोनपेठ, प्रतिनिधी..     परमपूज्य माधव आश्रम स्वामी महाराज ७४ वा पुनः दर्शन महोत्सव जलसमाधी स्थान, खडका येथे दि.२ रोजी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.       परमपूज्य माधव आश्रम स्वामी महाराज ७४ वा पुनः दर्शन महोत्सव जलसमाधी स्थान, खडका येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.यानिमित्त गुरुवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२ सकाळी 9 ते 3 वा. पर्यंत आरोग्य तपासणी शिबिर व  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात नाव नोंदणीसाठी अभिषेक यादव ९०७५०७४६३७ कृष्णा पवार ९५७९६७५५५५ व्यंकटेश यादव ९०६७७६२७७७ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, खडका यांच्यावतिने करण्यात आले आहे.

MB NEWS:पत्रकार नितीन ढाकणे व दिपक गित्ते यांची निवड

इमेज
  पत्रकार नितीन ढाकणे व  दिपक गित्ते यांची निवड     पत्रकार व संपादक नितीन ढाकणे व पत्रकार दिपक गित्ते यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारणीवर निवड  परळी वैजनाथ/प्रतिनिधी  परळी येथील निर्भीड पत्रकार संपादक व सामाजिक कार्यकर्ते नितीन ढाकणे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. व तरुण तडफदार पत्रकार दिपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नागपूर येथील बैठकीत ठराव घेऊन नुकतेच त्यांना देण्यात आले आहे. पत्रकार नितीन ढाकणे व दिपक गित्ते यांच्या निवडीचे  पत्रकार जिल्ह्यातील माहिती अधिकार महासंघ अशा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  नागपूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या झालेल्या बैठकीत ठराव घेऊन बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी पत्रकार संपादक नितीन ढाकणे व पत्रकार दिपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे नियुक्तीपत्र दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी देण्यात आले आहे.  मागील तीन वर्षापासून पत्रकार नितीन ढाकणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महास

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांनी केले दगडगुंडे परिवाराचे सांत्वन

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी केले दगडगुंडे परिवाराचे सांत्वन परळी (प्रतिनिधी) - भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांनी नुकतेच निधन झालेल्या अनंत दगडगुंडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.गणेशपार भागातील रहिवासी असलेले अनंत दगडगुंडे गुरुजी यांचे शनिवार दि.२८ रोजी निधन झाले होते. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पंकजाताई पोचल्या,यावेळी त्यानी आठवणींना उजाळा दिला.दगडगुंडे कुटूंबाशी माझे जवळचे नाते आहे.परिवाराच्या या दुःखात मी सहभागी आहे,असे पंकजाताई यावेळी म्हणाल्या. त्यांच्यासोबत जुगलकिशोर लोहिया,प्रकाश जोशी,उमेश खाडे,राजेंद्र ओझा हे होते.

MB NEWS:दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

इमेज
  दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात  नेहुल वारुळे, समीक्षा घुमे यांनी विद्यार्थ्यासह मराठमोळ्या गीतावर सादर केला नृत्यविष्कार परळी (प्रतिनिधी):-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळावेगळा कलाविष्कार सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतामुळे प्रेक्षक अक्षरशा भारावून गेले होते.          या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते, मी होणार सुपरस्टार नेहुल वारुळे, समीक्षा घुमे, मुख्याध्यापक विठ्ठल तुपे, पोद्दार जम्बो किडच्या मुख्याध्यापिका सुरेखा तुपे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पोद्दार जंबो किड्स च्या विद्यार्थी विद्यार्थिनीं व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध गाण्यावर नृत्यसादर केले. देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा या गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर काळजाच सुप झाल... आरशाला रूप आल...,झिंग झिंग झ

MB NEWS:आजारपणातही धनंजय मुंडेंनी दाखवली आपल्या माणसांसाठी सतर्कता

इमेज
  नेपाळच्या काठमांडू मध्ये अडकलेल्या बीड जिल्ह्यातील आठ तरुणांची धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे सुटका धनंजय मुंडेंचा फोन अन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या कार्यालयातून यंत्रणांनी केली तात्काळ मदत सर्व 8 तरुण सुखरूप, घरी परतण्यासह केली व्यवस्था फिरायला गेलेल्या तरुणांना लुटल्याने नेपाळमध्ये अडकले होते आजारपणातही धनंजय मुंडेंनी दाखवली आपल्या माणसांसाठी सतर्कता मुंबई (दि. 31) -        बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या शिरूर घाट येथील दीपक सांगळे याच्यासह त्याचे सात मित्र असे एकूण आठ तरुण नेपाळमध्ये फिरायला गेले असता लुटमार झाल्याने अडकले होते, मात्र माजी मंत्री आमदार  धनंजय मुंडे यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे त्यांची सुटका झाली असून ते सुखरूप आहेत व लवकरच आपापल्या घरी पोहोचतील. शिरूर घाट ता. केज येथील दीपक जीवन सांगळे याच्यासह महेश हरकर, विश्वजीत घुले, किरण चव्हाण, आकाश खामकर, अक्षय पारेकर, अविष्कार मुळीक व सुरज लोंढे हे आठ तरुण फिरायला नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान काल रात्री काठमांडू शहरातील तामिल परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना

MB NEWS:परळीत जमाअत ए इस्लामी हिंदचा एक रोजा इजतेमा-ए-आम

इमेज
  परळीत जमाअत ए इस्लामी हिंदचा एक रोजा इजतेमा-ए-आम  परळी / प्रतिनिधी  परळी येथे दिनांक २९ जानेवारी २०२३ रविवारी जमाअत ए इस्लामी बीड जिल्ह्याच्या एक रोजा इजतेमा-ए-आम च्या आयोजन करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जमाअत ए इस्लामी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मौलाना इलयास फलाही सहाब,जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्याचे तरबियत विभागचे सचिव डॉ जावेद मुकरम सहाब, जलगावचे सोहेल अमीर साहेब, शफीक फारुखी सहाब पाथरी, मुबश्शिरा फिरदोस बाजी औरंगाबाद आलं होतं या कार्यक्रमांची सुरुवात कुरान पठाणाने झाली नंतर डॉ जावेद मुकरम सहाब यांनी "सध्याच्या प्रसतीत कुरान आणि सुन्नत काय सांगतात" या विषयावर मुकरम साहेबनी अनेक उदाहरणे देऊन आपलं मनोगत व्यक्त केले नंतर बोलताना सांगितले की आज भारतात मुस्लिम समाजाला जितका अधिकार आणि आझादी आहे तितकी जकात कुठेच नाही. यानंतर 'इस्लामिक समाज निर्माण करण्यात आमची भूमिका काय आसावी' यावर प्रमुख तीन व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात अगोदर मुबश्शिरा फिरदोस मैडमनी 'लग्ना नंतर जोडीदार, शिक्षक' आणि पालक या विषयावर आपलं मनोगत

MB NEWS:आसाराम बापूला जन्मठेप !

इमेज
  आसाराम बापूला जन्मठेप ! मुंबई- बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या दहा वर्षांपासून कारागृहात असणारे तथाकथित संत आसाराम याला न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती.या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013ला तिच्या बलात्कार करण्यात आला. आसाराम बापू यांच्या खटल्याचा घटनाक्रम 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला. 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला. पण यावर भडकलेल्या आसाराम समर्थकांची कमला मार्केट पोलीस स्टेशनमधे तोडफोड केली. – 28 ऑगस्ट 2013ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसारामने केला. दरम्यान 29 ऑगस्ट 2013ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्य

MB NEWS:राज्यस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात नागपूरचा संघ अव्वल तर पुरूष गटात अमरावतीने मारली बाजी

इमेज
  राज्यस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात नागपूरचा संघ अव्वल तर पुरूष गटात अमरावतीने मारली बाजी भजनाने आपल्या जीवनात शक्ती आणी भक्ती निर्माण होते: अपर आयुक्त डाॅ. विजयकुमार फड  कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धा उत्साहात संपन्न  परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय महिला व पुरूष भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला गटात नागपूर येथील कामगार कल्याण केंद्र कामठीच्या संघाने; तर पुरूष गटात अमरावती येथील कामगार कल्याण केंद्र गांधी चौक या संघाने प्रथम पारितोषिक पटकावला. औरंगाबाद येथील तापडीया रंगमंदिरात दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत ३८ महिला व पुरुष भजनी संघाने उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठवाडा विकास मंडळाचे अपर आयुक्त डाॅ. विजयकुमार फड, कल्याण आयुक्त रविराज इळवे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, भालचंद्र जगदाळे यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेत महिला गटात वरळी येथील कामगार कल्याण केंद्र जुनी धारावी या संघाने  द्वितीय; तर चिपळूण येथील कामगार कल्याण केंद्र सावंतवाडी

MB NEWS:कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते परळी येथील भगवान मंडलीक यांचा गौरव

इमेज
  कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते परळी येथील भगवान मंडलीक यांचा गौरव  सेवानिवृत्ती निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेत गौरव परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या शुभहस्ते परळी येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसेवक भगवान मंडलीक यांचा  सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आले. येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसेवक भगवान मंडलीक हे येत्या ३१ जानेवारी रोजी कामगार कल्याण मंडळाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळेस परळी येथील भगवान मंडलीक यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सेवापुर्ती निमित्त विशेष गौरव करण्यात आला. यावेळेस सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे, प्रसाद धस यांची उपस्थिती होती.

MB NEWS:विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय व राज्य पातळीवर करणार पाठपुरावा

इमेज
  अध्यात्म व विज्ञानातून मराठवाड्याच्या विकासाची दारं खुली करण्याची वेळ आली आहे : स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय व राज्य पातळीवर करणार पाठपुरावा प्रसंगी परळी वैजनाथ येथे आयोजित केली जाणार धर्मसभा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथे काशी विश्वनाथ, उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. 'अध्यात्म व विज्ञानातून मराठवाड्याच्या विकासाची दारं खुली करण्याची वेळ आली आहे' असे प्रतिपादन पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभुषीत श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज (पंचायती अखाडा श्री निरजंनी ) श्रीक्षेत्र - चाकोरे (बेझे ) त्र्यंबकेश्वर नाशिक यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना केले. मराठवाडा ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. आता वेळ आली आहे की या भूमीचा शोषणाचा शाप पुसून विकासाचे वरदान येथील भूमिपुत्रांना मिळावे. देशाचे संविधान सर्वांना समानतेचा अधिकार देते त्यानुसार येथील नागरिकांचा विकास होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी सर्व धार्मिक स्थळ विकसित करून धर्म आणि कर्माची जोड घा

MB NEWS:हरकती मांडून दरवाढ थांबवा-चंदुलाल बियाणी

इमेज
  महावितरणची प्रस्तावित  वीज दरवाढ आपणच रोखू शकतो ! हरकती मांडून दरवाढ थांबवा-चंदुलाल बियाणी परळी/ प्रतिनिधी- महावितरणने एका जाहीर सूचनेद्वारे राज्यातील सर्व प्रकारच्या विज ग्राहकांच्या वीज दरावाढीचा प्रस्ताव अधिक्षक अभियंता (वीज दर नियमक कक्ष)  यांच्यासमोर मांडला असून येत्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना मोठ्या दरवाढीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रस्तावित दरवाढीच्या संदर्भात महावितरणने हरकती आणि आक्षेप मागविल्या असून एक वीज ग्राहक म्हणून आपणच हरकतीद्वारे ही दरवाढ रोखू शकतो असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील वीज ग्राहकांसाठी जनजागृती अभियान राविण्यात येत असून ग्राहकांनी हरकतीद्वारे आपला आक्षेप नोंदवावा, असे आवाहन चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. राज्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जशास तशा असतांना, वीज चोरी आणि गळती थांबविण्यात अपयश आलेले असताना तसेच महावितरणमधील भ्रष्टाचार रोखण्यात अपयश आलेल्या महावितरणने आपले नुकसान भरुन काढण्यासाठी वीज दरवाढ करण्याचा प्

MB NEWS:औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात परळीत 90 टक्के मतदान

इमेज
  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक:परळीत 90 टक्के मतदान  परळी वैजनाथ ,प्रतिनिधी        औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 30 रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत परळी तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर एकूण 90 टक्के मतदान झाले आहे.         औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी परळी तालुक्यात तीन ठिकाणी मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. परळी, धर्मपुरी व सिरसाळा या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परळी तालुक्यातील एकूण 856 पैकी 772 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान केंद्र परळी वैजनाथ येथे 535 पैकी 488, सिरसाळा 214 पैकी 190 तर धर्मापुरी येथे 107 पैकी 94 शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीत परळी तालुक्यातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची टक्केवारी ही 90.18 इतकी आहे.

MB NEWS: पालखी उत्सवाने होणार प्राणप्रतिष्ठापणा

इमेज
  परळीच्या आयोध्योत श्री रामप्रभु अवतरणार पालखी उत्सवाने होणार प्राणप्रतिष्ठापणा परळी वै.ता.३० प्रतिनिधी      ज्योतीर्लींग तीर्थक्षेत्र असलेल्या परळी वैद्यनाथ शहरातील आयोध्यानगर येथे लोकसहभागातुन बांधण्यात आलेल्या प्रभु श्री राम मंदिराच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहन आणी भव्य सप्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी श्री प्रभु रामाच्या मुर्तीची पालखी मिरवणुक निघणार आहे. या पालखी सोहळयात परळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.      पाचवे ज्योतीर्लींग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या पावन भुमीत शहरातील आयोध्यानगर (जीरेवाडी रोड) येथे सर्वसामान्य प्रभु श्रीराम भक्तांच्या देणगीतुन भव्यदिव्य असे मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात प्रभु श्रीराम, श्रीगणेश व महाबली हनुमानांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन आणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दि २८ जानेवारी पासुन ते शुक्रवार दि ३ फेब्रुवारी पर्यंत हा धार्मीक महोत्सव संपन्न होत आहे. आज मंगळवार दि. ३१ जानेवारी प्रभु श्रीरामांच्या म

MB NEWS:प्रा. किरण पाटील सर्वाधिक मतांनी विजयी होतील - व्यक्त केला विश्वास

इमेज
  पंकजाताई मुंडे यांच्या औरंगाबाद, बीड, सिरसाळा येथे मतदान केंद्रांना भेटी प्रा. किरण पाटील सर्वाधिक मतांनी विजयी होतील - व्यक्त केला विश्वास बीड ।दिनांक ३०।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज औरंगाबाद व बीड जिल्हयातील  मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.    मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सर्वत्र उत्साहात आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. भाजप व मित्र पक्षाकडून प्रा. किरण पाटील निवडणुक रिंगणात आहेत.  त्यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हयात ठिक ठिकाणी प्रचार सभा आणि बैठका घेतल्या होत्या.     आज पंकजाताई मुंडे यांनी सकाळीच औरंगाबाद येथे बबनराव ढाकणे महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर भेट दिली. याठिकाणी स्वतः उमेदवार किरण पाटील उपस्थित होते. बीड येथे चंपावती विद्यालयातील बुथला भेट देऊन पंकजाताईंनी भाजपा कार्यकर्ते व शिक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर पिंपळनेर, सिरसाळा (परळी) येथेही

MB NEWS:वृक्षारोपण करून विशेष शिबिराची सांगता

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून नैतिक मूल्यांची जोपासना -  बाळासाहेब देशमुख वृक्षारोपण करून विशेष शिबिराची सांगता परळी (प्रतिनिधी) :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी (ता.३०) जानेवारी रोजी मौजे मिरवट येथे उपरोक्त मत व्यक्त केले.               थर्मल कॉलनी येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन तालुक्यातील मौजे मिरवट येथे दि.२४ जानेवारी ते दि.३० जानेवारी रोजी दरम्यान करण्यात आले होते. या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवत श्रमदान केले. सोमवार रोजी शिबिराच्या समारोपप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शालेय समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी अनुभवातून विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे दिले. शैक्षणिक, कृषी, संशोधन असे विविध पैलू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी मंचावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते अजय भ

MB NEWS:राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती

इमेज
  राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती  अध्यक्षपदी शाम आवाड उपाध्यक्षपदी केतन जाधव साचिव पदी नितिन धरमे यांची निवड  परळी दि.30(प्रतिनिधी)  राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती  गंगासागर नगर   अध्यक्ष पदी शाम आवाड तर  उपाध्यक्ष केतन जाधव , सचिव पदी नितिन धर्मे, कोषाध्यक्ष शिवराज वाकडे, कार्याध्यक्ष प्रशांत दराडे, प्रसिद्ध प्रमुख म्हणून शिवहरी  जाधव,  समर्थ हवा यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणुन गोविंद गरड, कृष्णा पौळ ,गजानन थळकरी, बालाजी शिंदे, गणेश गिराम ,संतोष मस्के, नितीन पौल, धोंडीराम चाटे ,विशाल जाधव, रवींद्र खोशे, पपु पौल्, बालाजी शिरसाट, परमेश्वर बहादुर,  विष्णू अटुळे, कपिल शिंदे, आकाश लहवले, अक्षय कानडे आदी शिव प्रेमी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शक म्हणुन गोपाळ आंधळे, सौ कमल मावशी नाईकवाडे, किशोर जाधव, बळीराम नागरगोजे, अशोक हिंगणे, गणेश खाडे सर ,राजे भाऊ जाधव, शिवजन्मोत्सव सामाजिक, सांस्कृतीक रित्या साजरा करणार असल्याची माहिती राजमुद्रा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ जाधव यांनी दिली.

MB NEWS:तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ

इमेज
परळी तालुक्यातील भूमिपुत्र छायाचित्रकारांचे नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन   तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ परळी तालुक्यातील भूमिपुत्र साळुंकवाडी आणि दौंडवाडी येथील छायाचित्रकार तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन *पदमश्री सुधारक ओलवे* - (भारतीय छायाचित्र पत्रकार,) *प्रोफेसर गणेश तरतरे* - (सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट - मुंबई,) आणि *अलका सामंत* - सॅफरॉन आर्ट गॅलरी, आदी मान्यवरांच्या  शुभ हस्ते ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई. येथे होत आहे.  अत्यंत आशय पूर्ण छायाचित्रे आणि कल्पकतेने घडवलेल्या शिल्पकृती पाहण्याचा अनोखा संयोग या प्रदर्शनामुळे लाभणार आहे. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन पाहण्यास खुले आहे.

MB NEWS: श्री रेणुका माता मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
 श्री रेणुका माता मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी          गेल्या 14 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा परळी वैजनाथ येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.        सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी तीन वा.पासुन वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी तीर्थप्रसाद व पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्राहकांनी वर्धापन दिनानिमित्त शाखेला भेट द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव व सर्व कर्मचारी यांनी केले आहे.

MB NEWS:महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही

इमेज
  स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज उद्या परळीत ; नागरिकांशी साधणार संवाद  महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज दि. ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र कॉरिडॉर घोषित करावेत यासाठी स्वामीजी आग्रही आहेत. या अनुषंगाने स्वामीजी औद्योगिक वसाहतीत दुपारी पाच वाजता परळी वैजनाथच्या रहिवाशांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्वामीजी पत्रकारांना संबोधित करतील.  गुरुदेवांचा संक्षिप्त परिचय पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज  (प॔चायती अखाडा श्री निरंजनी) श्रीक्षेत्र चाकोरे (बेझे) त्र्यंबकेश्वर नाशिक..! लहानपणापासूनच स्वामीजींच्या विचारांचा लोकांवर प्रभाव असायचा. स्वामीजींनी  लहानपणापासूनच भक्तीचा मार्ग स्वीकारला होता. स्व

MB NEWS:सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे

इमेज
  सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या शिबीरात शनिवारी (ता.२८) दुपारच्या सत्रात राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या विषयावर डॉ संतोष मुंडे बोलत होते.                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीरा दरम्यान शनिवारी दुपारी राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या व्याख्यानास प्रमुख वक्ते दिव्यांगाचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते डॉ संतोष मुंडे, श्रीनिवास मुंडे, प्रा.शंकर कापसे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा.डॉ रंजना शहाणे, प्रा राजर्षी कल्याणकर, प्रा. प्रविण फुटके, प्रा.विशाल पौळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ संतोष मुंडे म्हणाले की, आजच्या काळात मोबाईल मुळे संवाद हरवत चालला आहे. संवाद वाढवण्यासाठी रा