MB NEWS:अर्थसंकल्प:सीतारामन यांच्या साडीच्या रंगात दडलंय रहस्य! जाणून घ्या...

 अर्थसंकल्प:सीतारामन यांच्या साडीच्या रंगात दडलंय रहस्य! जाणून घ्या...





       


 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा अर्थसंकल्प असला तरी सीतारामन यांचा हा सलग 5वा अर्थसंकल्प आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना त्यांचा नेहमीच वेगळा लूक पाहायला मिळाला आहे. त्यांच्या पेहरावातून एक खास संदेश दिला जातो अशीही चर्चा रंगते. यावेळी देखील सीतारामन लाल रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत आल्या. चला तर, 2019 ते 2023 च्या बजेटमध्ये सीतारामन कोणत्या रंगाच्या साडीत आल्या आणि त्यांनी कोणता खास संदेश दिला ते जाणून घेऊया…

मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लूक पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसला. त्यांनी गडद लाल रंगाची साडी परिधान केली होती. हा रंग शौर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.

सर्वसाधारण अर्थसंकल्पादरम्यान, सीतारामन यांनी तपकिरी रंगाची साडी नेसली होती. हा रंग संरक्षणाचे प्रतीक मानला जातो.

सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पादरम्यान लाल रंगाची साडी नेसली होती. हा रंग शक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रतीक मानला जातो.

2020 च्या अर्थसंकल्पादरम्यान सीतारामन पिवळ्या साडीत दिसल्या. हा रंग उत्साह आणि उर्जेचा प्रतीक मानला जातो.

2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान, त्यांनी गडद गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. हा रंग स्थिरतेचे प्रतीक आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार