युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:खडका येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

 खडका येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

सोनपेठ, प्रतिनिधी..
    परमपूज्य माधव आश्रम स्वामी महाराज ७४ वा पुनः दर्शन महोत्सव जलसमाधी स्थान, खडका येथे दि.२ रोजी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      परमपूज्य माधव आश्रम स्वामी महाराज ७४ वा पुनः दर्शन महोत्सव जलसमाधी स्थान, खडका येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे.यानिमित्त गुरुवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२ सकाळी 9 ते 3 वा. पर्यंत आरोग्य तपासणी शिबिर व  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात नाव नोंदणीसाठी अभिषेक यादव ९०७५०७४६३७ कृष्णा पवार ९५७९६७५५५५ व्यंकटेश यादव ९०६७७६२७७७ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, खडका यांच्यावतिने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या