MB NEWS: पालखी उत्सवाने होणार प्राणप्रतिष्ठापणा

 परळीच्या आयोध्योत श्री रामप्रभु अवतरणार


पालखी उत्सवाने होणार प्राणप्रतिष्ठापणा


परळी वै.ता.३० प्रतिनिधी


     ज्योतीर्लींग तीर्थक्षेत्र असलेल्या परळी वैद्यनाथ शहरातील आयोध्यानगर येथे लोकसहभागातुन बांधण्यात आलेल्या प्रभु श्री राम मंदिराच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा, कलशारोहन आणी भव्य सप्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी श्री प्रभु रामाच्या मुर्तीची पालखी मिरवणुक निघणार आहे. या पालखी सोहळयात परळी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

     पाचवे ज्योतीर्लींग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या पावन भुमीत शहरातील आयोध्यानगर (जीरेवाडी रोड) येथे सर्वसामान्य प्रभु श्रीराम भक्तांच्या देणगीतुन भव्यदिव्य असे मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरात प्रभु श्रीराम, श्रीगणेश व महाबली हनुमानांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन आणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दि २८ जानेवारी पासुन ते शुक्रवार दि ३ फेब्रुवारी पर्यंत हा धार्मीक महोत्सव संपन्न होत आहे. आज मंगळवार दि. ३१ जानेवारी प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची पालखीद्वारे भव्य शोभायात्रा आयोध्यानगर येथुन सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान करणार असुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, एकमिनार चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, राणी लक्ष्मीबाई टॉवर, संत सेवालाल महाराज चौक, जगमित्र नागा महाराज मंदिर ते प्रभु वैद्यनाथ मंदिर प्रदक्षना करूण परत नाथ रोड मार्गे आयोध्यानगर येथे जाणार आहे. या मंदिराचा कलशारोहन सोहळा शुक्रवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री तथा भाजप च्या राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असुन या सोहळयास बीड जिल्हयाच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, रामायनाचार्य विनायक महाराज गुट्टे गुरूजी, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची उपस्थीती लाभणार आहे. या सप्ताहामध्ये २८ जानेवारी रोजी हभप माउली महाराज उखळीकर, दि. २९ रोजी हभप राम महाराज मुंडे, दि ३० रोजी हभप भरत महाराज जोगी यांचे किर्तन झाले. तर मंगळवार दि. ३१ रोजी सायंकाळी सात वाजता हभप राजाभाउ महाराज चांदवडे, दि. १ फेब्रुवारी रोजी हभप शामसुंदर सोन्नर, दि.२ रोजी हभप सुदाम महाराज पानेगावकर, दि.३ रोजी दुपारी १२ ते १:०० रामायणाचार्य हभप विनायक महाराज गुट्टे यांचे पुजेचे किर्तन होईल तर हभप नारायण महाराज पालमकर यांचे दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार असुन या पुर्ण धार्मीक सोहळयाचा परळी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रभुराम भक्त आयोध्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार