MB NEWS:महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदीराकडे जाण्याच्या रस्त्याची स्वच्छता करून व पथदिवे तात्काळ चालु करावेत-योगेश पांडकर

 महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ मंदीराकडे जाण्याच्या रस्त्याची स्वच्छता करून व पथदिवे तात्काळ चालु करावेत-योगेश पांडकर 




परळी प्रतिनिधी...परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग आहे देशभरातील लाखो भाविक महाशिवरात्रीच्या निमित्ताने परळी नगरीत येतात.

लाखो भाविक प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन सोमेश्वर मंदिर (जिरेवाडी),काळरात्री देवी,डोंगर तुकाई, झुरळे गोपीनाथ या देवस्थानाचे दर्शन घेतात.

वैजनाथ मंदिरकडे अनेक मुख्य रस्ते आहेत त्यातील आजाद चौक ते मंदिरकडील रस्त्यावर एका बाजूने गाड्यांचे अतिक्रमण असून दुसऱ्या बाजूने रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाकडून येणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरेश्वर मंदिर (तळ) या मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या अंधारात महिला, अबाल वृद्ध दर्शनासाठी जातात पण रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी परळी शहरातील जे पथदिवे बंद असतील तेथील रस्त्यावरील पथदिवे तात्काळ सुरू करावे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यावेळी नगर परिषदच्या वतीने स्वच्छता कामगार जास्त प्रमाणात उपलब्ध करावेत अशी मागणी पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार भाजयुमो चे शहर संघटक योगेश पांडकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार