MB NEWS:पंकजाताई मुंडे यांनी केले दगडगुंडे परिवाराचे सांत्वन

 पंकजाताई मुंडे यांनी केले दगडगुंडे परिवाराचे सांत्वन


परळी (प्रतिनिधी) - भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांनी नुकतेच निधन झालेल्या अनंत दगडगुंडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.गणेशपार भागातील रहिवासी असलेले अनंत दगडगुंडे गुरुजी यांचे शनिवार दि.२८ रोजी निधन झाले होते.


त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पंकजाताई पोचल्या,यावेळी त्यानी आठवणींना उजाळा दिला.दगडगुंडे कुटूंबाशी माझे जवळचे नाते आहे.परिवाराच्या या दुःखात मी सहभागी आहे,असे पंकजाताई यावेळी म्हणाल्या. त्यांच्यासोबत जुगलकिशोर लोहिया,प्रकाश जोशी,उमेश खाडे,राजेंद्र ओझा हे होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार