MB NEWS:वृक्षारोपण करून विशेष शिबिराची सांगता

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून नैतिक मूल्यांची जोपासना -  बाळासाहेब देशमुख




वृक्षारोपण करून विशेष शिबिराची सांगता


परळी (प्रतिनिधी) :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी (ता.३०) जानेवारी रोजी मौजे मिरवट येथे उपरोक्त मत व्यक्त केले.

              थर्मल कॉलनी येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन तालुक्यातील मौजे मिरवट येथे दि.२४ जानेवारी ते दि.३० जानेवारी रोजी दरम्यान करण्यात आले होते. या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवत श्रमदान केले. सोमवार रोजी शिबिराच्या समारोपप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शालेय समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी अनुभवातून विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे दिले. शैक्षणिक, कृषी, संशोधन असे विविध पैलू विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी मंचावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते अजय भैय्या सोळंके, उपप्राचार्य सुनील लोमटे, लोकमत टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. राजू कोकलगाव, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. अंकुश वाघमारे आदि उपस्थित होते. सदरील विशेष शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य एन.एच. शेंडगे, उपप्राचार्य सुनील लोमटे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.अंकुश वाघमारे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार