MB NEWS:खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन

 चांगला माणूस बना, आनंदी जीवन जगा - पंकजाताई मुंडे यांचं तरूणाईला आवाहन

खोलेश्वर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन




अंबाजोगाई  ।दिनांक ०२।

आयुष्यात खूप संघर्ष, उतार- चढाव, स्पर्धा असली तरी आजच्या तरूणाईने निराश न होता, खचून न जाता, आपले स्वप्न, ध्येय पुर्ण करण्यासाठी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. प्रत्येकाचं स्वप्न असते आपण चांगला अधिकारी बनावे, शास्त्रज्ञ बनावे पण तसं नाही होता आलं तर किमान चांगला माणूस तरी बना..आनंदी जीवन जगा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आजच्या तरूणाईला केलं.


भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे शानदार उद्घाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाशिप्र संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.सौ. कल्पना चौसाळकर, राम

कुलकर्णी, अप्पाराव यादव, अविनाश तळणीकर, सौ.वर्षाताई मुंडे, डॉ.पी.आर.कुलकर्णी, सौ. उषाताई मुंडे, विष्णुपंत कुलकर्णी, प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, उपप्राचार्य तथा स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. डॉ.बिभीषण फड आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


प्रारंभी दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या संगीत विभागातील संचाने स्वागतगीत सादर केले. त्यानंतर खोलेश्वर महाविद्यालयास सी.सी.टी.व्ही. खरेदी करीता देणगी देणारे शिक्षणतज्ज्ञ डॉ.पी.आर.कुलकर्णी यांचा पंकजाताईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 


 पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, आपल्यातील ऊर्जा, उल्हास आणि शक्ती याचा वापर नेहमीच विधायक कार्यासाठी करावा नवे तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वापर करताना तरूण पिढीने किती प्रभावीत झाले पाहिजे हे ठरविले पाहिजे एखाद्या गोष्टीत यश नाही मिळाले तरी पर्याय शोधले पाहिजेत. कारण, जीवन ही सतत चालणारी बाब आहे. जीवनात अनेक संधी मिळतात. तेंव्हा सर्वकाही "ऑल इज वेल" आहे हे गृहित धरून आपल्याकडे ज्या गोष्टी कमी आहेत... त्याचा कधीही न्यूनगंड बाळगु नका व जास्त आहे त्याचा ही मनात अहंकार ठेवू नका, आत्ताचे क्षण आनंदाने जगा, खूप अभ्यास करा, आई-वडील, ज्येष्ठांचा आदर ठेवा, महिलांचा सन्मान करा, गुरूजणांविषयी कृतज्ञता भाव बाळगा, राष्ट्रभक्ती जोपासा, आपले व्यक्तीमत्व आकर्षक, उत्तम आणि सुंदर कसे राहिल, याकडे लक्ष द्या, कर्मा एवढा मोठा सिद्धांत आयुष्यात कोणताही नाही तेंव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा बाळगू नका, निर्व्यसनी रहा, भारताचा एक सुजाण नागरीक आणि चांगला माणूस बना व आनंदी जीवन जगा.


  कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी चि.रामदास शिंदे व विद्यार्थीनी कु. अर्पिता आरबाड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. बिभीषण फड यांनी मानले. स्नेहसंमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !